तुझ प्रेम न्हवतच !! Sad quotes about love and pain Marathi

तुझ प्रेम न्हवतच !! Sad quotes about love and pain Marathi

खूप दिवसांपासून मला वाटतंय हे फक्त माझ्या डोक्यातच असेल .

  • मला वाटायचं तसं काही मुळात नाहीच ,
  • मला नाहक शंका येतातय का?
  • मी सतत राईचा पर्वत करत असेल का?  मी स्वतःच ला दोष देत असे .

पण तू खूप स्मार्ट आपल्या नात्यातील सर्व अडचणी  ना मीच कारणीभूत अस तू मात्र माझ्या मनावर छान बिंबवलस.

पण आज तस नाहीये,  मला सर्व स्पष्ट दिसतंय. तूझ्या करता आपल्या नात्याला किती  कवडीमोल किंमत  आहे  ते ही दिसतेय. तुला माझी कितीशी काळजी आहे? मला सर्व कळतंय, लक्ष्यात येतंय, तू नेहमी माझं मनापासुन  ऐकत असल्याच दाखवत असे, पण मी बोललेल हृदयापासून कधी एकलच नाहीस.

तू कधीच मला महत्व दिले नाहीस, मनापासून प्रेम केले नाहीस , तुझ्या करता मी एक सामान्य च, खास अस माझ्या करता तुझ्या मनात काही न्हवतच.

तुझ्या जीवनात मला स्थान न्हवतचं, तुझ्यालेखी माझं स्थान म्हणजे हच्या  सारख,,  फक्त एक पर्याय कुठं तरी फिरायला सोबत जाण्याकरता,, पाच पंधरा मिनिट फोन वर टाईमपास च कदाचित मित्र मैत्रिण समोर स्वतः कौतुक करून घ्यायला.

पराकोटीचा च्या वेदना, सहन न होणाऱ्या ,पण मी तुझ्या करता काहिचं  नाही आणि माझ्याकरता मात्र तू सर्वस्व !! 

जीवन दुःख   आणि उभारी Sad quotes about love and pain Marathi

माझ्या भावना तुला कधी कळल्याच नाही. फक्त स्वतः च्या आनंदकरता माझा उपयोग करुन  घेतलास, त्या घेण्यापालिकडे माझा विचार कधी तू केलाच नाहीस. दुसऱ्या मैत्री मैत्रिणी सोबत बोलताला त्यांच्याशी तासोनतास  गप्पा मारताना तुझ्या मनात माझा विचार आलाच नाही.

इतकं कसा माझा हा बावळट पना,, लक्ष्यात कस आलं नसेल माझ्या? इतक कसंल हे आंधळपण???  पण आज ही प्रेमाची आंधळी पट्टी मी उतरवलीय,तुझे रंग समजायला वेळ लागला , पण तुझे उधळलेले रंग आजओळखाता  येतयात.

नात्यातला ला स्वार्थ दिसतोय, पापणी ही न लवता किती सहजतेने न  हे खोट बोलण, किती धुर्तपणा बोलण्यात, इतकं सफाईदार पना ??????मला तर वाटत आता तू स्वतः ही स्वतःच्या खोट्या गोष्टी वर विश्वास ठेवत असशील.

जीवन प्रेमातला धडा

मला दिसत असे तुला नात्यात कसा ताबा, नियंत्रण ,सत्ता हवी असायची , अधिकारसत्ता गाजवण आवडायचं. तुझ्या मनासारख् मी केलं की तूझ्या चेहऱ्यावरचे विजयाचे, जिंकल्याचे , आपण बलाढय असल्याचे  भाव मला आता अगदी ठळकपणे दिसतायेत.

तुझं खर रूप मला कळाल आहे, तू कधीच माझ्यावर प्रेम केले नाहीस, आजपर्यंत फक्त माझा उपयोग करत होतास.

आता माझ्या लक्ष्यात येतेय, वाटत मी किती मूर्ख आहे!!  मी स्वतःला च दोष दिला ,जस पूर्वी ही मी नेहमी आपल्या नात्यात स्वतःच ला दोष देत असे. रडू आलं, स्वतः ला शिव्या ही दिल्या,, किती मूर्खपणा, कीती भोळ असावं व्यक्तीन???

पण आता वाटत माझा दोष न्हवता !!

माझी चुक न्हवती जे  तुझ्या गोड गोड बोलण्याच्या सापळ् लाक्षात नाही आला. खोटी वचन होती सर्व. तुझ्या वर माझं प्रेम आहे ,ह्यावर मी मी विश्वास ठेवला  ह्यात माझा दोष न्हवता ,, खरं हे आहे की तू खोटं बोललास, फक्त ,तुला फक्त दिखावा हवा होता.

बराच वेळ लागला ह्यातुन बाहेर यायला.पण मला वाटत  हा प्रसंग  जीवनातला एक महत्वाचा धडा शिकवून गेला. आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या लोकबाबद्दल बरंच काही शिकवुन गेला.

आपण आपल्याला कुणाबद्दल खरं काही कळत नाही,लोक त्यांना आपण कसं पाहावं तसाच मुखवटा लावून वागत असतात.

म्हणून तुझे मनापासून आभार, कमीत कमी तीच चूक मी आयुष्यात पुन्हा तर नाही करणार !!!

दुःख निराशा कोट्स – Life pain Quotes Marathi

  • ढगांना पाण्याचा ओझं झालं की ते मुसळधार बरसतात तसच हृदयाच सुद्दा  दुःखाच ओझं अती झालं  की आसवं गळायला सुरवात होते.
  • कुणाला दुःख व्हावं म्हणून चिंतु नका तुमी तसे नाहीत, त्यानी तुमाला दुःख दिलंय कारण  ते त्यांचं मन सुद्दा दुःखी असणार त्या उलट त्यांच्या करता प्रार्थना करा.
  • बऱ्याच दा आपल्यातला वरून खूप खंबीर दिसणारा च दुःखात सतत चेहऱ्यावर हसू ठेवतो, बंद खोलीत रडतो नि एकटाच मनात किती तरी संकटांविरुद्ध लढत असतो ज्याची आपल्याला कल्पना ही नसते.
  • एकादी व्यक्ती किंवा एकादी वस्तू जाण्याने आपलं हृदय दुःखी होत असेल तर ,, होऊ द्या कारण आपल्या भावना निर्मळ आहेत. कुणाला ही शेवट नको असतो, दुःख नको असत. पण ,, पण कधी नात्यात जर पवित्रता , शुद्धता ,निर्मळता राहील नसेल तर अस नातं आपल्या जीवकरता, सुखा करता कधी कशी तोडलेली बर असतात
  • जीवनात मी जेव्हा मी वळून मागे पाहते , मला फक्त दुःख,चुका, गैरसमज,दोष,संशय चं  दिसतात पण जेव्हा आज आरशात पाहिलं तर जीवनातून मिळालेले धडे , सामर्थ्य आणि स्वाभिमान दिसतोय.
  • कधी अट्टहास सोडवा माहीत असायला हवं,  जेव्हा  मनातले विचार  शांततेत ऐवजी फक्त विपत्ती आणि संकट च आणत असतील , कुणी व्यक्ती सुखा पेक्षा वेदना च आणत असेल,,  मुक्त व्हा अश्या नात्यातून,, सोडून द्या ,, आनंद सुख नसेल तर  आयुष्य कसं जगाल??
  • एकद्याच्या दुःखाला कमी लेखू नका, सर्व च जण आयुष्यात खस्ता खात असतात, फक्त काही जण आपलं दुःख सहजरीतता लपवू शकतात.
  • मी इतक्या प्रसंगातून बाहेर आलेय की मला नाही वाटत कुठल्या गोष्टी मला आता घाबरूवु शकतात , जितकं दुःख सहन करू शकतो तितक मी सहन केलंय, जितक नात्यात, जीवनात दडपण सहन करता येईल तितक केलंय, काही आता उरलेल नाहीये. पण आज मला विश्वास आहे मी आज जगात काही करून दाखवू शकते.


check at amazon

Leave a Comment