शब्दांची ताकद – The Power Of Words Speech

शब्दांची ताकद – The Power Of Words Speech

शब्दांची ताकद – The Power Of Words Speech

शब्दांना एक वेगळीच चमत्कारिक शक्ती असते ,मग ते शब्द वाक्यातील असो किंवा निबंधातील,शब्दांचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो हे मात्र नक्की.आपण एकमेकांना बोललेल्या गोड शब्दांनीच जवळ करू शकतो किंवा बोललेल्या कडू शब्दांनीच वेगळे करू शकतो.बोललेले शब्द जर सभ्य किंवा आदरयुक्त भाषेत असतील तर आपल्या आसपासची लोकही आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रतिउत्तर देतील.

शब्दरचना – The Power Of Words Speech

आपल्या मनातील भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपण वापरलेली.आपण चांगल्या शब्दरचनंने एकमेकांशी चांगला संवाद साधू शकतो.योग्य शब्द रचना ही काळाची गरज आहे.समजा,तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती असेल आणि ती जर तुम्हाला दुसऱ्याला सांगायची असेल;पण जर तुमची शब्दरचनाच चांगली नसेल तर तुम्हाला काय सांगायचे आहे हे समोरच्याला कधीही कळणार नाही.आपण आपले सुख किंवा दुःख एखाद्यापाशी शब्दाने च  व्यक्त करू शकतो.समोरचा आपला आदर करत आहे की अनादर हेही समोरच्याने वापरलेल्या शब्दाने च समजते.ह्यात शंकाच नाही की शब्द हे एक मजबूतशस्त्र आहे.तुमचेशब्द सशक्त असण्यासाठी,तुमची शब्दरचना स्पष्ट आणि अर्थपुर्ण असायला हवी.आपण बोललेले शब्द वास्तवात खरे आणि समोरच्याला पटण्याजोगी असावेत.

आपण भाषण देताना काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे,जसे कीआपण वैचारीक आणि काळजीपूर्वक शब्दरचना केली पाहिजे आणि ती शब्दरचना सुसंगत आणि युक्तीपूर्वक असायला हवी.आजकालची काही लोक ,ज्यांची परस्पर बोलण्याची कला कमी आहे,अशांसाठी इंटरनेट वर भरपूर टिप्स उपलब्ध आहेत.तसेच काही पुस्तकेही आहेत परस्पर बोलण्याची कला वाढवण्यासाठी.या सर्वांचा एकच उद्देश आहे की;तुमची बोलण्याची कला वाढवण्याचा.तुम्ही कोणत्याही मार्गाने तुमची परस्पर बोलण्याची कला वाढवू शकता.

काहींचा असा दावा आहे की; सर्वात अगोदर आपण सर्वांनी योग्य संस्कार घेतले पाहिजेत ,म्हणजे विनम्रतेचा वापर करून सहिष्णु राहिले पाहिजे.

एका ठिकाणी लिहिले होते की; आपण जेव्हा कुणाला चांगले संस्काराचा द्याल तेव्हा कधी कधी समोरच्याला रागही येतो

सगळेजण हे मानतात की; लोकांना स्तुती केलेली फार आवडते.ह्याचा अर्थ असा होतो की;आपण बोलताना स्तुतीच्या भावात बोललो पाहिजे.आपण केलेल कौतुक स्तुती ऐकून समोरच्याला आनंद झाला पाहिजे.पुढ्च्यांची स्तुती करण्यासाठी त्याच्याकडे असणारी चांगले गुण  तुम्ही ओळखली पाहिजेत आणि त्या गुणांची स्तुती करून पुढच्याला प्रभावित केले पाहिजे.

कौतुक चे बोल – The Power Of Words Speech

प्रत्येकवेळी बोलताना आपण सावध असलो पाहिजे,जेणेकरून समोरच्याने केलेले चेहऱ्याचे हावभाव आपल्याला समजतील.आपण त्याच्या चेहऱ्यावरील भाव त्याला सांगितल्यावर तो किती आनंदी होईल नाही का !

त्याच्या आनंदाकरिता आपण काही स्तुतीचे बोल बोलले पाहीजेत,जेणेकरून तो आनंदी होईल.कशी स्तुती करायची ? ह्यासाठीही कितीतरी मार्ग उपलब्ध आहेत.एक असा मार्ग आहे की ; जो शक्यता शिकणे थोड अवघड आहे,तो म्हणजे प्रमाणिकता . प्रमाणिकता तुम्ही दुसऱ्या कडून शिकू ही शकत नाही आणि दुसऱ्याला शिकवू ही शकत नाही.इमानदारी तुमच्या मनात असायला हवी.इमानदारी सारखी स्वस्त गोष्ट या जगात नाही,पण जर ती तुमच्यात नसेल तर तुम्ही कितीही पैसे खर्च केले तर ती तुम्हाला भेटणार नाही.

जेव्हा तुमच्यात इमानदारी असेल तेव्हा बहुतांश लोक तुम्हाला स्वीकारतील व तुम्ही जे काही बोलाल ते लोकांना पटेल.ह्याप्रकारे सगळ्यात चांगली स्तुती ‛ प्रमाणिकता ही आहे.

जर तुम्हाला समोरच्या बद्दल त्याची चांगली वाईट गुण माहीत असतील तर ती त्याला सांगायला लाजू नका.बिनधास्त त्याला ती गुण स्तुती प्रेमच्या भावात बोला,त्याला आनंद होईल.शब्द सगळ्यात मोठे शस्त्र आहे.तुम्ही एखाद्याला चांगले शब्द बोलून त्याला आपल्या जीवनाचा मित्रही बनवू शकता किंवा वाईट शब्द बोलून आयुष्यभराचा शत्रूही.हे तुमच्या हातात आहे की तुम्ही शब्दाच्या ताकदीला मित्र बनवण्यासाठी वापरता की शत्रू बनवण्यासाठी.

राजकारण,इमानदारी आणि हुशारी यातिन्ही गोष्टींचा वापर करून केलेला संवाद तुम्हाला चांगला व्यक्ती घडवतो .झाडाला जसे प्रकाश, हरिद्रव्ये आणि पाणी या तिन्हींची वाढीसाठी नितांत गरज असते वाढ आपलया वाढी साथी  सुद्धा व ,तसेच जर तुम्हाला चांगला वक्ता बनायचे असेल तर तुम्हाला वरच्या तीन गोष्टींचा मेळ जमवता आलाच पाहिजे.ह्या तीन गोष्टी तुमच्या शब्दांच्या ताकदीचा योग्य प्रमाणात वापर करतील.

Leave a Comment