समरी ऑफ सायकॉलॉजी ऑफ मनी -summary of psychology of money in marathi

Summary of psychology of money in Marathi –
या जगामध्ये अन्न ,वस्त्र आणि निवारा नंतर बनलेली मूलभूत गरज म्हणजे “पैसा”.आपल्याकडे पैसा असेल तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो.ते म्हणतात ना ,“पैसा सगळ काही नाही , पण पैसा खूप काही आहे.”


आताच्या जगामध्ये पैसा कमविण्यासाठी माणसाला खूप काही करावे लागते .प्रत्येकजण जास्त पैसा मिळवण्यासाठी दिवसेंदिवस कष्ट करत असतो.परंतु तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण केले असेल की ,जे पैष्याने श्रीमंत आहेत त्यांना पैसा कमवण्याचे मानसशास्त्र माहीत असते आणि जे लोक गरीब असतात त्यांना पैसे कमविण्याची मानसशास्त्र माहीत नसते.आपण अशाच “मॉर्गन हौसेल” यांच्या “पैश्याच्या मानसशास्त्र” पुस्तकातील समरी बद्दल माहिती पाहणार आहोत.या पुस्तकात सांगितलेले तत्वज्ञान आणि गुंतवण्याची खरी कला ही जर तुम्ही तुमच्या दैंनदिन जीवनात उतरवली तर तुम्ही नक्की श्रीमंत होऊ शकता.चला तर मग आर्टिकल ला सुरवात करूयात.
पैश्याना योग्य रित्या हॅण्डल करण्याची कला तुमच्या स्मार्ट नेस वरती आधारित नसून तर ती तुमच्या पैसे वापरणे आणि पैसे गुंतवणे यांच्या कलेवर आधारित असते.केव्हा केव्हा एखादा श्रीमंत माणूस काही चुकीच्या गोष्टी केल्यामुळे पैसे गमावून बसतो तर काही गरीब घरातील माणूस “पुस्तकातील मानसशास्त्र” या पुस्तकातील तत्वज्ञानाचा वापर करून श्रीमंत बनू शकतो.


मॉर्गन हौसेल पुस्तकात सांगतात की ,ते जेव्हा हॉटेल मधे काम करत होते ,तेव्हा तिथे एखादा श्रीमंत आणि हुशार माणूस येत असे.तो खूप बुद्धिमान होता ,परंतु तो बुद्धिमान माणूस पैश्याच्या आदर करत न्हवता ,आणि फक्त अनावश्यक गोष्टींसाठी पैश्याची उधळपट्टी करत होता.काही दिवसात लेखकाला समजले की तो बुद्धिमान माणूस बँक करप्ट झाला.


लेखक दुसरे उदाहरण देताना म्हणतात की,एक साफ सफाई कर्मचारी अमेरिकेतील एका छोट्या गावामधे राहत होता आणि जेव्हा तो ९२ व्या वर्षी वारला तेव्हा त्याच्या नावाच्या न्यूज आणि गोष्टी संपूर्ण अमेरिकेत पसरू लागल्या.तो सुरवातीला एका अमेरिकेतील छोट्या गावामधे राहत होता आणि मरताना त्याच्याकडे ५८ करोड होते ,त्यातील त्याने तेरा करोड आपल्या सावत्र मुलांना दिले आणि उरलेले ४३ करोड रुपये त्याने charity मधे दान केले.तो सामान्य साफ सफाई कर्मचारी त्याच्या पगारातील काही रक्कम गुंतवत होता ,त्यामुळे कंपौंडींग पॉवर मुळे त्याच्याकडे मरताना ५८ करोड राहिले.


लेखक म्हणतात जीवनामध्ये खूप सारे पैसे कमावणे सोपे आहे परंतु ते कमवलेले पैसे जास्त काळापर्यंत टिकून ठेवणे फार अवघड आहे.“पैश्याचे मानसशास्त्र” या पुस्तकात दिलेले पैसे कमविण्याचे स्किल वापरून कोणीही श्रीमंत होऊ शकत.


लेखक म्हणतात की अमेरिकेतील ज्यास्त करून लोक आपले पैसे मूव्ही पाहण्या वर ,पुस्तक विकत घेण्या वर खर्च करत नाहीत तर ते अमेरिकेतील माणसे जास्त पैसे लॉटरी खरेदी करण्यावर खर्च करतात.परंतु हे लॉटरी खरेदी करणारे अमेरिकेतील माणसे श्रीमंत घरातील नसतात किंवा मिडल क्लास घरातील नसतात तर ती माणसे गरीब घरातील असतात जे की इमर्जन्सी म्हणून वर्षाला ३० ते ३५ हजार जमवू शकत नाहीत ,ते सहज लॉटरी खरेदी करण्यासाठी वर्षातील कमीतकमी ३० हजार खर्च करतात.लॉटरी मधे पैसे खर्च करण्या ऐवजी त्यांनी जर त्याची सेविंग केली तर त्यांचाच फायदा होईल ,ना ?


परंतु ही लॉटरी खरेदी करणारी गरीब माणसे असा विचार करतात की आम्ही मोठ्या म्हणजे श्रीमंत लोकांची स्वप्ने पाहू शकत नाही,आम्ही आमच्या मुलांना चांगल्या कॉलेज मधे एडमिशन घेऊ शकत नाही ,कारण आमचा पगार कमी आहे .आम्हाला आम्हाला हवे तसे करायचे असेल तर आम्हाला लॉटरी घेण्या ऐवजी दुसरा पर्याय नाही ,कारण लॉटरी च आम्हाला श्रीमंत बनवू शकते.
तुम्हाला सर्वांना बिल गेट्स माहिती असतील ,बिल गेट्स जेव्हा विद्यार्थी होते तेव्हा त्यांच्या बरोबर ३० करोड विद्यार्थी पूर्ण पृथ्वीवर शिकत होते,परंतु बिल गेट्स ज्या शाळेत शिकले त्या शाळेत कॉम्प्युटर होता जो की बाकीच्या कोणत्याच शाळेत न्हवता .बिल गेट्स ना त्या काळी कॉम्प्युटर चा ॲक्सेस मिळाला होता.बिल गेट्स म्हणतात की जर ज्या शाळेमध्ये कॉम्प्युटर होता तिथे जर ते शिकले नसते तर त्यांनी कधीच मायक्रो सॉफ्ट कंपनीची स्थापना केली नसती.


लेखकाच्या मते तुम्ही जेव्हा यशस्वी होता तेव्हा असे समजून जाऊ नका की ,तुमचे सर्वच निर्णय बरोबर आहेत आणि तुम्ही जेव्हा अयशस्वी होता तेव्हा असे समजू नका की तुमचे सर्वच निर्णय चुकीचे आहेत.तुमचे निर्णय ,आणि तुमचे कष्ट या व्यतिरिक्त खूप गोष्टी तुमच्या यशा मधे किंवा अपयशा मधे मॅटर करतात.
लेखक म्हणतात की, तुम्ही जर सारखे अयशस्वी होत असला तरी प्रयत्न करत रहा , हार मानू नका आणि तुम्ही यशस्वी होत असला तरी तुमचे प्रयत्न सोडू नका.

Leave a Comment