रोजर फेडरर बायोग्राफी -Roger Federer Biography in Marathi

रोजर फेडरर बायोग्राफी :

रोजर फेडरर हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकले असेल,पण तुम्हाला रोजर फेडरर यांच्या जीवनाबद्दल माहिती आहे का ?? आपण या लेखात त्यांच्या जीवनाबद्दल माहिती पाहणार आहोत…

रोजर फेडरर कोण आहेत ?

 • रोजर फेडरर हे अवघ्या 11 वर्षाच्या वयात देशाच्या ज्युनियर टेनिस खेळाडूंमध्ये होते.
 • ते 1988 साली प्रोफेशनल खेळाडू बनले आणि 2003 मध्ये विंबल्डन जिंकून ग्रॅण्ड स्लॅम किताब जिंकणारे पहिले स्वित्झर्लंड खेळाडू बनले.
 • रोजर फेडरर यांच्या नावे 20 ग्रँड स्लॅम ‘किताब जिंकण्याचा रेकॉर्ड आहे,2017 साली रेकॉर्ड मोडत आठवा विबलंडन त्यांनी जिंकला.

सुरवातीचे जीवन-

 • टेनिस खेळाडू रोजर फेडरर यांचा जन्म 8 ऑगस्ट 1981 साली स्वित्झर्लंड मधील बासेल येथे झाला.
 • त्यांच्या वडिलांचे नाव रॉबर्ट फेडरर आहे,तसेच थांच्या आईचे नाव लीनेट डू रैड आहे.फेडरर यांच्या आईवडिलांची भेट ते काम करत असलेल्या फार्मस्तुकल कंपनी मध्ये झाली.
 • फेडरर याना कमी वयापासूनच खेळामध्ये आवड होती.आठ वर्षाच्या वयामध्ये ते सॉकर आणि टेनिस खेळत होते.11 वर्षाच्या वयातच ते स्वित्झर्लंड मधील ज्युनियर टेनिस खेळाडूंध्ये शामिल होते.
 • 12 वर्षाच्या वयात त्यांनी बाकीच्या खेळांना सोडून फक्त टेनिस वरती फोकस करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांचे टेनिस खेळामध्ये प्रदर्शन वाढले.
 • ते त्याकाळी एका महिन्यात दोन-तीन टेनिस लीग खेळायचे.त्यांना अभ्यास करायला ही आवडायचा, त्यामुळे ते आठवड्यात सहा तास अभ्यास करायचे.
 • आपल्या खेळाला सुधारण्यासाठी ते बोरिस बेकर आणि स्टीफन एडबर्ग यांची नकल करायचे.
 • 14 वर्षाच्या वयात रोजर फेडरर स्वित्झर्लंड मध्ये राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियन बनले आणि त्यांची प्रशिक्षणासाठी निवड ‛स्वित्झर्लंड नेशनल टेनिस सेन्टर’ मध्ये करण्यार आली.
 • 1998 मध्ये त्यांनी ज्युनियर बिंबलदन यानी ऑरेंज बाउल चा किताब जिंकला.त्यांना तेव्हा आई.टी.एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन ऑफ द इयर म्हणून निवडले.

रोजर फेडरर यांचे टेनिस करियर –

 • रोजर फेडरर यांनी 1998 मध्ये बिंब लंडन चा किताब जिंकला.2001 मध्ये विब लंडन येथे चोथ्या फेरीत चालू एकल चॅम्पियन पिट संप्रस ना हरवून आपली ओळख जगाला दिली.
 • 2003 मध्ये रोजर फेडरर ग्रँड स्लॅम ‘किताब जिंकणारे पहिले स्वित्झर्लंड खेळाडू बनले
 • .2004 च्या सुरवातीला फेडरर यांची विश्व रँकिंग दोन होती आणि त्याच वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन,यु.एस ओपन,ए.टी.पी मास्टर जिकले आणि विब लंडन चा किताब परत आपल्या नावी केला
 • .2005 च्या सुरवातीला ते विश्व रँकिंग मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचले.रोजर फेडरर हे 2004 पासून ते 2008 पर्यंत विश्व रँकिंग मध्ये पहिल्या स्थानावर कायम राहिले.
 • 2006 आणि 2007 मध्ये त्यानी ऑस्ट्रेलियन ओपन,विब लंडन आणि यु.एस मध्ये एकल चॅम्पियन शिप जिंकली.लोरीयस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर चा अवॉर्ड त्यांना भेटला.
 • 2008 वर्ष त्यांच्यासाठी थोडे कठीण गेले.ते फ्रेंच ओपन आणि विब लंडन दोन्हीही राफेल नाडाल यांच्याकडून हरले आणि 2008 ऑस्ट्रेलियन ओपन एका युवा टेनिस खेळाडू नोवाक जॉकीविच यांच्याकडून हरले.
 • 2004 पासून 2008 पर्यंतच्या मोठ्या काळात पहिल्यांदा त्यांची विश्व रँकिंग एक वरून दोन वर आली.
 • 2008 च्या खराब प्रदर्शनातुन त्यांनी स्वतःला बाहेर काढले आणि 2009 हे परत त्यांच्यासाठी चांगले गेले.त्यांनी रॉबिन सोडर्लिंग यांना हरवून फ्रेंच ओपन जिंकले आणि विब लंडन फायनल मध्ये इंडी रोडीक ला हरवून 15 वेळा ग्रँड स्लॅम चा किताब आपल्या नावी केला आणि ह्याच वर्षी 15 वेळा ग्रँड स्लॅम ‘किताब जिकून संप्रस याना मागे टाकले.परत चांगले प्रदर्शन करून त्यांनी परत पहिले स्थान पटकवले.
 • 2016 मध्ये 6 महिन्याच्या इंजरी मधून सावरत त्यांनी विजयी सुरवात केली.ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये राफेल नाडाल यांना हरवून 18 वेळा ग्रँड स्लॅम चा किताब जिंकला.
 • 2017 मध्ये मारिन सिलीच याना हरवून आठव्यांदा विब लंडन चा किताब त्यांनी आपल्या नावी केला.वर्ष 2018 मध्ये त्यांनी परत सिलीच ला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले.

रोजर फेडरर फौंडेशन ची स्थापना-

2003 मध्ये रोजर फेडरर यांनी रोजर फेडरर फौंडेशन ची स्थापना केली.गरीब लोकांना मदत करणे,गरीब लोकांच्या मुलांना शिक्षणामध्ये आणि खेळामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करणे,यांसारखी चांगली कामे रोजर फेडरर फौंडेशन करते.यावरूनच आपल्याला समजते की रोजर फेडरर हे एक चांगले खेळाडू असण्याबरोबर एक चांगले व्यक्ती ही आहेत.

लेखक –

Leave a Comment