श्री संत तुकाराम महाराजांचे भक्ति सुविचार -भाग 2 – Tukaram Maharaj Vichar In Marathi

धैर्य, ओदार्य, निर्मळत्व आणि निर्मत्सरत्व हे असे त्यास नारायण म्हणतात-Tukaram Maharaj Vichar In Marathi

  1. हरी वैकुठांत नाही, तो शेषाच्या ठिकाणी नाही. तर ज्या ठिकाणी वैष्णवांचा अतिदाट समुदाय असतो त्या ठिकाणी भगवंत धांवत जातात. हरि भक्ति प्रिय आहे. भक्तानने नाम घेतल्याने समाधान जो हरी तप, दान, व्रत यज्ञ साधनानी मिळत नाही तो रामकृष्ण हरि गोंविद मंत्राने सहज प्राप्त होतो चौदा भुवने आहेत परंतु तो भक्तीच्या कंठात राहतो. भ्रक्ताचे प्रेम घेतो आणि बदल्यात आपले चित्र देतो. तो निर्गुण, निराकार आहे. अक्ताकरिता नाना अवतार घेतो. भवसागरातून भक्ताला तारण्यासाठी स्वत:ला हजार नांवे ठेवून घेतो. हरी भक्ताचा कणी आहे तो योग्याच्या ध्यानांत येत नाही. पण तो किर्तनात नाचतो.
  1. जेथे जातो तेर्थे तू माझा सांगाती असे. हात धरुन चालवितोस. आमच्या संसाराचा भार सोसतोस हरिनामाचे (भक्ति, ज्ञान, वैराग्य) आम्ही धारण केलेले आहेत ते आम्हास शोभून दिसतात, आमची काया, वाचा, साधने विठ्ठलाची आज्ञा पाळतात. पाप-पुण्याचे कर्माने जन्म मृत्यंचे रहाटघाडगे चालु आहे. माझ्या मनाला नामाचे प्रेम वाटू लागले आहे. रामनाम कंठात असावे हेच मनुष्य जन्माचे हित आहे. त्यामुळे देहभावाचा विसर पडतो. मनांत हरिविषयी प्रेमाचा जिव्हाळा निर्माण होते.
  1. हरी कथेत चित्त नसेल तर ते प्रेतच होय. जे सिध्दी प्राप्त करुन घेतात ते दुर्ब होत. विश्वनरुप परमात्म्याची समाधी साधतात ते दैववान आहेत. भक्ताना मात्र सर्व पाणी गंगाजळ आणि सर्व प्राणी देवरुप वाटतात आम्ही सर्व भगवंता’चे लाडके बालके आहोत. आईच्या गर्भात बाळाचे लाड कोण पुरवितो. जमिनीमधील खोलवर दगडाच्या पोटांत बेडूक असतो त्याचा जीव जगविणारा कोण आहे निवांत राहून जे जे होईल ते ते पहा.
  1. पांडुरंगा मला संतबुध्दी देणारा मार्गदर्शक हो आणि माझ्या मनाला विषयापासून दूर ठेव. माझ्या चित्रांत दुर्गुण अनावर झाले आहेत ते माझ्या वर्तनातून आणि मुखांतून बाहेर पडणार नाहीत असे कर. हे मायबापा माझ्या जीवनाचे स्वरुप, कल्याण या सर्व गोष्टी तुलाच समजतात. मी विषय लोभी आहे तूच माझे रक्षण कर. माशाने गळ गिळला आहे तो परत ओकण्याची शक्ति दे .
  1. बालकाच्या मागे लागतौस व मुखांत ब्रम्हरस घालतोस. देवा माझी विनंती तू आताच आम्हाला मान्य करु नकोस. तुझी चरणसेवा घडेल असे कितीही जन्म दे. जन्मी मी तूझो गुणगाण गाईन विठ्ठल विठ्ठल म्हणत नांचेन. तुझा दास कर. तुझ्याच अंगणात जागा दे या मृत्यूलोकांत आम्हीच तेवढे भाग्यवान आहोत.
  1. तुम्ही जे शिकवले तेच शब्द मी पोपटासारखे बोलत आहे पण जसे शब्द बोलतो तशी अंतकारणाची पारमार्थिक स्थिती बनली गेली नाही. विषय वासनेचा नाश होऊन आत्मस्वरुप स्थिती प्राप्त झाली नाही. बुध्दी स्थिर झाली नाही प्रपंचाच्या पुरात वाहत चालतो आहे हे भगवंता तुझी करुणा भाकत आहे. आम्हाला तूच वाचवू शकशील. तूच माझे डोळे आहेस तू सर्व शक्तिमान आहेस.
  1. चित्तात जे चैतन्य आजवर होते ते मला आता ब्रम्हरुपाने अनुभवास आले. जे जवळ आहे तसे ते दूर आहे. आवडीमुळे ते पुन्हा पुन्हा मजभोवती फिरत राहते. एगदा सेवन केले की पुन: सेवन करावेसे वाटते आम्ही देवावर लोभ ठेवला आणि त्यात्रा विटेवर उभे केले. जन्म-मरणाचे दुःख ठेवून माझा लौकिक का वाढवतोस ? तुझी माझी भेट होत नाही. केवळ बाह्य लौकिकाला काय करायाचे आहे. दासीच्या पोटी जन्मतो त्याला बाप कोण आहे ते कळत नाही. बाहेरचे सोंग व्यर्थ आहे. तुम्ही माझा अभिमान घालविण्यासाठी काहीतरी करा, तुम्ही सर्वज व उदार आहात. काम-क्रोध अद्याप अंत:करणात आहेत देवा तुमच्या चरणाजवळच॰
  1. पांडुरंगा तू अनाथाचा नाथ आहे. थांबत ये. काम, क्रोध, मोह, मत्सर आदी श्वा दपदानी पकडला गेलो आहे मायेच्या भोवऱ्यात सांपडलो आहे. मृगजळात बुडत आहे. तुझ्याशिवाय मला कोण आहे ? मी अनाथ पापी आहे. मला आपल्या चरणापासून दूर करु नका. संतचरणी माझा विश्वामस आहे. माझा स्वामी विठ्ठल मोठा कृपानिधी आहे देवा तूझे दर्शन झाले तर तूझ्या चरणावर माथा ठेवीन
  1. धैर्य, ओदार्य, निर्मळत्व आणि निर्मत्सरत्व हे असे त्यास नारायण म्हणतात. त्याला सर्वेश्वर म्हणतात. सच्छिदानंद एवढा भाग अंगी बाणला तरी सुध्दा मनुष्य ईश्वरप्रत जातो. नारायणाची लक्षणे सुध्दा प्रयत्नाने आणता येतात.
  1. प्रथम सच्दानंद आत्मसात करावे. देवाला आपल्याबद्दल आपुली वाटेल असे गोड भाष्य करुन भगवंताला वश करु आपण देवाचे संगतीने देवासारखे होऊ, शास्त्र शिकण्यात मन. नसेल तर त्या भानगडीत पडू नये. अध्यात्मशास्त्र ठिकाणी मन स्थिर केल्यावर देव आपणांपासून कोठे जात नाही. निवांत मनांत देव निवांतपणे राहतो. मन हालण्यामुळे तो हालतो.
  1. अंधारात समजून न घेता, विष घेणे आत्मघात होय. ‘बुध्दी कर्मानु सारणी’ या सिध्दीप्रमाणे वाईट घटना घडतात. मन शृध्द करण्यात आपले हित आहे. प्रसंगाने लक्षांत ठेवून मन शुध्द करावे. मृत्यूनंतर संचित कर्मावाचून कोणीही तुम्हास सोबत करणार नाही. वेळ आहे. तोपर्यंत सत्कर्म, परमार्थ करा. दिवसामागून दिवस जात आहे माझे माझे काय म्हणतोस ‘इदे न मम’ म्हणा भगवान विठ्ठलास शरण जा.
  1. प्रारब्धाने धन प्राप्त होते व मान मिळतो. पोट देखील प्रारब्धानेच भरते. म्हणून मी व्यर्थ माझे गाऱ्हाणे सांगत नाही, देवा माझे मन चंचत्न आहे ते तू स्थिर केल्याशिवाय शांत होत नाही. भगवंताचे नाम स्मररल्याने गाणिका वेश्या आणि अजामेळासारखे पापाच्या राशी तरुन गेले, शिळा झालेली अहिल्या तरली. हिरण्यकस दैत्यामुळे पृथ्वी पाताळात चालली होती ती भगवंतानी तारली आता आम्हाला तारने काय अवघड आहे ?
  1. कोणास कसे ठेवावे याची सुत्रे विड़लाच्या हाती आहेत. कांही धनवंताना विविध असाध्य रोग असतात. पूर्वजन्मातील पापात्मक संचित असते. भेद आणि अभेदाचा घोळ सोडून नारायणाचे स्मरण कर. नाम साधनेने सर्व गोष्टी पूर्ण होतात, आणि अच्युताशी ऐक्य होते. कोणताही साधक भक््ति वाचून संसार सागर पार करु शकत नाही हेच परमार्थाचे सार आहे आयुष्य क्षणाक्षणाला जात आहे. विध्वत्तेचे भूषण आणि भक्तिचा दंभ माणसाला नागवीन असतो.
  1. भगवंताजवळ मोक्ष नाही तो तुझ्या ठिकाणीच आहे. हे साधका तू देहाचा खोटा अभिमान धरुन बसला आहे. आत्मस्वरुप विसरलेला आहे. आपण कोण समजत नाही देवाला आपल्रेसे करुन घेतल्याखेरीज जीवास संतोष प्राप्त होणार नाही. देवावाचून सर्व मायिक दु:खदायक आहे. चित्ताला गोविंदाचे वेड लावावे. देवाला ज्याने आपले केले आहे. जाणले आहे. त्याला एकदाच मरण आहे पुन्हा जन्मास येत नाही. त्याच्या पश्यात उत्तम कीर्ती राहते.
  1. श्रेष्ठ माणसाबरोबर गाठ पाडून घ्यावी. भेकडासारखे मनांत भय धरु नये. अगदी अटीतटीने शत्रूशी भांडावे. मोठ्यांशी मोठे होऊन आंडावे. तरच त्याला शूर म्हणतात. अज्ञान-अंधकाराचे ज्ञानदृष्टीवर आलेले पडदे विठ्ठलाने नाहीसे केले आहे. म्हणून जग ब्रम्हानंदाने भरले आहे. विविध तापाने ज्रासलेल्या मुढास नारायण स्मरणाचे औषध उत्तम आहे. त्यामुळे संसाररुपी रोगांचा समूळ नाश होतो. व्यथा, भोग त्वरीत बरे होतात.
  1. दरिद्री माणसास अचानक धन मिळाल्यास त्याचे रक्षण त्याला करता येत नाही. आपण्‌ मला मुक्तीे भक्तीे कांही दिले तर त्याचे रक्षण करण्यास मी असमर्थ आहे. दुर्बळास धन भोगता येत नाही. फकत तळमळ राहते. माझ्यात भक्ति होती, भाव नसल्याने पारमार्थिक नुकसान झाले. मी स्वत:ला लोकमान्य करण्याकरिता दुसऱ्यांच्या गुण दोषांचा विचार मनांत आणतो. देवा माझी कोबंड्यासारखी स्थिती झालेली आहे. आपल्या पायाने उकिरडा उकरुन मागे फेकतो पण त्यातील खाद्यपदार्थ मागे पडतात. तयाचा लाभ त्याला कळत नाही पुढे उकरत राहतो, देवा बुच्दि दे माझे हित मला अनुभवला दे.
  1. आपले अंत:करण खरे शुध्द आहे किंवा नाही हे अंत:करणाने, विश्वारसाने सांगावे लागते. या संदर्भात एकाने दुसऱ्याचे सांगणे नको, आपण बोलतो तशो मनाची अवस्था असावी. त्याप्रमाणे त्याचा परिणाम होतो. सर्व प्राणीमाञरात भगवान आहे हे प्रार्थना करुन शब्दज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घ्यावासा वाटतो. ज्याकारणे नारायणाचा योगक्षेम होईल त्याचे वर्म शोधून घ्यावे.
  1. केवळ वारकरी लोकासाठी नव्हे तर दुर्बळ, शक्तिहीन असलेल्यासाठी हा देव विटेवर उभा आहे. ज्यांच्या अंत:करणात विठठल देव आहे त्यास रोकडा मोक्ष आहे. मला भगवंताचे गुह्य ज्ञान झाले आहे की त्यामुळे माझा प्रपंच विषयभ्रम झाला आहे. मी आनंदी आनंद आहे माझ्या अंत:करणात नारायण नामाचे चिंतन स्थिर झाले आहे. माझ्या ठिकाणचा भेदभाव नष्ट झाला आहे त्यामुळे माझा देह, प्रपंच अप्रिय वाटू लागला आहे.
  1. ज्याला कसलीही इच्छा नाही व जो सुख दु:खादी द्वंद्व रहित आहे अशा देवाचा मी दास आहे. तो पांडुरंग त्याच्यावर माझा पोषणाचा भार आहे त्यालाच माझी काळजी आहे आणि माझे हित करणारा तोच आहे. चुकीचे मार्गाने जाणाऱ्याला योग्य मार्गावर लावावे अशी कठोर बोधवचने धर्मनीतीचे आहेत सांगूनही दुराचाऱ्याने उपदेश ऐकला नाही तर त्याला खुशात्र शासन करावे तसे करण्यांत ताप तर नाहीच उलट पुण्यच आहे. कडलिंबाच्या रसाने देहाच्या आतील रोग बरे होतात.
  1. भगवान नारायणाने माझे जीवन सुखाचे आणि आनंदाचे केले आहे. बसल्या ठिकाणी आनंदाचे भांडवल प्राप्त झाले असून भीक मागण्याची जरुरी नाही. आजवर मी तुमचे चिंतन केले आहे. तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे ब्रम्हरसाचे एकदाच भोजन दिल्यानंतर वरचेवर तुम्हास कांही मागणार नाही. हे आई विठाई शेवटचा आनंदाचा गोड घास मला खाऊघाल.
  1. ज्याक्षणी माझे जीवन (जीवभाव) अर्पण केले त्याच क्षणी जौभावाचा आश्रय, अज्ञान ते मी सोडून दिले आहे हे भगवंता आता या संसारात तुझ्या सत्तेने सर्व व्यवहार करीत आहे. देवा आता माझ्या ठिकाणी ‘मी’ आणि माझे हे उरले नाही. तुमच्या कृपाप्रसादाचे अभयदान द्या. आपला वरदहस्तमाझ्या डोक्यावर ठेवा. ‘मिऊ नको, भिऊ नको’ असे म्हणून माझे अंत:करण शांत करावे॰
  1. एखादया खाद्यपदार्थात मीठ नसले तर तो पदार्थ फिका वाटतो. अनुभवावाचून बोलणे म्हणजे पोकळ बडबड होय. कोणते बी खोलात आणि ओलाव्यांत पडले म्हणजे उत्तम पीक येते उथळ पेरणी वाया जाते. श्रम होतात,पोट भरण्यासाठी परमार्थ करतात तो दंभ होय. चांगले सोने अग्नीत सतेज होते ते शुध्द होय. जो परमार्थ अनंभवाच्या कसाला उतरतो तोच खरा असतो.
  1. हरिप्रेम हे सांगता, बोलता किंवा दाखविता येत नाही. त्या प्रेमाचा चित्तात्रा येणारा अनुभव चित्तच जाणू शकतो. कासवीचे पिलू हे तिच्या कृपा दष्टीने वाढते. त्याला स्तपान संबंध होत नाही. मुक्या माणसास खारट गोड सांगता येत नाही तरी मनातील भेद त्याला कळतो हरिप्रेम कसे असते हे शहाण्याने विचारु नये. अनुभव घेऊन विचार करावा. देवा मला वृत्ती शुन्‌य आत्मस्थिती नको. त्याचा विचार नको, तुझ्या चरणाची अखंड सेवा दे.

Source  – श्री .मारुति रामचंद्र सोनार तुकाराम महारांजांचे 1000 सहर्‍त्र विचार 

श्री संत तुकाराम महारांजांचे विचार हे  लेखक :श्री .मारुति रामचंद्र सोनार तुकाराम महारांजांचे 1000 सहर्‍त्र विचार ह्या पुस्तकातील आहेत  –

ई- साहित्य प्रतिष्ठान कडून पूर्व संमतीने  हा लेख ह्या ब्लॉग वर प्रकाशित.

पुस्तकांची पर्वणी अश्या  esahity ह्या संकेतस्थळा भेट देवून मराठीभाषेला समृद्धा करण्यात आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यात सर्वांनी आपला वाटा उचलावा.


check at amazon

Leave a Comment