सोमवारचे 40 प्रेरणादायक विचार – Monday motivational thoughts in Marathi

सोमवारचे 40 प्रेरणादायक विचार – Monday motivational thoughts in Marathi

● वेळेनुसार,परिस्थितीनुसार आपण स्वतामध्ये,आपल्या कृतीमध्ये,कुठल्याही कार्यामध्ये,कार्य करण्याच्या पदधतीमध्ये,दिशेमध्ये परिवर्तन घडवुन आणने फार गरजेचे आहे.कारण कुठलीही परिस्थिती नेहमी एकसारखीच राहत नसते.म्हणुन आपण परिवर्तनाचा स्वीकार करून त्यानुसार योग्य ती पाऊले टाकत राहायला हवी.

● आपण आपल्या भीतीवर मात करुन पुढे जात राहायला हवे कारण भीतीवर मात करूनच आपण आपल्या ध्येयापर्यत पोहचु शकतो.भीती आपल्याला आपल्या ध्येयापासुन नेहमी दुर ठेवत असते.

● आपण आपल्या comfort zone मध्ये कधीही राहु नये कारण आपल्या comfort zone च्या पलीकडे जाऊन कुठलेही काम करण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ शकते म्हणून आपण स्वताला नेहमी comfort zone मध्ये न ठेवण्यासाठी नेहमी small small steps घेऊन स्वताला push करत राहायला हवे.

● जीवणात उचललेल्या आपल्या छोटछोटया स्टेपस आपल्याला आपल्या एका मोठया ध्येयाकडे घेऊन जात असतात.

● जेव्हा कुठलेही कार्य करताना आपणास खुप अडचणी येत असतील,अडथळे येत असतील,खुप शारीरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असेल तर अशा वेळी आपण कार्य करताना आपल्याला होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करून ते कार्य पुर्ण केल्यानंतर आपल्याला जे bright future life प्राप्त होईल त्याला डोळयांनी बघत असल्याचे imagine करायला हवे.याने आपण मोठयातला मोठा संघर्षाचा प्रवास देखील आनंदाने न थकता सहज पुर्ण करू शकतो.आणि आपले ध्येय लवकरात लवकर गाठु शकतो.

● आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण बहुमुल्य आहे जो आपल्याला एकदाच जगायला तसेच अनुभवायला मिळतो.म्हणुन भविष्याची चिंता न करता,भुतकाळात झालेल्या केलेल्या चुकांविषयी पस्तावा न करता,भुतकाळात घडलेल्या घटना प्रसंगा विषयी मनात कोणाविषयी सुदधा कुठलाही राग दवेष तिस्स्कार न ठेवता,भुतकाळात घडलेल्या घटना प्रसंगांचे दुख न बाळगता,भविष्यात घडु शकतील अशा घटना प्रसंगाची,एखादी वस्तु तसेच व्यक्ती गमावण्याची भीती मनात न बाळगता आज आपल्या हातात जे वर्तमानातील क्षण आहे आपण त्या वर्तमानातील आत्ताच्या प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्यायला हवा.

● ज्यांना गरूडासारखी उंच भरारी घ्यायची असते त्यांना कावळयांची संगत सोडणे गरजेचे असते.

● जर आपण प्रत्येक वेळी एक नवीन चुक करत असाल आणि त्या केलेल्या चुकीतुन रोज काही बोध शिकवण घेत असाल तर समजून जा की तुम्ही प्रगतीच्या दिशेने चालले आहात.

● आयुष्यात अशा प्रकारे जिंका की पाहत असलेल्यांना असे दिसायला हवे की जिंकणे तुमच्या रक्तातच आहे.आणि हरले तर अशा पदधतीने हरा की वाटायला हवे की रोज रोज जिंकुन कंटाळा आल्याने मजा मस्ती विरंगुळा तसेच गंमत म्हणुन तुम्ही हारले आहात.

● जगातील सर्वात मोठे यश हे आपणास सर्वात मोठया अपयशाचा सामना केल्यानंतरच प्राप्त होत असते.

● जिथे आपल्याला वाटते की आता सर्व काही संपुष्टात आले आहे खरी सुरूवात तिथूनच होत असते.

● जेव्हा जीवणात अत्यंत कठिन काळ चालु असेल तेव्हा आपण स्वताला सांगायला हवे की शर्यत तसेच संघर्ष अजुन संपलेला नाहीये कारण अजुन मी विजय प्राप्त केलेला नाहीये.

● कधी कधी मनातील वादळ आणि संतापाची लाट समुद्रातील वादळ आणि लाटेपेक्षा अधिक भयंकर ठरत असते.

● जे भविष्यात घडु शकते किंवा भुतकाळात घडुन गेले आहे आपल्या हातात आज नाही त्याचा विचार करून त्याच्या मागे आपली उर्जा वाया घालुन स्वताचे शारीरीक आणि मानसिक स्वास्थय बिघडवून घेण्यापेक्षा आणि स्वताला त्रास करून घेण्यापेक्षा जे वर्तमानात आपल्या हातात आहे ते करावे.त्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे.

● आज जो क्षण मी जगतो आहे तो माझ्या आयुष्यातील शेवटचा क्षण आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घेणे आस्वाद घेणे.आणि आपल्या अवतीभोवतीच्या इतरांना देखील आनंदी ठेवणे हेच खर जीवन आहे.

● जग तुम्हाला वेड म्हणत असेल तर म्हणु द्या कारण वेडेच इतिहास रचतात आणि शहाणे तो वाचतात त्याचा अभ्यास करतात.

● जिंकायची खरी मज्जा तेव्हाच असते जेव्हा आपले शत्रु आपले शत्रु आपल्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात.

● कुठल्याही अडी अडचणीवर संकटावर मात करण्यासाठी नेहमी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत राहायला हवा आणि मार्ग सापडतच नसेल तर स्वताचा एक अलग मार्ग तयार करावा.

● यशाचा खरा आनंद त्यालाच कळतो ज्याने कित्येकदा ते यश प्राप्त करण्याच्या प्रवासात अपयशाची चव चाखलेली असते.

● आयुष्यात आलेली संकटे ही आपल्याला जीवणात आलेल्या कुठल्याही परिस्थितीशी लढण्यासाठी अधिक कणखर बनवत असतात.

● ज्याच्याजवळ आशेचा एक छोटासा किरण देखील आहे तो आयुष्यात कधीच निराश होत नाही.

● आपण निवडलेल्या ध्येयावर लोक आपल्याला हसत असतील आपला विरोध करत असतील तर समजुन जावे की आपण एक मोठे ध्येय निवडले आहे.

● आपण जेव्हा आपले कतृत्व सिदध करत असतो तेव्हा आपल्याकडे संदेहाच्या भावनेने बघणारे सुदधा आपला आदर करू लागतात.

● आयुष्य ही एक अवघड परीक्षा आहे पण अशक्य नव्हे.

● नाव,विश्वास आणि संपत्ती ह्या तीन अशा गोष्टी आहेत ज्या कमवायला अर्धे आयुष्य जाऊन लागते पण गमवायला एक क्षणही लागत नसतो.

● खरा विजेता कुठलीही वेगळी गोष्ट करत नसतो तर तीच गोष्ट आपल्याला अधिक चांगल्या पदधतीने करण्यासाठी कोणत्या वेगळया पदधतीचा वापर करता येईल याचा नेहमी विचार करत असतो.

● प्रत्येक व्यक्तीच्या अंगी परमेश्वराने अलग गुण अलग कौशल्ये दिलेली असतात म्हणुन कधीही आपण इतरांसोबत स्वताची तुलना करून परमेश्वराच्या रचनेचा अपमान करू नये.

● यश प्राप्त करण्यासाठी आपल्या मनात असलेली ईच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असणे गरजेचे आहे.

● खुप मेहनत घेऊनही जेव्हा हातात काहीच लागत नसते तेव्हा दोन गोष्टी नक्कीच प्राप्त होत असतात चांगला तसेच वाईट अनुभव.

● एखाद्या व्यक्तीला काही चुकीचे शब्द बोलुन झाल्यानंतर त्याचा विचार आणि पस्तावा करत बसण्यापेक्षा आपण काहीही बोलण्याच्या अगोदर विचार करणे कधीही चांगले असते.

● जेव्हा वाटेल की खूप प्रयत्न करूनही आपणास यश प्राप्त होत नाहीये तेव्हा स्वताची समजुन घाला आणि पुन्हा प्रयत्न करायला सुरूवात करा काय सांगता येते की पुढचा एक प्रयत्न तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.

● राग आल्यावर आपण थोडा संयम राखायला हवा म्हणजे नंतर आपल्या वागण्या बोलण्या बददल आपणास पस्तावा करण्याची वेद येत नाही.

● गर्दीतील भाग असणारा एक व्यक्ती तर आज सर्वच आहेत म्हणुन बनायचेच असेल तर आपण त्या गर्दीचे कारण बनायला हवे.

● एकावेळी एकच काम करावे पण ते अशा पदधतीने करावे की सर्व जग आपल्याला त्या कामामुळे ओळखेल.

● यशस्वी होण्याचा एकच मार्ग आहे कारणे सांगणे बंद करून मार्ग शोधणे सुरू करणे.

● ज्यांचे ध्येय मोठे असते त्यांचा संघर्ष देखील तेवढाच मोठा असतो.

● चुकीच्या दिशेने वेगात धावण्यापेक्षा योग्य दिशेकडे हळु हळु पाऊले टाकत चालत राहणे कधीही चांगले.

● प्रत्येक अपयश आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी काय करायला हवे आणि काय नाही करायला हवे याची जाणीव करून देत असते.

● जेव्हा आपण एखादे चांगले काम करतो तेव्हा आपल्याला मांजर कमी पण माणसेच जास्त आडवी येऊ लागतात.

● बोलुन दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यात खरे सामर्थ्य आणि कतृत्व असते.

Leave a Comment