गौतम बुद्धांच्या या 15 गोष्टी लक्षात ठेवल्यास नेहमी सुखी राहाल..- 15 Buddha quotes on Happiness and success Marathi

गौतम बुद्धा –  15 Buddha quotes on Happiness and success

बौद्ध धर्माचे संस्थापक “गौतम बुद्ध” यांनी आपल्या प्रवचनांमध्ये आयुष्य सुखी आणि यशस्वी बनवण्याचे विविध सूत्र सांगितले आहेत. या सूत्रांचा जीवनात अवलंब केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. जाणून घ्या, बुद्धांचे 15 अनमोल विचार…

गौतम बुद्ध- –  15 Buddha quotes on Happiness and success

 1. जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.
 2. पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते; परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दु:खकारक असते.
 3. माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
 4. अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो. तो ज्ञानाने नाही तर आकाराने वाढतो. म्हणुन शक्य होईल तेवढे अशा लोकांपासून लांब रहा.
 5. निघून गेलेल्या काळात ध्यान केंद्रित करू नये. भविष्यासाठी स्वप्न पाहू नयेत तर बुद्धीचा वापर वर्तमानात केंद्रित करावा.
 6. प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्य आणि आजाराचा लेखक आहे. यामुळे आहार आणि दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्यावे.
 7. या संसारात आनंद आणि दुःख स्थायी असू शकत नाही. तुम्ही अंधारात असाल तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे.
 8. तुम्ही तुमच्या क्रोधासाठी दंडित होत नाहीत तर तुम्ही तुमच्या क्रोधामुळेच दंडित होता.
 9. ज्याप्रकारे मोठे वादळाही मजबूत दगडाला हलवू शकत नाही, त्याचप्रकारे संत स्वतःच्या कौतुक आणि आलोचनेने प्रभावित होत नाही.
 10. मनच सर्वकाही आहे, तुमची जसा विचार करता तसेच बनता.
 11. जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात
 12. जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.
 13. जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग जीत नेहमी आपलीच होणार, ही जीत तुमच्याकडून कोणीच हिसकावून घेऊ शकणार नाही.
 14. क्रोध पाळणे हे गरम कोळसा इतरांच्या अंगावर फेकण्यासाठी हातात धरल्याप्रमाणे आहे, यामुळे आपला हातही भाजतो.
 15. संशयी स्वभाव अत्यंत घातक राहतो. हा स्वभाव दोन चांगले मित्र, प्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो. यापासून दूर राहावे.

 

श्री गौतम बुद्धांचे सुविचार 

Leave a Comment