श्री संत तुकाराम महाराजांचे भक्ति सुविचार – Sant Tukaram quotes in Marathi

जे भोग प्राप्त होतात ते देवाचे चरणी अर्पण करावेत यालाच सहजपूजा म्हणतात – Sant Tukaram quotes in Marathi

 • सुंदर ते ध्यान उभे विटेवरी – विठ्ठल उभा आहे. सुंदर आहे. तेच ध्यान मला सतत आवडते. तेच माझे सर्व सुख आहे. तेच मी सतत मनन करीत राहीन
 • आपणास गोड गळा नसला तरी चालेल. पांडुरंग त्यासाठी भुकेलेला नाही.आपणास येईल तसा “रामकृष्ण” श्रष्ठेने निष्ठेने व प्रेमाने देवांजवळ म्हणावा. हा देवाच्या आवडीचा, भक्तीचा , प्रेमळ क्षणाचा मार्ग आहे.
 • जो क्रोधरुपी चांडाळास स्पर्श करतो त्याचे आचरण शुध्द नाही. वेडेपणाने संत सेवा, हरिभक्ती केली नाही त्याचेच अहित होते. तुकाराम म्हणतात जे संताचे दास असतील, त्याचा मला दास करा मग मला खुशाल गर्भवास होवे. नापसाधना सतत मुखांत असावी तुझ्या सेवेची ईच्छा माझी प्रार्थना आहे.
 • मानसपूजा – लौकिक पूजेचा दंभ करण्यापेक्षा देवाची मानसपूजा करणे उत्तम. परमार्थात अवडंबर काय कामाचे ? देवास मानसपूजा समजते व आवडते. बीज तसे फळ. ज्या भजनाने खरे समाधान होते त्यामुळे भवसागर पार करता येतो. अघोरी भजनाने फायदा, तोटा होतो. चांगले फळ मिळत नाही.
 • जे भोग प्राप्त होतात ते देवाचे चरणी अर्पण करावेत यालाच सहजपूजा म्हणतात. त्यासाठी मीपणाचा त्याग करावा. सर्व भोगाचा मी भोक्ता नाही, असा अभिमान ठेवला नाही तर देव आपल्यापासून भिन्न नाही.
 • पाणीच जर स्वच्छ नसेल साबण वापरून काय उपयोग. चित्र शुध्द नसेल कतर आत्मबोध करणे व्यर्थ आहे. झाडालाच फूल फळ नसेल तर वसंतक्रुतू काय करील ? पती नपुंसक तर पत्नीने काय करावे. जीव गेल्यावर देहाचे व्यवहार कसे होणार. पाण्याविना धान्य उगवत नाही चित्रशुध्दी विना आत्मबोध व्यर्थ आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित जीके प्रश्न आणि उत्तरे

 • शेतीमध्ये एक बीजापासून अनेक बीजाच्या कणसाची प्राप्त होते. साधना केल्याशिवाय कोणतेही साध्य लाभत नाही. प्राणखर्ची घातल्याशिवाय कोणताही फायदा मिळत नाही. युध्दांत मरणानंतर स्वर्ग आणि इहलोकात कीर्ती मिळते.
 • ज्याला अवगुणाची बाधा आहे त्यास सरळ सुध्दा वाकडेच दिसते. योग्य अयोग्य ठिकाणाचा सुध्दा विचार न करात कुत्रे भुंकते, दुर्जनांच्या सहवासाने व पंगतीने परमार्थ नासला जातो. दुष्ट लोक अमंगल बोलतात संताची निंदा करता, तो मातृगामी आहे.
 • मनाच्या अप्रसन्नतेने माणसाचे कोणतेही काम होत नाही. दुराग्रह करणे वेडेपणाचे आहे. स्त्रीविषयी काम आणि धनाविषयी लोभ हे दोन्ही नरकावस्था भोगणारी आहेत. परत्मयांची चिंतनाने सेवा करा विदेह मुक्ती् मिळते.
 • वाफशाच्या वेळी शेतकरी घरात मढे (प्रेत) ठेवून शेतात पेरणीसाठी जातो.अति दक्ष असतो.सहज नर देहप्राप्त झाल्याने संसारातील सर्व गोष्टी बाजूस ठेवून खरोखर आपले हित ज्यात आहे असा परमार्थ करण्याची त्वरा करावी. काळ कोणत्याही वेळी येऊ शकतो. निर्धार करा त्वरीत स्वहित करा. संसारी पाशातून सुटका करा तोच शहाणा पुरुष होय.
 • निर्गुण निराकार ईश्वराला सगुण रुपामध्ये आणून सर्वाना भक््तियसाधने करितां सुलभ केला आहे. प्राथनेमुळेच तो सगुणांत आलेला आहे. विठल नाम हेच आमचे भांडवल, मनाचे व्यवहार आनंदमय होत आहेत संतोषामुळे देहाला पुष्टी येत आहे. आत्मनिवेदन भक्तीमुळेसर्वांना मी व्यापून आहे.
 • स्वत:स ज्ञान नाही अनुभव नाही असे ढोंगी लोक फसवित असतात. असे लोक अधोगतीस जातत. कोणत्याही गोष्टींचे स्वरुप पूर्णपणे समजून घेऊन चित्तात ठसेल अशा पध्दतीने, श्रध्देने व प्रेमाने केल्याशिवाय त्यापासून फळ प्राप्त होत नाही. अन्न पाहून भूक लागत नाही. हरिकथा समजून ऐकून अंत:करणांत कायम राखावी. साधना समजून साधना केल्याशिवाय सफत्र होत नाही.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त GK प्रश्न आणि उत्तरे

 • सर्वभूतेही देवच आहेत अशी शास्त्र मर्यादा आहे. आपल्या ठिकाणची थोरवी ओवाळून पलीकडे फेकून दे. भक्तिसाठी मनापासून त्याग केला पाहिजे. एक शूर योध्दा व्हा अथवा संसाराचा मजूर व्हा. आपल्या पुढे कोणीही असला तरी तो माझा देव आहे अशी भावना ठेवा म्हणजे आपले शैक्षण्कि जीवन सफल झाले असे.
 • आम्ही द्रव्य निषिबध विटाळ मानले आहे. त्याच्या मागे काळ सारखा पाठलाग करीत असतो. म्हणून द्रव्याचा स्नेह करणे फार वाईट आहे. नरकाचे मूळ द्रव्य आहे. आपल्या प्रारब्धतील दु:ख चुकत नाही. परमार्थाचे श्रवण करुन परमार्थ करावा.
 • आपले रुप आपण समजून घ्या विनाकारण आरशावर रागावून काय उपयोग ? कोणतीही व्यक्तीु चांगली किंवा वाईट असते ते देहतादात्म्यामुळे वाटते. सुंदरपणा देवाची कृपा आहे. परमार्थात सत्याचा विचार केल्यावाचून प्रवेश नाही.
 • कोणतीही गोष्ट निर्धाराने, निश्चयाने करणे मोठे रूचकर असते व त्याचे कोड कौतुक वाटते. आम्हास आश्वासनाचा आधार देऊन आपल्याविषयीचे प्रेम दयावे. आम्ही आकृती मार्गात पडलो. देहाहंकार नाहीस झाला देवा. मला आपणापासून दूर करु नका.
 • कळत अजून प्राणी भ्रमात पडतात. मासा गळाला लावलेल्या खाद्यपदार्थाच्या आशेने फासा गळ्यांत लावून घेतो. त्याप्रमाणे संपत्तीचा लोक माणसास भ्रमात पाडतो जसे प्रारब्धांत असेल तशीच बुध्दी माणसाला होते कळत असुन सुध्दा अमित होऊन तो कर्म करतो. कर्म मोठे बलवान आहे. त्यांचे लिखित खोटे होत नाही.
 • अनेक दुराचारी माणसे दुराचाराचा त्याग करीत नाही आणि जीवाचा नाश करुन घेतात. त्याची त्याना शरम वाटत नाही. दुर्जनाचे कर्म बलवान असल्याने त्याना दुसरे विचार सुचत नाही. विष्णु भक्तास हरिभक्तींची सोयी आहे. सर्व संसार विठ्ठलरुप आहे असे समजून संसार ब्रम्हरुप केला असे. सर्व लोकासह नेहमी हरीचे प्रेमसुख भोगुया
 • चांगली वाईट गती प्राप्त होणे मनाचे कोशल्य आहे. त्याला एकांतवास करणाऱ्या साधूच्या संगतीत लावा. मन संभाळा. ते ओढाळपणाने विषयाकडे धांवते.
 • मानापणात ह्या मनांच्या कल्पना आहे. ज्या ध्यानाची गोडी लावावी तेच ध्यान करणे. तुका म्हणे या भवसागरांतून मनच पार करते, बंधन घालणारे सुध्दा मनच आहे.
 • खरेपणाचे आचरण नेहमी खरे फळ देते. पंचमहाभूतापासून देह झाला. मायेने अहंकार जीवात्म्याच्या मागे लावला असे. जड देहाशी जीवात्म्याचा संबंध नाही. काळाचा घास असणाऱ्या या देहाचा लोभ का धरता ? जीवाला मरण नाही.जीर्ण होताच नवे धारण करतो. पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा भोग घेणे हे नवीन देह धरण्याचे कारण आहे. तुका म्हणे वासनेमुळे जन्म-मरणा’चा वेळ विस्तार वाढतो. वासना पूर्ण नषूट करावी हे मोलाचे खरे बोल आहे. ब्रम्हस्थिती प्राप्त होईल
 • घरचे देव कोपऱ्यांत फेकून रस्त्यावरील दगडाच्या देवाची पूजा करितो हे सर्व माकडाचे छंद आहे. काम क्रोध चोरापासून सावध रहा. जसा भाव, श्रध्दा असेल तसे त्यांचे वर्तन देव त्याजबरोबर ठेवतो आणि खोट्याचे वाटोळे खोटेपणानेच होते. खरेपणा देवाला अंत:करणापासून मान्य आहे.
 • अगा पांडुरंगा मला तम लहानपण दे कारण मुंगी लहान प्राणी असल्याने त्यास साखर खावयास मिळते. हत्तीस साखर न मिळता अकंशाचा मार मिळतो. त्याच्या ठिकाणी थोरपण त्याला अनंत यातना भोगाव्या लागतात. लहानपण सर्वात चांगले. महापुरांत मोठे झाडे वाहून जातात तेथे लहान लव्हाळी तग धरुन राहतात. पोहणारा नभ्ष झाल्याने सागराच्या प्रचंड लाटा त्याच्यावरुन निघून जातात. नमता हेच मुख्य वर्ण आहे.
 • आम्ही श्रेषूठ अन्नदान केले आहे. सर्व कर्म व त्याचे फळ हरीला अर्पण केले आहे. ब्रम्ह बोलण्याचा विषय नाही कारण कायेने वाचेने मनाने आम्ही श्री हरीपासून वेगळे राहिलो नाही. आंब्याला जेवढा मोहर येतो तेवढी फळे लागत. नाहीत. लागलेली पैकी थोडीच परिपक्व होतात तसेच परमार्थात पुष्कळलागलेली असतात पर श्रीहरीचे दर्शन एकाद्‌यासच प्राप्त होते.
 • देह मी आहे. असा अहंकार नाहीसा झाल्यावर जीव विठ्ठल रुपाने उरेल. जीव अर्पण केल्याने हृदयात देव प्रकट होईल जो विषय विषयी लोभी आहे तो आत्मघातकी आहे त्याला झिऊ नकोस. वेदाभ्यासी याजिक पुण्यामुळे स्वर्ग मिळवितात व पुण्य संपताच परत जन्म मृत्यू लोकांत येतात हा खरा परमार्थ नाही.
 • देवाच्या ठिकाणी वासना ठेवून ब्रम्हजान आम्ही तुच्छ मानतो. आम्ही मुले देवाचे प्रेमसुखाची हट्ट करणारी आहोत. उत्तम नरदेह प्रापत झाला असता परमार्थ सोडून संसार करणे वेडेपणाचे आहे. स्वहितासाठी अंत:करणात प्रेमामृताच्या धारेचा जिव्हाळा पाहिजे. देवा व्यतिरिक्त अन्य कल्पना करु नका तुका म्हणे जी शांती सर्व प्राणीमात्रांपर्यंत प्राप्त होते ती मी खात्रीने योजलेली आहे.
 • जगांत आपल्या अनुभवाचे खरे वर्ण कोणासही सांगु नकोस, आपल्या अज्ञानीपणाचा अम कायम ठेवा. सर्व नारायणाच्या निर्मितीनुसार घडत असते. वाघांच्या भुकेसाठी आईचा वध करुन खाण्यास देणे. पुण्यकर्म होईल काय ? पुढे स्पष्ट केलेल्या विचाराने अपूर्ण सुखाची प्रापती होते. सारे जग परमात्म्याचे स्वरुप आहे. या निष्ठेने केलेली पूजा फलद्रूप होते. दरीला एकदेशी समजून केलेली पूजा व्यर्थ जाते.
 • यज्ञ, दान,तप,ध्यान समाधी विवेक वैराग्य यापैकी कोणतेच साधन शक्यय नाही. ते लोक वाया जातात परंतु अशासाठी श्रीहरीचे चिंतन करणें हेच सुलभ साधन आहे. यात काही श्रम करावे लागत नाहीत. मरण प्रसंगी सर्व उपाय थांबतात. तुका म्हणे – सर्व जनहो हरीचिंतनाचे ठिकाणी तुमचे मन ठेवा.
 • एका भगवंतापासून ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र चार वर्ण निर्माण झाले. पापपुण्याच्या भागाने वाटले गेले सर्वाचा आधार श्रीहरी, आदी, मध्य, अंत भेद नाही. ज्याप्रमाणे आंबा, बाभूळ, चंदन वृक्षातील गुण-अवगुणाचे अनेक भेद आहेत पण त्यांचा अग्नीबरोबर संबंध आल्यास ते एकच होतात. तुका म्हणे जोपर्यंत मन उन्मन अवस्थेत झाले नाही तो शास्त्राच्या विधीमार्गानेच वागले पाहिजे.
 • जे साधक तप, तीर्थ, दान, व्रत आचरणारे व हरिगुण गाणारे असतील त्यांना त्या त्या साधनापासून दूर करु नये. परमार्थी लोकास साह्य करावे, भय घालू नये. साह्य करण्यांत पुण्य मिळते. भय घालण्याने व्यर्थ हानी होते.
 • लोक तीर्थयात्रा करुन, नाना तपे करुन अहंकाराने गुरगुरतात. खोटा अभिमान धरतात. परंतु वैष्णव निराभिमानी असतात ते एकमेकाचे पाया पडतात.

श्री संत तुकाराम सुविचार भाग 2

 

Source  – श्री .मारुति रामचंद्र सोनार तुकाराम महारांजांचे 1000 सहर्‍त्र विचार

श्री संत तुकाराम महारांजांचे विचार हे  लेखक :श्री .मारुति रामचंद्र सोनार तुकाराम महारांजांचे 1000 सहर्‍त्र विचार ह्या पुस्तकातील आहेत  –

ई- साहित्य प्रतिष्ठान कडून पूर्व संमतीने  हा लेख ह्या ब्लॉग वर प्रकाशित.

पुस्तकांची पर्वणी अश्या  esahity ह्या संकेतस्थळा भेट देवून मराठीभाषेला समृद्धा करण्यात आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यात सर्वांनी आपला वाटा उचलावा.

Leave a Comment