श्री गौतम बुद्धांचे आपले विचार आपल चारित्र्य – Buddha quotes in Marathi

Buddha quotes in Marathi

आपले विचार आपल चारित्र्य – Buddha quotes in Marathi

प्राचीन काळातल्या उत्तर भारतात लुंबिनी राज्याचे  (आता नेपाळ ) श्री सिद्धार्थ गौतम हे राजकुमार होते. साधारणतः 563 Bc ते 483 BC हा त्यांचा कालखंड गणला जातो.

दिव्या ज्ञान मिळालेले व जागृत झालेले म्हणून आपण श्री गौतम बुद्धां ना ओळखतो. एक राजकुमार म्हणून त्याने हवं ते मिळाल असत परंतु त्यांना तसे  जीवन अभिप्रेत न्हवते.

एके दिवशी ते आपल्या राजवाड्यात न बाहेर पडले आणि त्यांनी लोकांच्या जीवनातल्या वेदना, यातना  पाहिल्या ज्या त्यांनी पूर्वी कधीही पाहिल्या न्हवत्या.

वयाच्या 35 व्या वर्षी ते एक झाडाखाली ध्याना ला, चिंतानाला बसले त्या झाडाला आपण बोधिवृक्ष म्हणून जाणतो. 49 व्या दिवशी त्यांना दिव्यज्ञानची अनुभुती झाली.

जीवनातील कठीण काळातून मार्ग दाखवणारे खाली काही श्री गौतम बुद्धांचे  सुविचार –

  1. आपले विचार आपल चारित्र्य घडवतात. आपण जसे विचार करतो तसे आपण बनतो. जेव्हा मन निर्मळ असते तेव्हा सुख सुद्दा सावली सारखं तुमच्या मागे असत.
  2. आपले विचार म्हणजे आपण, आपल्या विचारांनी आपण आपलं  स्वतःच विश्व बनवतो.
  3. तुमाला तुमच्या रागा मुळ शिक्षा नाही होणार ,तुमचा राग तुमाला शिक्षा देईल.
  4. समजा तुमाला  तुमच्या शत्रू ने त्याच्या कार्यक्षत्रेत , विचारक्षेत्र त दुःख दिले असेल तर तुमी स्वतः का त्रस्त होताय  आणि स्वतःच्या मनाला तुमच्या कार्यक्षेत्र आणि विचारक्षेत्र का वेदना देताय??
  5. तुमचा सर्वात दुष्ट शत्रू ही तितके नुकसान नाही करू शकत जितकं तुमचे सैर विचार, वेसण नसलेले विचार करतात.पण जर तुमी आपल्या विचारांवर प्रभुत्व मिळवलं तर तेच विचार आयुष्य भर मदत करतील, तुमच्या आई वडिलांन पेक्षा जास्त तुमाला मार्ग दाखवतील.
  6. जर आपण एका फुलातली, पुष्पांतली  किमया निरखून पहिली तर आपल संपूर्ण आयुष्य बदलेलं.
  7. हजार पोकळ शब्दांपेक्षा, शांती आणणारा एकच शब्द उत्तम.
  8. ध्यान, चिंतन हे विवेक आणि बुद्धी आणते. ध्यान नसले की  अज्ञान येते. आपल्याला पुढे काय नेणार ते नीट समजून घ्या, मागे कोण थोपवून ठेवतय ते बघा आणि ज्ञान चा मार्ग अंगिकारा.
  9. आत्मिक शक्ती बाळगण्या करता तुमाला शारीरिक सामर्थ्य  सुद्दा सातत्याने आणि चातुर्याने  वाढवावं लागेल
  10. तुमी कितीही पावन,पवित्र व पुण्य शब्द वाचा , बोला, जर तुमी ते आत्मसात करत नसाल  किंवा आचरणात आणत नसाल तर त्याने तुमचं काय भल होणार आहे ?
  11. उंच गगनात ,आकाशात उत्तर व दक्षिण  असा काई फरख नसतो , माणसाने आपल्या मनातून ह्या गोष्टी निर्माण केल्या आणि त्या सत्य म्हणहून त्यांचा स्वीकार केला.
  12. मैत्री हीच फक्त द्वेष ,तिरस्कार वर औषध आहे,  शांती करता  एकमेव  उपाय.
  13. स्वतःवर वर विजय मिळवणं, प्रभुत्व मिळवणं  हे हजार द्वंद्व वर विजय होंण्या पेक्षा श्रेष्ठ
  14. कुटुंब असे ठिकाण असते जिथं मन एकत्र येतात, ही मन एकमेकांवर प्रेम करत असतील तर घराच  एक सुंदर  बगीचयात रूपांतर होत , पण  एकमेकांप्रति मनात गोडवा नसेल तर एक वादळ तयार होऊन बगीचा उध्वस्त करेल.
  15. मत्सर,तिरस्कराने मत्सर दूर होत नाही तर निखळ प्रेमाने होत एक शाश्वत सत्य आहे.
  16. जेव्हा आपल्या मनातून रागा ला बाहेर पडणं  अश्यक्य होत , तेव्हा बाह्य जगात  तुमाला कुणी ही शत्रू नसणार आहे.
  17. कोणतीही गोष्ट चिरकाल नसते.
  18. आज आपण काय आहोत हे आपल्या कालच्या विचाराने येते,आपले आजचे विचार आपलं उद्याच भविष्य उभारतात. आपलं मन आपलं आयुष्य रचतो, निर्माण करतो.
  19. वारा,अग्नि, जन्म किंवा मृत्यू  कुणीही तुमचं ,सत्कर्म , पुण्य हिरावु शकत नाही.
  20. जो पर्यंत मनात अढी , मत्सर असेल तोपर्यंत  राग नाहीसा होणार नाही, एकदा कुना बद्दल असलेली अढी मनातून काढून टाका राग क्षणात नाहीसा होईल
  21. मी सर्वाना सर्व मिळो अशी मनोकामना करत नाही पण कुणाकरता तरी काहीतरी बनाव अशी इच्छा आहे.
  22. तुमी संपूर्ण विश्वातून जर शोधलं की  कोण आहे  जो तुमच्या प्रेम आणि जिव्हाळ्या करता  तुमचया स्वतःपेक्षा जास्त लायक,पात्र आहे,, आणि अशी व्यक्ती कुठं च मिळणार नाही. आपण आणि आपण एकमेक स्वतः अशी व्यक्ती आहे जी तुमच्या स्वतः च्या प्रेमा करता आणि जिव्हाळ्या करता लायक आहे.
  23. दुसऱ्या ना क्षमा करण म्हणजे स्वतः शी च चांगलं वागणं
  24. भूतकाळात आणि भविष्यकाळात रममाण होंण्यापेक्षा वर्तमानवर मन के केंद्रित करा
  25. आपलं अंतरंग खुल ठेवा, मोकळं ठेवा आणी जीवन सुसह्य होईल,  ग्लास त टाकलेलं एक चिमूटभर बर मीठ पाणी खारट करेल,पिण्यायोग्य राहणार नाही ,पण एकाद्या सरोवरात चिमूटभर टाकलेल्या मिठान काही  फरक पडणार नाही.
  26. तीन गोष्टी लपू नाही शकत, सूर्य ,चंद्र न सत्य.
  27. तुमी तेच गमवाल ज्याने तुमाला जखडून ठेवलंय.
  28. एक विचार स्वर्ग कड नेऊ शकतो तसाच एक   विचार हा नरक यातना देऊ शकतो.
  29. फक्त कुणी सांगितलं म्हणुन,कश्यावरही वर विश्वास ठेवू नका. शिक्षकांप्रती आदर आहे आणि शिक्षक सांगतात म्हणून ही विश्वास ठेवू नका
  30. प्रत्येक सकाळी आपण पुनर्जन्म घेतो, आज आपण काय आहोत  ते सर्वात महत्वाचे.
  31. आपली जीभ, जिव्हा म्हणजे एक धारधार सुराच, रक्तविहिन मृत्यूच.
  32. कल्पनेला मूर्त स्वरूप दिली तीच खरी कल्पना,  जी  निव्वळ  एक कल्पना म्हणून मनात असते ती निरुपयोगी च.
  33. आपण निव्वळ ऐकताय म्हणहून विश्वास ठेवू नका,  कुणी बोलतंय किंवा  त्यावर चर्चा सुरय म्हणून विश्वास ठेवू नका, आपल्या धार्मिक ग्रंथात , लिहिलंय म्हणून ही विश्वास ठेवू नका.शिक्षक व वडीलधारी सांगतात म्हणून विसुंबून राहु नका. परंपरा ह्या निव्वळ पिढी न पिढी चालत आल्या म्हणून विश्वास ठेवू नका. परंतु गाढ निरीक्षण आणि मीमांसा विश्लेषण केल्यानंतर जर तुमाला वाटलं की हे तार्किक आहे, काही तरी प्रयोजन आहे आणि समस्त मानव जातील , सृष्टीला च त्यात हित  असेल लाभ असेल तरच त्याला स्वीकारा आणि त्या सोबत जगा.
  34. आपण जे बोलणार आहात ते काळजीपूर्वक  निवडा, लोक ते शब्द ऐकतील आणि त्यांच्या वर एकतर चांगला किंवा वाईट प्रभाव पडेल.


check at amazon

1 thought on “श्री गौतम बुद्धांचे आपले विचार आपल चारित्र्य – Buddha quotes in Marathi”

Leave a Comment