नाओमी ओसाका ह्या एक टेनिस खेळाडू आहेत.
त्या 2018 साली आयोजित केलेल्या यूएस ओपन आणि 2019 साली ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये जिंकून त्यांनी वर्ल्ड महिला टेनिस रँकिंग मध्ये पहिले स्थान पटकावले.त्या महिला व पुरुष दोन्हीमध्ये पहिल्या अशा आशियाई खेळाडू आहेत की,ज्यांनी वर्ल्ड टेनिस रँकिंग मध्ये पहिली रँक मिळवली आहे.
कोण आहेत नाओमी ओसाका ?
- नाओमी ओसाका यांनी अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून टेनिस खेळायला सुरवात केली.
- त्या अमेरिकेत वाढल्या पण त्यांनी नंतर जपानचे नागरिकत्व घेतले आणि त्या नंतर जपानला टेनिस मध्ये नेतृत्व करायला लागल्या.त्यांची आई जपानची होती, तर त्यांचे वडील हैती चे होते.
- त्या पहिल्या जपानी खेळाडू आहेत की ज्यांनी ग्रँड स्लॅम चे पदक जिंकले आहे.
- त्या पहिल्या आशियाई खेळाडू आहेत की ज्यांनी टेनिस मध्ये वर्ल्ड रँकिंग मध्ये प्रथम स्थान पटकावले आहे.
त्यांचे अगोदरचे जीवन आणि त्यांचे कुटुंब –
- 16 ऑक्टोम्बर 1997 साली नाओमी ओसाका यांचा जन्म ओसाका,जपान येथे झाला.त्यांच्या आई वडिलांची भेट 1990 मध्ये सपोरो येथे झाली.
- नाओमी यांचे वडील म्हणजे लिओनारर्ड सान ह्यांचा जन्म करेबियाई देशामध्ये हैती मध्ये झाला.उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले.न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मधून त्यांनी मास्टर ची पदवी पूर्ण केली.
- त्यानंतर शिक्षणा संदर्भात ते जपान मध्ये राहिले,तिथेच जपानमध्ये त्यांची भेट तमाकी ओसाका यांच्याशी झाली.ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते.त्या दोघांना लग्न करून पुढचे आयुष्य एकमेकांसोबत घालवायचे होते.तमाकी याना माहीत होते की आपल्या घरातील लग्नाला नकार देणार ते.
- जेव्हा तमाकीज म्हणजे नाओमी च्या आईच्या घरी कळले की नाओमी चे वडील हे एका हैतीयत परिवाराचे आहेत,तेव्हा त्यांनी लग्नाला साफ नकार दिला.घराचा नकार असूनही त्या दोघांना एकेमकांसोबत लग्न करायचे होते.त्यामुळे ते दोघे लग्न करून ओसाका शहरात राहू लागले.
- ह्याच ओसाका शहरात नाओमी ओसाका यांचा जन्म झाला.मारीच्या नंतर नाओमी चा जन्म झाला.समाजामध्ये हैती ला एवढे स्थान नव्हते,त्यामुळे आईने आपल्या दोन्ही मुलींना ओसाका आडनाव दिले.
- नाओमी च्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांना अमेरिकेत चांगली नोकरी मिळाली.2000 सालात टेनिस जगतात विलियम सिस्टर यांची जादू चालू होती.
- नाओमी च्या वडिलांना टेनिस खूप आवडायचे.ते आपल्या मुलींना घेऊन टेनिस चा सामना बघायला जायचे.त्यांनी निर्णय घेतला की आपल्या मुलींना आपण टेनिस खेळाडू बनवायचे.दोन्हीही मुलींनी फ्लोरिडा टेनिस अकॅडमी मध्ये ट्रेनिंग घेतले आणि लवकरच ते स्थानीय सामन्यात भाग घ्यायला लागले.
नाओमी ओसाका यांच्याबद्दल – Naomi Osaka Biography in Marathi
- नाओमी ओसाका उजव्या हाताच्या खेळाडू आहेत.त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट हा 2014 मध्ये झालेल्या बँक ऑफ वेस्ट सामना होता.
- फोरहेड हा त्यांचा आवडीचा शॉट आहे.त्या 2016 मध्ये डब्लू टी ए न्यूकमर ऑफ द इयर होत्या.त्या ग्रँड स्लॅम ‘किताब जिंकणाऱ्या पहिल्या जपानी होत्या.
- आई वडील दोघेही वेगवेगळ्या देशातील असल्यामुळे सुरवातीला नाओमी ह्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले, तरीही त्या हरल्या नाहीत आणि आज त्या यशाच्या उच्च शिखरावर आहेत.
- 2013 मध्ये त्यानी टेनिस मध्ये पदार्पण केले.त्यांच्या उत्कृष्ट सर्व आणि फोरहेड मुळे त्या सुपर स्टार झाल्या.
नाओमी ओसाका यांच्या आवडीच्या गोष्टी :
- त्यांचे सर्वात आवडीचे ठिकाण टोकियो आहे.
- त्यांच्या आवडत्या टेनिस प्लेयर सेरेना विल्यम्सन आहेत.
- रिचर्ड विलीयम्स त्यांचे आवडीचे प्रशिक्षक आहेत.
- जपानी असल्यामुळे त्यांना सुशी खायला आवडते.
- त्यांना हिकारू उटाता,अमांडा पामर यांची गाणी ऐकायला आवडतात.
- प्लेनेट ऑफ एप त्यांची आवडती मूवी आहे.
- त्यांना पुस्तके वाचायलाही खूप आवडतात.
नाओमी ओसाका यांच्याबाबत काही रोचक तथ्य –
- नाओमी आणि त्यांची बहीण मारी आपल्या वडिलांच्या आडनावाचा वापर न करता आपल्या आईच्या आडनावाचा वापर करतात.
- 3 वर्षाच्या वयात अमेरिकेत राहूनही त्या जपानचे नेतृत्व करतात.
- नाओमी ओसाका ह्यांना प्राण्यांवरती खूप प्रेम आहे.त्यांच्याकडे पांडा नावाचा एक कुत्रा ही आहे.
Naomi Osaka (My Early Library: My Itty-Bitty Bio)
लेखक –