द करेज टू बी डिसलाईकड – Summary of The courage to be disliked in Marathi –

शेअर करा:

द करेज टू बी डिसलाईकड – Summary of The courage to be disliked in Marathi –

मित्रानो तुम्ही सर्वांना खुश ठेवणाऱ्यातले आहात ,तुम्ही कोणालाही नाराज झालेले बघवत नाही ,तुम्हाला असे वाटते की ,तुमच्या मुळे कोणी नाराज नाही झाले पाहिजे आणि तुम्ही सर्वांना हसविण्याचा प्रयत्न करता ,तुम्हाला वाटते की आपण सर्वांना आवडले पाहिजे ,तर हा तुमचा गैरसमज आहे ,तुम्ही कितीही लोकांबरोबर चांगला वागण्याचा प्रयत्न करा ,प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा ,परंतु तुम्हाला अशी बरीच माणसे भेटतील जे की तुमचा तिरस्कार करतील.यामधे तुमची काहीही चूक नाही ,आपण कोणासोबत कितीही चांगले वागले तरी आपला कोण ना कोण तरी तिरस्कार करतोच.


आपण या लेखामध्ये सिग्मंड फ्रॉईड लिखित “The courage to be disliked” या पुस्तकाची समरी पाहणार आहोत.आपले व्यक्तिमत्व आपल्या जीवनात लहान पणी घडलेल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींच्या अनुभवावर आधारित असते.आपल्या लहानपणी घडलेले चांगले किंवा वाईट अनुभव आपल्या अवचेतन मनामधे असतात आणि त्याचा असर आपल्या व्यक्तिमत्वावर पडतो.जर तुमच्या शाळेतील शिक्षकांनी तुम्हाला कधीतरी रागात “तू काहीच बनू शकत नाहीस!!,तू वाया गेलेला आहेस ,तुझे जीवनात काहीच होऊ शकत नाही” असे वाक्य उद्गारले असतील तर शिक्षकांचे हे वाक्य आपल्या अवचेतन मनावर खोलवर जाते आणि त्याचा असर आपल्या सध्याच्या व्यक्तिमत्वावर पडतो.
लेखक म्हणतात की लहानपणी घडलेले चांगले किंवा वाईट अनुभव आपण शक्य तितके विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


लेखकांनी “The courage to be disliked” या पुस्तकामध्ये काही महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे :
१) भविष्य आपल्या भूतकाळावर आधारित नसते ,तर ते आपण घेत असलेल्या अँक्शन वर आधारित असते.
२) मी जसा पण आहे चांगला आहे ,प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये चुका करतो आणि आपण केलेल्या चुकांमधून शिकले पाहिजे आणि ती चूक परत केली नाही पाहिजे.
३) मी दररोज माझ्या ध्येयाकडे जाण्यासाठी वाटचाल करेन आणि ध्येयापर्यंत जाण्यासाठी योग्य त्या ऍक्शन घेईन.

वरील सांगितलेले वाक्य जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर मनामधे म्हणत राहिला तर तुमच्या अवचेतन मनामधे असणारे लहानपणाचे चांगले वाईट अनुभव आपोआप विसरले जातील.
काहीजण स्वतःची खूप अलोचना करतात ,ते स्वतःचा खूप तिरस्कार करत असतात.तर काही लोक दुसऱ्यांचा. तिरस्कार करतात.आपण कधीही आपला तिरस्कार केला नाही पाहिजे .


आपल्याकडून एखादे काम होत नसले तर ते काम आपण छोट्या छोट्या विभागात विभागले पाहिजे आणि नंतर ते छोटे छोटे गोल मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.छोटे छोटे गोल आपण मिळवत गेलो तर आपण आतून मोटीवेट होतो आणि आपला प्रयत्न चालू ठेवतो.
आजकालचे जग स्पर्धेचे आहे.प्रत्येकाला एकमेका पुढे जायचे आहे.असा कोणीही या जगात नसेल ज्याला मागे राहायचे आहे ,या जगात सर्वानाच पुढे जायचे आहे.अशा वेळी आपला मित्र किंवा आपल्या क्लास मधील किंवा आपल्या नोकरीतील सहकारी आपल्या पुढे गेला तेव्हा काहीवेळा आपल्याल त्याच्या यशाबद्दल इर्षा आणि वाईट वाटते.आपण त्याच्या यशाबद्दल जळतो.काहीवेळा एखादा दुसरा यशस्वी झाला म्हणून आपण स्ट्रेस मधे जातो.जेव्हा आपण स्ट्रेस मधे असतो तेव्हा आपल्या शरीरात वाईट हार्मोन येतात आणि आपला ब्लड प्रेशर वाढतो.ब्लड प्रेशर वाढल्यामुळे काहीवेळा आपल्याला हानिकारक आजारांचा सामना करावा लागतो.जी स्पर्धा आपल्या आरोग्याला हानिकारक आहे ती स्पर्धा काय कामाची ?यामुळे आपल्या मनात कुणाबद्दल ही इर्षा नसली पाहिजे आणि आपण सर्वांसोबत चांगले वागले पाहिजे.आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ,त्याच्यासाठी देवाचे आभार मानले पाहिजे.असे जेव्हा आपण करतो तेव्हा आपले मन पर्फुल्लित होते.
आपले प्रॉब्लेम हे खूप छोटे असतात किंवा काही वेळा आपण छोट्या प्रॉब्लेम ना मोठा प्रॉब्लेम समजून त्याचा सारखा विचार करतो.ज्यांची कमी उंची असते ,त्यांना वाटते की माझी उंची जास्त असती तर किती बरे झाले असते ?ज्यांना कमी पगार असतो ,त्यांना असे वाटते की आपल्याला जर जास्त पगार असता तर किती बरे झाले असते ?परंतु तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की ज्यांना जास्त पगार असतो ते देखील त्या पगारामधे खुश नसतात आणि त्यांनाही त्यापेक्षा जास्त पगाराची लालच असते.
काही लोक असे असतात जे की स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत आणि आपली चूक दडवण्यासाठी ते खूप जास्त खोटे बोलतात.आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचे असेल तर आपण आपली चूक मान्य केली पाहिजे आणि ती चूक परत केली नाही पाहिजे.
आपण प्रत्येकाचा चांगला मित्र बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तुम्ही “दुनिया मतलबी आहे ,दुनिया स्वार्थी आहे” असे वाक्य खूपवेळा ऐकले असेल.परंतु या वाक्यानी नकारात्मकता पसरते.आपल्याला एका किंवा दोघा व्यक्तींकडून धोखा मिळाला म्हणून पूर्ण जगच धोखेबाज आहे असा गैरसमज आपण केला नाही पाहिजे.
आपल्यातील बऱ्याच जणांना वाटते की लोकांनी आपले कौतुक केले पाहिजे ,परंतु लेखकांच्या मते असा विचार करणे की सगळ्यांनी आपले कौतुक केले पाहिजे हे दुःखाचे कारण आहे.जगात खूप कमी लोक आहेत जे की आपल्या कामाचे कौतुक करतील .तुम्ही कोणी कौतुक करो अगर न करो आपले काम मनापासून केले पाहिजे.
आपण आपल्याला दिलेल्या टास्क ला वाटले पाहिजे.समजा आपण जॉब करत आहोत आणि आपण एका टीम चा लीडर आहोत,अशावेळी आपण आपल्याला दिलेला प्रोजेक्ट आपल्या टीम मेंबर सोबत वाटला पाहिजे आणि प्रत्येकाला था प्रोजेक्ट मधील काही हिस्सा काम करण्यासाठी दिला पाहिजे.
आपण दरवेळी लोकांच्या म्हणण्याचा विचार करतो जर की ,मला चांगले कॉलेज नाही भेटले तर लोक काय म्हणतील ,चांगला जॉब नाही भेटला तर लोक काय म्हणतील ?आपण जीवनभर हाच विचार करतो की ,लोक काय म्हणतील ?आपण जेव्हा हा विचार करणे सोडेन तेव्हाच आपण आनंदी जीवन जगू शकू.
आपण आपल्यात असणाऱ्या चुका घेईन स्वतःला स्वीकारले पाहिजे.जर आपल्यातील चुका सुधारणे आपल्या हातात असेल तर ,त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि एक गोष्ट धेनात ठेवली पाहिजे की या जगात कोणीच परफेक्ट नसते!!


जेव्हा आपल्या जवळ जास्त पैसा येतो किंवा आपण यशस्वी होतो तेव्हा आपल्यात अहंकार नाही वाढला पाहिजे.आपला स्वभाव तसाच असला पाहिजे जसा की यशस्वी होण्यापूर्वी होता.
आपण जर निराशेत असू,आपला व्यवसाय बुडाला म्हणून आपल्याला असे वाटत असेल की ,आपले जीवन बुडाले म्हणून ,तर असा विचार करणे चुकीचे आहे कारण सुख नंतर दुःख आणि दुःखा नंतर सुख येणे हा निसर्गाचा नियमच आहे ,त्यामुळे आपण प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे.

Leave a Comment