समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार (दुःखाचे मूळ)-
- शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांना पढतमूर्ख म्हणतात. जो विज्ञान आहे व लोकास ब्रहमज्ञान सांगतो. पण जो वासना आणि प्रयत्नाने अवगुण बाळगतो तोही पठढतमूर्खच श्रोत्यांनी प्रयत्नाने अवगुण सोडता येतात नंतर माणूस सुखी होतो
- जो स्वधर्माची निंदा करतो, सर्वांना नावे ठेवतो शब्दाने मन दुखवतो, घमेंडी असतो, क्रोधी असतो तोच पढतमुर्ख होय परंतु प्रयत्नाने ते अवगुण सोडावे.
- परमार्थ न साधता संसारात गुंतून राहतो, स्त्रीयामध्ये राहतो. विनाकरण स्तुती करतो. मत्सर करतो, तो पठत मुर्ख होय हे अवगुण प्रयत्नाने जावू शकतात.
- ज्यास वैराग्य नाही, भजन पूजन नाही. तीर्थ क्षेत्र वेद आणि शास्त्र मानीत नाही. पाठीमागे तो निंदा करतो तो पठतमुर्ख होय. प्रयत्नाने हे अवगुण जातात.
- जो सद्गुरुषा विसरतो, प्रपंचासाठी परमार्थ वारतो सद्गुदुची किंमत ठेवत नाही, स्वार्थी व कुंजूष असतो तो पठतमर्ख समजावा प्रयत्क्नाने हे दोष जातात
- जीव पूर्वी जन्माचीकर्मे भोगासाठी जन्म घेतो,असे वेद म्हणतो, कर्म भोगण्यासाठी शरीर लागते. जन्म म्हणजे कुविद्या, अज्ञान वासना होय.
- जन्म म्हणजे स्वरुपापासून बाहेर काढणारी अवस्था होय. मी देह आहे ही सुक्ष्म कल्पना जीवाला जन्म घालते. अविधेमुळे, वासनेमुळे जन्म येतो.
- गंगेचे पाणी प्याले तर त्याचे मूत्र बनते, मळ, मूत्र आणि ओक यावरच देह जगतो.वाढतो
- गर्भात असता मूळ “सोह सोह” अशी आत्मबुध्दि असते बाहेर येताच “कोहे कोहं”अशी देहबुध्दी होते.
- द्रश्यरुप सृष्टि, दुःखाचे मुळ आहे. जन्म घेण्यापासून शेवटपर्यंत दु:खच असते.भोगावयाचे असते
- ब्रह्मदिक देव अथवा प्रत्यक्ष लक्ष्मीला देखील सख्या आईप्रमाणे मुलाची समजुत काढता येत नसे.
- आई कुरुप असो, गरीब असो आईपाशीच मुलाचे सर्व सुख केंद्रित असते.
- वय वाढत जात असता नैसर्गिक शारीरिक आपत्ती येतात रोग होतात, विविध तापाने माणसास त्रास होतो
- लोक बायकोसाठी भक्ति सोडतात, सामुज्यमुक्ति स्त्रीपुढे तुच्छ मानतात व परमार्थ बुडवितात.
- पहिल्री बायको वारल्यानंतर दुसरे लग्न केले तर आणखी दु:ख वाढते. गरीबी वाढते, भक्ति विसरतो व देवाला खोटे मानू लागतो.
- देह क्षीण झाला, नाना रोग उद्भवतात, तारुण्य संपले वर दु:ख वाढत जाते, मुले झाले नाहीत, झाली, पण मरुन गेली. दु:खहि दुःख झाले.
- मुल होण्यासाठी मंत्रतंत्र केले, चेटकीचे प्रयोग केले, वेडा झाला दुःखहि दुःख झाले. पाप कर्मे केली
- घरखर्च वाढतो. मिळकत कमी होते. कर्जबाजारी होतो. कर्जबाजारी होतो. आपण अन्न खातोतेच आपणास खाते, अंगीलागत नाही.
- प्रपंचात सर्व आपले सुख पाहतात, दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव ठेवत नाहीतशेवटी कोणीच उपयोगी पडत नाही.
- प्रपंचातील सर्व नाते केवळ सुखासाठीच असतात. आई सोडून. शरीरास जिने जन्म दिला ती आई मात्र मिळणार नाही.
- आई डाकिणी जरी असली तिची मुलावर माया असते, हजार बायका केल्यातरी अशी माया मिळणार नाही, जी प्रांपचिक माणसे आई बापाशी भक्ति भावाने वागतात ती धन्य होत.
- आपला देह दुसर्याचा ताबदोर केला ईश््वरासाठी त्याचा वापर केला नाही. केवळ एका कामवासनेसाठीच जन्मभर कष्ट केले आणि आयुष्याच्या शेवटी एकटयासच जावे लागते.
- तारूण्य गेले, बळ गेले, संसार करण्याची हौस गेली. शरीर, संपत्ति नाश पावली ज्याना वाढविले तेच शत्रू होतात. परंतु शेवटी कठीण प्रसंग येतो
- जन्मभर स्वार्थच मागे लागला पण सर्व व्यर्थ गेले. सुखासाठी श्रम केले परंतु अखेरीस दु:ख यातना आणि मरणानंतर यम यातना सोसाव्या लागणार.
- जन्म सर्व दुःखाचे मुळ आहे. प्राणी जन्मला की दु:ख सुरु होते. माणसाने स्वत:चे कल्याण करुन घ्यावे. प्रत्येकाने भगवंतास शरण यावे.
- म्हातरपण येते अंत:काळी जीवास पश्चाताप होतो. पुन्हा जन्म मरण व संसार यातना येतात, भगवंताच्या भक्ति शिवाय यातून सुटका नाही.
- .देह, इंद्रिये व प्राण यांच्यामुळे सुख दु:ख होतात तो आध्यात्मिक ताप असे नांव आहे उदा. सर्व प्रकारचे रोग, थंडी, उकाडा, भूक, झोप अति संभोग
- बाह्य पदार्थाच्या संयोगाने जे सुखदु:ख निर्माण होते. त्यास आधि भौतिक ताप म्हणतात. उदा. ठेंच लागणे, मुंगी, डांस चावणे
- कुरुप, क्रुर स्वभावाची बायको मिळणे, मुलगा मुर्ख असणे, बाहय कारणाने यातना होणे, छळ करणे यास आधिभौतिक ताप म्हणतात.
- माणसांना त्याच्या चांगल्या वाईट कर्मानी मरणानंतर स्वर्गनरक असे अनेक भोग भोगावे लागतात. त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात अविचाराने जो अनेक दोष करतो त्यामुळे त्यास यमयातना भोगावे लागतात.
- मरणोत्तर लोकांत पापपुण्याची शरीरें असतात. मनुष्य मेल्यावर त्याचा सुक्ष्म देह त्याच्या पापपुण्यानुसार त्या शरीरात जातो मग त्याला पापाची पुण्याची फळे भोगावी लागतात.
- जे वेदाजा पाळीत नाहीत, हरिभक्ति करीत नाहीत त्याना यमयातना भोगाव्या लागतात.
- जन्माला आल्यापासून काळ सारखा बरोबर असतो जसे ज्याचे कर्म असते तसे माणूस स्वदेशी अथवा परदेशी देह ठेवतो. बलाढय महाराजे सुध्दा मृत्यूपुढे टिकत नाहीत.
- हटयोगी, राजयोगी, विरक्त, बाल, तरूण, शहाणा, पुण्य पुरुष हरिदास, सत्कर्म करणारा सर्वांना मृत्यू ओळखत नाही.
- माणूस अति थोर, प्रत्यक्ष विष्णु आणि शंकर असोत किंवा भगवंताचा अवतार असले तरी मृत्यू त्याची पर्वा करत नाही.
- हा मृत्यूलोक आहे ही जाणीव ठेवून माणसाने आपले सार्थक करुन घ्यावे. मृत्युने देह नेला तरी किर्ती रुपाने स्वत: लोकामध्ये उरावे.
- ब्राहमण गेले, संसारी गेले, असे सारे गेले पण संत मात्र टिकले. परंतु आत्मज्ञानी होऊन जे स्वस्वरुपाशी एकरुप झाले तेवढे मात्र ठिकते.
- मृत्यूचा नेम नाही. आशा व ममता सूक्ष्म देहाच्या बेडया आहेत या देहास जखडून ठेवतात, दु:ख देतात, संकटात टाकतात.
- देहाभिमानाची वृत्ती, कामवासना, तिरस्कार वृत्ती जात नाही. मद, मत्सर कमी होत नाहीत. तोपर्यंत मनुष्य मोहीत अवस्थेतअसतो.
- बुडत असताना माणूस माझे माझे म्हणत राहतो आयुष्य वाया जात असून कुळाचा अभिमान, प्रपंचाचे माझेपण सोडीत नाही.
- जे आविकपणाने भगवंतास शरण जातात, त्यांना स्वानंद भोगावयास मिळतो. संसार दुःख बाधत नाही. त्यांना भगवंताची मदत खात्रिने मिळते इतर लोक दु:खात मरतात.
- यज्ञ म्हणजे सेवा, पूजा करणे, ज्याला देव मनापासून आवडतो त्याच्या संकटाचे ओझे देवावर पडते भगवंत दासाचे संसारदुःख नाहीसे करतो.
- .ज्याची आराधना तसेच त्याला देव समाधान देतो, भाव किंचीत जरी उणा झाला,मंद झाला तर देव लगेच दुरावतो, त्याची प्रचिती मंदावते.
- ईश्वर दर्शनार्ने पावन झालेले पुरुष आपण स्वत: तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात, तारतात. ते अभक्त भक्त होतात.
- मानवी जीवन हे रत्नांनी भरलेली पेटी आहे असे समजावे त्या पेटीत ईश्वर भजनाची उत्तम रत्ने भगवंतास अर्पावी आणि आनंद लुटावा.
- जो ईश्वराचा पक्का आधार थरुन संसाराची वासना सोडतो त्यांना देव आंत बाहेर संभाळतो, त्याची वृत्ती प्रपंच संभाळतो.
- ज्याचा जीव अत्यंत आत्मीयतेने ईश्वरामध्ये गुंतलेला असतो ते भक्त स्वानंदाचा सोहळा लुटतात, त्याच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो पण तो सामान्य व्यवहारामध्ये दृश्य नसतो.
- एकास मोठे रत्न मिळाले त्याने ते न जाणता कवडी मोलाने घलविले, तसे आत्मघातकी अभाविक माणूस कवडी मोलाने जीवन घालवितो, तसे ईश्वर न जोडणारे करंटे आहेत
- पूर्वकर्माच्या क्रणानुबंधाने प्रपंचातील माणसे एके ठिकाणी गोळा होतात, जन्माला येतात, आपले शरीरसुध्दा खरे नाही. एका भगवंतावाचूर खरोखर आपले कोणी नाही. भआावबळाने त्याला घट्ट धरा.
- आत्मरुपातील श्री राम सोडून जे देह सुखाची वासना करतात ते दुरात्मा समजा, ते आपल्या कर्माची फळे भोगतात. –
- आंतबाहेर आनंदन भरलेला राम सोडून जो नित्य इंद्रिय सुखाची इच्छा करतो, त्यास कधीही समाधान मिळणार नाही. त्यासाठी भगवंताचे भजनी लागावे. खरे सुख मिळेल, दुःखाचे मूळ असलेले सगळे स्वजन दूर करा.
- ज्याची देहसुखाची वासना विसरली तो खरा सुखी होय. एकनिष्ठेने भगवंताचे भजन करणाऱ्यास आपोआप सुख लाभेल.
समर्थ रामदास स्वामी ह्यांचे मराठी सुविचार हे लेखक :श्री .मारुति रामचंद्र सोनार ह्यांच्या सहत्र विचार समर्थांचे ह्या पुस्तकातील आहेत .
ई- साहित्य प्रतिष्ठान कडून पूर्व संमतीने हा लेख ह्या ब्लॉग वर प्रकाशित.
पुस्तकांची पर्वणी अश्या esahity ह्या संकेतस्थळा भेट देवून मराठीभाषेला समृद्धा करण्यात आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यात सर्वांनी आपला वाटा उचलावा.