संदीप माहेश्वरी जीवन – Sandeep Maheshwari Biography In Marathi

संदीप माहेश्वरी एक प्रेरणा स्रोत

संदीप माहेश्वरी आज सर्वसामन्यात एक चितपरिचित नाव !  तुम्हा सर्वांना माहीतच असतील.आज ते कित्येक ध्येयाकरता प्रयत्न करणार्‍या पण  भटकलेल्या लोकांना योग्य रस्ता दाखवतात.त्यांचे व्हिडिओज पाहुन युवक मोटीवशनल होतात.हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल,

पण तुम्हाला त्यांच्या जीवनाबद्दल माहिती माहीत आहे का ?

आपण या लेखात संदीप महेश्वरिंच्या जीवनाबद्दल माहिती पाहणार आहोत.त्यांची जीवन कहाणी ऐकून तुम्हाला नक्कीच समजेल की एका मध्यम वर्गीय कुटुंब पासून ते यशाच्या शिखरापर्यंत ही आपण पोहोचू शकतो,त्यासाठी फक्त आत्मविश्वास,मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज असते.

संदीप माहेश्वरी यांचा जन्म आणि त्यांचे परिवार  –

 • संदीप माहेश्वरी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1980 ला दिल्लीच्या एका मध्यम वर्गीय परिवारात झाला.
 • त्यांच्या आईचे नाव शकुंतला राणी माहेश्वरी आणि वडिलांचे नाव किशोर माहेश्वरी आहे.त्यांचे आजचे वय 40 इतके आहे.त्यांचे वय 40 असून ते अजून तंदूरसत आहेत.
 • ते नियमितपणे व्यायाम करतात,तसेच योग्य डाएट आणि चिंतन ही करतात.
 • संदीप माहेश्वरी यांच्या पत्नीचे नाव रुचा माहेश्वरी असे आहे.त्यांना एक हृदय नावाचा मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य आहेत.

संदीप माहेश्वरी यांचे शिक्षण –

संदीप माहेश्वरी यांचे सुरवातीचे शिक्षण दिल्लीच्या एका शाळेत झाले.नंतर त्यांनी किरोरीमल महाविद्यालयात B.com साठी ऍडमिशन घेतले;

पण त्यांनी B.com च्या तिसऱ्या वर्षातच कॉलेज सोडले.त्यांना बारावीमध्ये 90+ मार्क्स होते

.संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या एका विडिओ मध्ये सांगितले आहे की,त्यांची आणि त्यांच्या पत्नीची भेट याच कॉलेजमध्ये झालेली.

संदीप माहेश्वरी यांचे करिअर – Sandeep Maheshwari biography in Marathi

 • संदीप माहेश्वरी हे एक उद्योगपती आहेत.त्यांची इमेजेस बझ्झार नावाची वेबसाईट आहे.पण त्यांना त्यांच्या बिसनेस पेक्षा मोटीवशनल विडिओ करायला आवडतात.त्यांनी त्यांचे यु ट्यूब चॅनेल 2012 साली सुरू केलेले.
 • त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांचे आतापर्यंत 20 मिलियन पेक्षा अधिक subscriber असूनही ते यु ट्यूब कडून एक रुपया घेत नाहीत.त्यांचे असे म्हणणे आहे की,त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टींतून पैसे कमवायचे नाहीत.
 • आता मध्ये जून मध्ये यु ट्यूब कडून एक पोलिसी लाँच झालेली,त्यात लिहिले होते की ज्यांनी आपले यु ट्यूब चॅनेल मॉनिटाईझ केले नाही त्यांच्या व्हिडिओ वर देखील यु ट्यूब ऍड चालवणार आणि त्यातून मिळणारे पैसे यु ट्यूब स्वतः ठेवणार.
 • संदीप माहेश्वरी यांना ऍड नको होत्या त्यांच्या व्हिडिओस वरती,त्यामुळे त्यांनी स्वतःची Sandeep Maheshwary tv नावाची वेबसाइट काढली.परत काही दिवसांनी यु ट्यूब ने त्यांची ही पोलिसी हटवली आणि सर्व हक्क creator ला दिले,त्यामुळे संदीप माहेश्वरी आता परत यु ट्यूब वरती व्हिडिओस अपलोड करतात.
 • त्यांच्या लास्ट लाईफ चेंजिंग सेमिनार मध्ये ते शेवटी की,“मला माझ्या विडिओ मधून काहीही नकोय,जर माझे व्हिडिओस बघून तुमच्या आयुष्यात खरोखर जर बदल घडला तर फक्त माझे उपकार म्हणून गरीब लोकांना मदत करा,ज्यांना खायला अन्न मिळत नाही,त्यांना मदत करा.असे केल्याने खूप लोकांचा खाण्याचा प्रॉब्लेम दूर होईल.
 • संदीप माहेश्वरी यांनी निम्यातूनच शिक्षण सोडून तरीही ते यशस्वी आहेत.
 • 2002 मध्ये त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून एक कंपनी सुरू केली,पण त्यात त्यांना यश मिळाले नाही आणि लवकरच ती बंद पडली.
 • त्यांनी त्यांचे एक पुस्तक ही पब्लिश केलेले,त्या पुस्तकाची वैशिष्ट्य हे होते की ते पुस्तक उलटे होते.
 • त्यांचे हे पुस्तक ही इतके चालले नाही.सारखे अपयशाचा सामना करूनही ते थांबले नाही व त्यांनी फोटो ग्राफी चा कोर्स पूर्ण केला व फोटो ग्राफी क्षेत्रात पदार्पण केले.
 • 2003 मध्ये त्यांनी 10 तास आणि 45 मिनिटात 122 मॉडेलांचं 10 हजार हुन अधिक फोटो काढण्याचा विश्व रेकॉर्ड केला.
 • 2006 मध्ये त्यांनी त्यांची स्वतःची इमेजेस बझार ImagesBazaar नावाची कंपनी चालू केली.आज ती 45 हुन अधिक देशात असून त्या वेबसाईट मध्ये 20 लाखांहून अधिक फोटोस आणि 7000 अधिक क्लायंट आहेत.एका रिपोर्ट नुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न 11 कोटीहून अधिक आहे.

संदीप माहेश्वरी  एक प्रेरणा स्रोत आहेत.

लेखक –

Leave a Comment