Reading Time: 2 minutes

शब्दांचे मानसशास्त्र – Psychology power of the spoken word Marathi

शब्दांचे मानसशास्त्र - Psychology power of the spoken word
Psychology power of the spoken word Marathi

शब्दांचे मानसशास्त्र

काय तुम्हाला माहित आहे! आपल्या द्वारे वापरले जाणारे शब्द आपल्या वर्तमान मूड किंवा रगरंग वर आधारीत असतात.जर आपल्याला राग आला असेल ,तर आपले शब्द ही रागीट असतात.जर आपल्याला आनंद झाला असेल,तर तो आनंद आपल्याला शब्दातून कळतो.

एका व्यक्तीचे जीवन बदलण्यासाठी, आयुष्यात कलाटणी साथी  फक्त तीन शब्दांची गरज असते.

आपण संवाद साधताना योग्य ती शब्दरचना वापरली पाहिजे.कारण काही लोक आपल्या चुकलेल्या शब्दांना अचूक पकडतात.पुढच्या व्यक्तीचे म्हणणे काय आहे?,हे आधी ऐकले पाहिजे व नंतर त्यावर त्यासंबंधीची योग्य शब्दरचना वापरून समोरच्याला प्रभावित केले पाहिजे.

संवाद कौशल्य – Psychology power of the spoken word Marathi

 

फार पूर्वी पासूनच संवाद कौशल्य वर सर्व क्षेत्रात भर देण्यात येत असते , आता एक  संशोधनात हे पाहण्यात आल की आहे की;आजकालची माणसे एकमेकां सोबत  बोलताना खूप सौम्य शब्दांचा वापर करतात.म्हणूनच की काय! जी माणसे कठोर शब्दांचा वापर करतात ती लोकांना आवडत नाहीत.लोकांना सौम्य शब्दांचा वापर करणारी माणसे आवडतात.

अशीच गोष्ट पालक आणि मुले यांच्यात घडते.समजा, जर पालक आपल्या वात्रट मुलाला सारखे म्हणत असतील की,“तू आयुष्यात काहीच करू शकत नाहीस”,“तू असाच राहणार आहेस”,तर तो मुलगा कधी ही चांगली मार्क्स पाडायची स्वप्न पाहील का ? आणि जर पालकांनी आपल्या मुलाला सौम्य शब्दात प्रेमात समजावून सांगितले की,“बेटा आता तुला कमी मार्क्स पडलेत,पुढच्या वेळी चांगला अभ्यास कर आणि चांगले मार्क्स पाड”. तर त्यालाही बर वाटेल व तो पुढच्या वेळी चांगली मार्क्स पाडण्याचा प्रयत्नही करेल.

मुले ह्यावर विश्वास ठेवून मोठे होऊ शकतात की;आपण जगात असंभव गोष्टी संभव करण्यासाठी आलोय.म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांना सकरात्मकतेकडे नेण्यासाठी प्रेमळ म्हणजेच गोड शब्दांचा वापर केला पाहिजे.

संगीतात असणारे शब्दांचे मानसशास्त्र-

तुम्हाला माहीत आहे का?,की आपल्याद्वारे ऐकल्या जाणाऱ्या गाण्यांचा निसर्गाचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो.जे लोक निराश असतात,ते त्याप्रकारचे गाणे ऐकून त्यात आनंदी होतात; कारण गाण्यात बोललेले शब्द त्यांना तात्पुरता का होईन थोडा दिलासा देतात .

आताच उदाहरण पहाल तर आजच्या युवा पिढीला रैप आणि हिप हॉप गाणी पसंद असतात.रैप गाणी ऐकल्यानंतर ते रैप गाणं म्हणणाऱ्या गायकाप्रमणे वागतात.हेच तर संगीतात असणारे शब्दाचे मानसशास्त्र आहे .ही काही अशी उदाहरणे आहेत जी सांगतात की ,“शब्दांचे मानसशास्त्र किती शक्तीशाली आहे ते”

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Rushikesh
Rushikesh
3 months ago

👌👌👌👌

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x