पाओलो कोएलो बायोग्राफी मराठी – Paulo Coelho Biography in Marathi

शेअर करा:

पाओलो कोएलो बायोग्राफी मराठी

24 आगस्ट 1947 मध्ये ब्राझील देशातील रिओ-द-जनेरो या शहरामध्ये पाओलो कोएलो यांचा जन्म झाला. पाओलो कोएलो हे एक विश्व प्रसिद्ध कादंबरीकार आणि गीतकार आहेत.त्यांनी आतापर्यंत खूप पुस्तके लिहिली आहेत.त्यांची पुस्तके संपूर्ण जगात वाचली जातात.द अलचेमिस्ट हे त्यांचे सर्वात यशस्वी पुस्तक आहे.द अलचेमिस्ट पुस्तकाचा जवळजवळ 67हुन अधिक भाषेमध्ये अनुवाद झाला आहे.त्यांना पुस्तकासाठी खूप अवॉर्डस भेटले आहेत आणि सोशल मिडियावरती ते सर्वाधिक फोलल्वर्स असणारे लेखक आहेत.

पाओलो कोएलो यांचे करिअर –

  • साल 1982 मध्ये कोएलो यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले.जे पुस्तक अयशस्वी ठरले.त्यांनी नंतर किमयागार म्हणजे द अलचेमिस्ट हे पुस्तक लिहिले.
  • सुरवातीला या पुस्तकाच्या 900 प्रति विकल्या गेल्या.पहिल्यांदा त्यांना छोटे प्रकाशन हाऊस भेटले पुस्तक प्रकाशित करण्यासाठी.नंतर त्यांना मोठे प्रकाशन हाऊस भेटले.हार्पर कोलीनस,अमेरिकेतील सर्वात मोठे प्रकाशन हाऊस मध्ये त्यांनी पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.तेव्हा ते पुस्तक सर्वप्रथम ब्राझील बेस्ट सेलर पुस्तक बनले.
  • नंतर पब्लिश केलेल्या द अलचेमिस्ट पुस्तकाच्या 83 मिलियन हुन जास्त प्रति खपल्या गेल्या आणि त्या पुस्तकाचा 67 हुन अधिक भाषेत अनुवाद केल्याचा विश्व रेकॉर्ड झाला.
  • किमयागार म्हणजे द अलचेमिस्ट पुस्तकात एक मेंढपाळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पिरॅमिड मधला खजिना कसा मिळवतो आणि त्याची खजिन्यापर्यंतचा प्रवास हे आहे.द अलचेमिस्ट च्या यशानंतर पाओलो कोएलो दर दोन वर्षाला आपली नवीन कादंबरी प्रकाशित करतात.

पाओलो कोएलो यांचे अनमोल विचार –– Paulo Coelho Biography in Marathi

  • आपल्या स्वप्नांना ध्यानात ठेवा आणि त्यांच्यासाठी लढा.तुम्हाला माहिती असले पाहिजे की तुमचे ध्येय काय आहे ते.तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब ठेवण्याचे काम एकच गोष्ट करते,ती गोष्ट म्हणजे हरण्याची भीती.
  • धाडसी व्हा.धाडस करा.यशामध्ये अनुभवा पेक्ष्या कृती ला महत्व आहे.
  • मी माझ्या नियतीला नियंत्रित करू शकतो, माझ्या भाग्याला नाही.नियती म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे रस्ता आहे आणि भाग्य म्हणजे फक्त एकच रस्ता आहे.माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीत दोन रस्ते असतात.
  • जर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मनापासून प्रेम केले तर ती गोष्ट तुम्हाला मिळण्यापासून जगातील कोणतीच ताकद थांबवू शकत नाही.
  • प्रेम करण्यासाठी कोणत्याही कारणाची आवश्यक्यता भासत नाही.
  • जीवनाचे रहस्य सात वेळा पडून, कोलमडुन ही आठव्या वेळा भरारी घेण्यात आहे.
  • साधारण गोष्टीच असाधारण असतात.बुद्धिमानी माणूसच त्या गोष्टींना पाहू शकतो.
  • सगळ्यांना बाकीचे लोक कसे जीवन घालवतायत हे माहीत आहे,पण काहींना आपल्याच जीवनात काय चाललंय हे अजून माहीत नाही.
  • एक लहान बाळ मोठ्या लोकांना तीन गोष्टी शिकवते.पहिली गोष्ट,आनंदी राहण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज लागत नाही,दुसरी गोष्ट,सदैव आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवावे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे पाहीजेल त्याला पूर्ण ताकद लावून कसे मिळवायचे ते.
  • एक गोष्ट धेनात ठेवा.जिथे कुठे तुमचे मन आहे,तिथेच तुमचा खजिना दडला आहे.
  • जगात कोणतीच गोष्ट पूर्ण पणे चुकीची नसते,बिघडलेले घडयाळ ही दिवसातून दोनवेळा वेळ व्यवस्थित दाखवते.
  • तुम्ही ते आहात जे तुम्ही बनण्याचा विश्वास करताय.
  • माणसे आपल्या जीवनात कोणत्याही क्षणी आपल्या आवडीची गोष्ट करण्याची क्षमता ठेवतात.
  • जो कोणीही ह्या आशेवर प्रेम करतोय,की जिथे प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळेल,तो फक्त आपला वेळ वाया घालवतोय.


The Best Books – of Paulo Coelho

लेखक –

Leave a Comment