समर्थ रामदास स्वामी ह्यांचे मराठी सुविचार – Samarth Ramdas Marathi Suvichar

शेअर करा:

समर्थ रामदास स्वामी मराठी सुविचार – Samarth Ramdas Marathi Suvichar

  • श्री समर्थ सांगतात या ग्रंथाचे नांव दासबोध आहे. त्यामध्ये गुरुशिष्याचा संवाद आहे व त्यामध्ये भक्‍्तिमार्गाचे स्पष्ट विवेचन आहे.
  • दासबोधामध्ये अनेक विकल्पाचे व भ्रमाचे चुकीचे म्हणजेसमजुनी निवारण केले आहे.संशय छेदून टाकले आहेत, अपेक्षाना व प्रश्‍नाना समाधानकारक उत्तरे दिल्रेल्ली आहे. नास्तिक माणसे सुध्दा या भक्‍्तिमार्गाने मोक्षापर्यंत पोचतात.
  • दुष्ट अभिमानाने मत्सर निर्माण होतो मत्सराने तिरस्कार प्रकट होतो, त्यांतून क्रोध निर्माण होतो ते लोक अहंकाराने विकृत होतात त्यासाठी अहंकार बाजूस सारणे हे उत्तम होय.
  • अभ्यासी माणसाचे अनेक दोष नष्ट होतात. अपवित्र माणसे पवित्र होतात, उत्तम गति लाभते, देहभावाने अनेक कठीण प्रसंग दासबोधाच्या अभ्यासाने टळतात. संशय, अम, संसारातील दुःखे, निराशा नष्ट होतात.
  • दासबोधाच्या अभ्यासाने जीवाची अवनीती थांबते. मनाला खरी विश्रांती व समाधान मिळते.
  • सर्व सिध्दीची फळे देणारा, अज्ञान दूर करणारा, भ्रम नाहीसा करणारा, मूर्तिमंत ज्ञान असणारा जो गणपति त्याला मी नमस्कार करतो.
  • गणपतीस चार हात आहेत. एका हातात परशु, दुसऱ्यात कमळ, तिसऱ्यांत अकुंश आणि चौोथ्यांत मोदक आहेत. कमरेला पितांबर व पोटावर वेढा घातलेला नाग आहे.
  • वेदांची आई, ब्रहमदेवाची कन्या, नादाचे जन्मस्थान वाणीची स्वामीनी आणि महामाया अशी शारदा तिला मी नमस्कार करतो. आदिपुरुष ईश्वराची आर्या आहे.
  • शारदा म्हणजे मोक्षाचे वैभव व मंगळांत मंगळ अशी अमृतरुपीसतरावी जीवनकलाच आहे. त्रावण्यखाण. शारदा जीवात्रा शांति देणारी सत्वगुणची लीला आहे, अव्यक्त ईश्वरात्रा व्यक्‍त बनविते, संकल्पनाचा विस्तार करणारी
  • ईच्छाशक्ती तीच आहे. ती स्वयंभू एकच माया आहे
  • शारदा ब्रहमादिकाचीआई आहे. विष्णु, शिव तिच्या पोटी जन्मतात. विश्‍व रचना तिचाच विस्तारआहे
  • शारदा परमार्थाचे मुळ आहे, केवळ आत्मविद्याच आहे. शाळा म्हणजे ईश्‍वराची निवांत, निर्मळ आणि निश्‍चल अवस्था होय, ध्यानास मदत करणारी,
  • आत्मचिंतन शिकवणारी आहे.
  • परत्मा स्वरुपाला “मी आहे” अशी ज्ञानमय शुध्द जाणीव होय हे शारदेचे स्वरुप समजावे. ती ज्ञानमय आहे. – 21
  • सदगुरुच्या स्वरुपाला माया स्पर्श करु शकत नाही. आपले सगळे ज्ञान मायेच्या कक्षेतीलअसते. त्यामुळे सद्गुरु आपल्यासारखे अज्ञानींना कळणे शक्य नाही. त्याचे वर्णन करता येणार नाही.
  • विश्‍वाला भरुन उरणारा, विश्व मुळ, सर्वोत्तम पुरुष मोक्षाची विजय पताका आणि दिनाचा मित्र असतो अशा सदगुरुचा जयजयकार असो
  • सदगुरु सूर्यासारखा आहे म्हणावे ते बरोबर नाही. सर्याच्या प्रकाशाला मर्यादा आहेत. पण सद्गरुनां मर्यादा नाही. सद्गुरु अमृतासारखा आह्‌ म्हणावे ते बरोबर नाही.
  • स्वर्गात नित्य अमृत पिणारे देव अखेर मृत्युचे मार्गाने जातात. सदगुरु ज्याचे वर कृपा करतात तो खऱ्या अर्थाने अमर बनतो.
  • सदगुरु चिंतामणी म्हणाले ते बरोबर नाही. ज्याच्या मनांत चिंता असे त्यास चिंतामणीचे महत्त्व वाटते. सद्गुरु शिष्याच्या मनांत कसली चिंताच उरु देत नाही.
  • स्वत:पाशी असलेली आत्मवस्तु आपणास पाहता येत नाही. सूर्यप्रकाशांत लहान, मोठयांत मोठी वस्तु दिसतात पण साधकाला आत्मज्ञान प्राप्त होत ते संताचे कृपेने प्राप्त होते.
  • वाणी, मन व बुद्धि यांच्या शक्तिच्या पत्नीकडे संत आहेत. आत्मस्वरुपापुढे शंका मावळतात, प्रयत्न वाया जातात. क्षीण होऊन जातो.
  • सत्यसंगाने स्वानुभव येतो व ती वस्तु कळते. संतामुळे आत्मवस्तु कशी ते समजते. संताचा महिमा सांगणारा माणूस या जगांत नाही.
  • संत परमानंदाचे स्थान, संतोषाचे मूळ, अखंड सुख व विश्रांती व कायमची तृप्ती असते. भक्तीचे पर्यवसान झाले की संतपण येते.
  • संत तीर्थाप्रमाणे धर्माला जागवितात. संताचे अंत:करण म्हणजे आत्मस्वरुपाचा व पुण्य साठविण्याचा पवित्र ठिकाणाच होय.
  • जे परब्रहम हृदय विश्वाहून निराळे आहे. वेद व श्रुति ज्याला जाणू शकत नाहीत ते परब्रहम संत कृपेने साधकांच्या अंत:करणात प्रकट होते.
  • श्रोते – मूर्तिमंत शांति असलेले आणि सत्वगुणाने भरलेली आहेत व ते दासबोध ऐकतात.
  • भाग्यवान व ऐश्‍वर्यसंपन्न पुरुष आपल्यासमोर जे येईल त्याचा अव्हेर करत नाहींत.ते गुणग्राही असतात स्विकारतात. त्यांतील गुणाचे सेवन करतात.
  • समर्थ सांगतात – माझे श्रोते परमेश्‍वर स्वरुप आहेत. ओबडधोबड शब्दाने १ का परमेश्वराची पूजा करण्याचा मी प्रयत्न करतो.
  • समर्थ सांगतात – वाघ, सिंहाचे पिल्ले त्यांच्यासमोर खेळतात त्याचप्रमाणे संताचे मी लरेकर आहे व आपणास दासबोध सांगत आहे.
  • कवि म्हणजे वेद रुपाने अवतरलेला परमेश्वरच होय, कवीला सरस्वति पूर्ण वश असते, कवि कलांना जीवंत ठेवतो. –
  • कवि शब्दरुपी रत्नाचे समुद्र असतात. मुक्‍त पुरुषांच्या अवस्थेची सर्वागीण कल्पना कवीच करु शकतात ते अध्यात्म ग्रंथाची खाण असतात. ते बोलके जीवन चिंतामणीच असतात.
  • कवीच्या प्रतिभेचे मुमुक्षला ज्ञान दृष्टी येते. स्वकर्तव्याची जाणीव होते. मनोजयाचे उपाय समजतात. धार्मिकांना नीतीचे वळण लागते.
  • मोठ्या कवीमुळे जगाचा उद्घार झाला. व्यास, वाल्मिकी इत्यादी महाकवि त्यांनीच लोकांना विवेक शिकविला. कवि अत्यंत शुद्ध परब्रहमाचे ऐश्‍वर्य होय. दृश्य विश्वाला अंतर्यामीपणाने सांभाळणारा जो विराट पुरुष त्याची ध्यानावस्था म्हणजे कवि होय. कवि म्हणजे साकार झालेली भक्ति. –
  • अध्यात्मिक सभेत मुक्ति सुलभ होते. तेथे ईश्‍वर आपण होउुन प्रेमाने तिष्ठत उभा राहतो. अध्यात्म सभेत योगी, तपस्वी, विव्दान, वेदज, शास्त्रज्ञ तत्वज्ञानी, संत, सज्जन, महाकवी, सिध्द, साधू सर्वज्ञ लोक येतात.

समर्थ रामदास स्वामी ह्यांचे मराठी सुविचार हे  लेखक :श्री .मारुति रामचंद्र सोनार ह्यांच्या सहत्र विचार समर्थांचे ह्या पुस्तकातील आहेत .

ई- साहित्य प्रतिष्ठान कडून पूर्व संमतीने  हा लेख ह्या ब्लॉग वर प्रकाशित.

पुस्तकांची पर्वणी अश्या  esahity ह्या संकेतस्थळा भेट देवून मराठीभाषेला समृद्धा करण्यात आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यात सर्वांनी आपला वाटा उचलावा.


check at amazon

Leave a Comment