शब्द हे खूप शक्तिशाली असतात Power of words and thoughts Marathi

शेअर करा:

शब्द हे खूप शक्तिशाली असतात power of words and thoughts Marathi

शब्द हे खूप शक्तिशाली असतात.मानवी इतिहासात श्रेष्ठ बुद्धीचे लोक या गोष्टीवर सहमत झाले आहेत की;शब्द हे खूप बलवान असतात.आपल्या हृदयात असणारे बोल तोंडावाटे शब्द बोलतात.

समजा एका घराचा प्रमुख व्यक्ती,दररोज खूप मेहनत करत असेल आणि दिवसभर मालकाचे वाईट बोलणे ऐकत असेल,तर जेव्हा तो घरी येईल आणि घरातील बाकीची माणसे त्याला त्याचा कमी पगारावरून दररोज वाईट-साईट बोलत असतील तर,त्या प्रमुख व्यक्तीला कधी ना कधी तरी राग अनावर होईलच ना!तो राग तो काय मालकावर काढणार आहे होय ? नाही तो राग तो आपल्या कुटुंबातील लोकांवर काढेल.

समजा तोच व्यक्ती रोज कष्ट करून,मालकाचे वाईट साईट बोलणे ऐकून घरी येत असेल,पण घरात आल्या आल्या त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याला पाण्याचा ग्लास भरून दिला आणि त्याच्या बरोबर दररोज थोडेफार गोड शब्द बोलले,तर त्याला किती भारी वाटेल नाही का ?त्याचा दिवसभराचा कंटाळा क्षणार्धात नष्ट होऊन जाईल.

वरती आपण दोन उदाहरणे पाहिली. पहिल्या उदाहरणात: घरातील लोकांनी बोललेल्या शब्दांमुळे त्या प्रमुख व्यक्तीचा राग अनावर झाला आणि दुसऱ्या उदाहरणात:त्या प्रमूख व्यक्तीला आलेला ताण थोडेफार गोड शब्द बोलल्यामुळे नष्ट झाला.आपण पण असाच शब्दांचा योग्य वापर माणसे जोडण्यासाठी केला पाहिजे.

पब्लिलियस सायरस म्हणतात की,“भाषण आत्माचे प्रतिबिंब आहे ”,  चार्लस कॅपस यांचे असे म्हणणे आहे की,“शब्द हे ब्रम्हांडातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे.” शब्दांमध्ये विश्वास आणि भीती दोन्ही गोष्टी असतात. बेंजामिन म्हणतात की,“शब्दांवरून माणसाची बुद्धी समजते”.जर तो बोलताना गोड शब्द वापरत असेल तर तो चांगला व्यक्ती व त्याची बुद्धी चांगली आणि जर तो वाईट शब्द वापरत असेल तर तो वाईट व्यक्ती व त्याची बुद्धीही वाईट.

शब्द केवळ अक्षरांचा संग्रह नाही तर हृदयापासून आलेल्या गोड भावाचा उच्चार आहेत.शब्द मेंदूचे भाव आहेत.शब्द मेंदूत चालणाऱ्या विचार प्रक्रियेतून उत्पन्न होतात;परंतु ते आपल्या विचारशैलीने किंवा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीप्रमाणे लोकांपुढे प्रदर्शित होतात.आपण जर चांगले विचार मनात आणले तर आपले शब्दही तसे चांगले असतात आणि जर आपण सतत वाईट विचार मनात आणले तर आपले शब्दही वाईटच बाहेर येणार,याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो.

आपली शब्दरचना सांगते की आपण कोण आहे  ते ? आपण काय विचार करतो ?आणि आपण कसे जगतो ?,हेही आपले शब्दच सांगतात.शब्द हे आपल्या अंतर्मनात चालणाऱ्या विचारांना दुनियेसमोर प्रकट करतात.शब्द केवळ साधारण गोष्ट नाही. शब्द खूप शक्तिशाली गोष्ट आहे,ज्याचा जर चांगल्या पद्धतीने आपल्याला वापर करता आला तर आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो आणि जर त्याचा वापर आपण वाईट पद्धतीने केला तर आपण निराशेत ही जाऊ शकतो.

शब्द इतके शक्तिशाली आहेत तर,हे समजणे चुकीचे नाही की शब्दांवरून आपली बुद्धिमत्ता समजते. तुमच्या द्वारे दैनंदिन जीवनात वापरले जाणारे शब्द तुमचे भविष्य चांगले घडवू शकतात आणि वाईटही घडवू शकतात.ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे की तुम्ही शब्दांचा सफलता प्राप्त करण्यामध्ये वापर करताय की असफलता प्राप्त करण्यामध्ये.जर तुम्ही शब्दांचा योग्य रित्या वापर केला नाही तर ते तुमच्या अपयशाचे कारणही बनतील.

आता बस , अशक्य – power of words and thoughts Marathi

अल्बर्ट एलिस द्वारे बोलल्या जाणाऱ्या एका वाक्याचा खूप लोक प्रचार करतात.‛कॅन्ट स्टँड इट इटीस’ ह्या वाक्याचा काही लोक दररोज प्रचार करतात.

तुम्ही खूप वेळा ऐकले असेल की ,“मी याला सहन नाही करू शकत”.काही लोक ह्या गोष्टीला वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात,ती पद्धत म्हणजे,“मला आवडत नाही याच्या बरोबर राहिलेल”,”मी त्याच्याशी भांडू शकत नाही”,”मी हे करू शकत नाही”,”मी ह्याला सांभाळू शकत नाही”.जेव्हा लोक स्वतःला व्यक्त करण्यासाठी वरील वाक्यांशाचा वापर करतात,तेव्हा ते प्लेग रोग सारखे घातक असतात.

तर तुम्हाला काय वाटते ? स्वतःला व्यक्त करण्याचा परिणाम काय होईल ? त्या प्रश्नाचे उत्तर हे आहे की,

विचार करा आपण प्लेग च आजार झालेल्या व्यक्तीशी कसे वागाल ?

का तुम्ही त्याच्यासोबत बसाल ?

का त्याचे मनोरंजन कराल ? त्याच्या अंगाला स्पर्श कराल ?

त्याच्यासोबत जेवण कराल ?

मला नाही वाटत, खास करून ती व्यक्ती तुमची कोणी नसल्यास तुम्ही त्याच्या पासून दूर पळाल! मला हे पण माहिती आहे तुम्ही त्या व्यक्तीशी चांगले वागणार नाही , चांगले वागणे तर सोडाच तुम्ही प्लेग झालेल्या व्यक्ती च्या संपर्कातही राहणार नाही, त्याच्यासोबत जेवण करणार नाही,त्याच्या अंगाला स्पर्श करणार नाही,हे सर्व बरोबर आहे ना!आपण ती प्लेग झालेली व्यक्ती अनोळखी असली तर त्याच्यापासून पळून जाणार.

हेच कारण आहे की खूप सारे लोक काही गोष्टींसाठी लढा देण्यापेक्षा,त्यापासून दूर पळतात. लढा देतात त्यांना माहीत आहे की; ह्याचा जर आपण सामना करायला गेलो तर ते आपल्यासाठी घातक आहे.म्हणून ते म्हणतात ,“मी त्याला सहन नाही करू शकत”,परंतु वास्तविकता ही आहे की,ते त्याला सहन करू शकतात.पण ते घातक असल्यामुळे ते त्याच्यापासून दूर जाण्यातच समाधान मानतात.

शब्दांकडे खूप ताकद असते हे आपण आधी पाहिले. शब्द तुम्हाला सुंदर जीवन जगण्यासाठी,तसेच वाईट जीवन जगण्यासाठी मदत करतात.एक म्हण आहे की,“लेखनी तलवारीपेक्षा शक्तिशाली असतो;कारण की तलवार ही योद्ध्याला वाचवते तर लेखनी हा कल्पनाशक्तीला जागवतो.


Check at Amazon

Leave a Comment