वॉल्ट डिजनी बायोग्राफी मराठी
तुम्ही आयुष्यात मिकी माउस हा शब्द नक्की ऐकला असेल.आपण लहानपणी मिकी माउस चे कार्टून पाहायचो.लहानपणी मिकी माउस खूप प्रसिद्ध कार्टून होते.अजूनही लहान मुले मिकी माउस ला हॉलिवूड चित्रपटात पाहतात.त्याच मिकी माउस ची निर्मिती केलेल्या वॉल्ट डिजनी यांचे जीवनचरित्र आपण या लेखात पाहणार आहोत.
वॉल्ट डिजनी हे एक निर्देशक,निर्माता आणि अनिमेटर होते.त्यांनी निर्माण केलेली फिल्म मेकर कंपनी हॉलिवूड मधील टॉप च्या कंपन्या पैकी एक आहे.
वॉल्ट डिजनी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1901 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला.
त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. – वॉल्ट डिजनी बायोग्राफी मराठी
- 16 वर्षाच्या कमी वयातच वॉल्ट डिजनी यांनी घरातून पेपर विकायला चालू केली,याबरोबरच ते शिक्षणही करू लागले.त्यांना लहानपणापासूनच कार्टून ची आवड होती.त्यांना स्वतःहून एक कार्टून बनवायचे होते.
- सुरवातीला वॉल्ट डिजनी याना कार्टून बनवायचे काम एका सलूनच्या मालकाने दिले.सलून मालकाच्या म्हणण्यावरून वॉल्ट डिजनी दररोज नवीन कार्टून चित्र बनवायचे आणि सलून मालक ते कार्टून चित्र आपल्या दुकानाबाहेर लावायचा.
- सलून मालकाचे गिर्हाईक वाढू लागले.या बदल्यात वॉल्ट डिजनी याना 25 सेंट मिळायचे.या पैशातून वॉल्ट डिजनी यांचा शिक्षणाचा खर्च भागायचा.
- द्वितीय वर्ल्ड वॉर च्या वेळी वॉल्ट डिजनी हे रेडक्रॉस मध्ये चालकाचे काम करायचे.नंतर हे काम ही त्यांनी सोडले.त्यानंतर त्यांना एक जाहिरात कंपनीमध्ये आर्टिस्ट च्या पदावर नोकरी मिळाली.ह्याच कंपनीमध्ये काम करता करता ते कार्टून बनवू लागले.
- त्यांनी बनवलेली कार्टून्स फेमस होऊ लागली.हिथुनच वॉल्ट डिजनी ही प्रसिद्ध होऊ लागले.
मिकी माउस बनण्याची कहाणी – Walt Disney Biography in Marathi
- वॉल्ट डिजनी यांनी नंतर हॉलिवूड मध्ये कार्टून बनवण्याचे ठरविले.ह्यासाठी ते आणि त्यांचा भाऊ मिळून कार्टून फिल्म बनवायला लागले.इथेच जन्म झाला मिकी माउस कैरेकटरचा.ज्या की मिकी माउस कैरेकटर ने संपूर्ण जगाला वेड लावले.
- मिकी माउस चे कैरेकटर बनण्यामागे एक रोचक कहाणी आहे.तर काय झालं होतं,वॉल्ट डिजनी कार्टून फिल्म बनवत असताना त्यांच्या रूम मध्ये एक उंदीर उड्या मारत आला.त्यावरून उंदराचे कार्टून बनवण्याची आयडिया वॉल्ट डिजनी यांच्या डोक्यात आले आणि त्यांनी ते कार्टून बनवले.
- उंदराच्या कार्टून चे नाव वॉल्ट डिजनी यांच्या पत्नी यांनी ‛मिकी माउस’ असे दिले.
- ‛स्टिट बोट विली’ ही मिकी माउस कैरेकटर वरती बनलेली पहिली मूवी वर्ष 1928 मध्ये प्रदर्शित झाली.
- ही मूवी चांगली चालली.ह्या मूवी मुळे वॉल्ट डिजनी याना नवीन ओळख मिळाली.ह्या फिल्म नंतर वॉल्ट डिजनी यांनी‛ डोनाल्ड डक’ नावाची दुसरी कार्टून फिल्म बनवली.
- मिकी माउस कैरेकटर वरती हॉलिवूड मध्ये जवळजवळ 200 फिल्म्स बनल्या आहेत.
- मिकी माउस हे कैरेकटर खास करून लहान मुलांमध्ये प्रसिद्ध आहे.
- 1932 साली त्यांची पहिली रंगीत कार्टून मूवी वॉल्ट डिजनी यांनी बनवली.त्या मूवी चे नाव ‛लावर्स एन्ड ट्रीज’ होते.1955 साली वॉल्ट डिजनी यांनी डिजनिलेंड ची निर्मिती केली.
- वॉल्ट डिजनी यांचा मृत्यू 15 डिसेंबर 1966 साली झाला.त्यांच्या मृत्यूच्या पश्चात मिकी माउस हे कैरेकटर अजून ही लोकांच्या मनावर राज्य करत आहे.वॉल्ट डिजनी याना आयुष्यात खूप वेळा अपयश आले,पण त्यांनी न हरता प्रयत्न चालू ठेवला आणि शेवटी तर यशस्वी झाले.
लेखक –