42 प्रेरणादायक विचार – 42 Inspirational Thoughts In Marathi – Marathi Quotes On Positive Thinking

42 प्रेरणादायक विचार – 42 Inspirational Thoughts In Marathi -Marathi Quotes On Positive Thinking

1)सौंदर्य हे कुठल्याही वस्तुत नसते तर बघत असलेल्या व्यक्तीच्या दृष्टीमध्ये सौंदर्य असते.

2)आपल्या ध्येयाच्या दिशेने धावत असताना अर्ध्या रस्त्यात मागे वळण्याचा विचार करू नये कारण आपल्याला तिथून परत जायला जेवढे अंतर पार करावे लागते तेवढयाच अंतरावर आपले ध्येय असते.

3)यश प्राप्त करण्याचा ह्या जगात कुठलाही शाँर्ट कट मार्ग नाही.

4)माणुस तीनच गोष्टींनी हुशार बनत असतो.वाचलेल्या पुस्तकांमुळे,भेटलेल्या माणसांमुळे,जीवनात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांमुळे.

5)मागुन नाव तर सर्व जगच आपल्याला ठेवत असते.पण त्याच ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनविणे हे आपल्या हातात असते.

6)मेहनत ही एक अशी किल्ली आहे जिच्यामुळे यशाचे दरवाजे उघडले जात असतात.

7)आयुष्य जगायचे असेल तर स्वताच्या आवडीनुसार जगा जगाची आवड तर काय ती रोजच दिवसेंदिवस बदलतच राहते.

8)कुठलेही कार्य करण्याआधी आपण एकदा क्षणभर थांबुन जावे.भविष्यात होणारया त्या कार्याच्या परिणामांचा विचार करावा आणि नंतर त्या कार्याला सुरूवात करावी.

9)ज्यांच्याजवळ विचारांची शक्ती असते ते कधीच एकटे नसतात.

10) स्वताचा मोठेपणा कधीही जगाला सांगु नये कारण सदगुणाचा सुगंध हा दुरूनच जगाला येऊन जात असतो.

11)आयुष्यात आपल्याला वेळ आणि अनुभव पण शिकवत असतो आणि गुरू पण शिकवत असतात फरक फक्त एवढाच असतो की वेळ ही आपल्याला कुठलीही गोष्ट परीक्षा घेऊन शिकवत असते आणि त्यातुनच आपणास अनुभव प्राप्त होतो.आणि गुरू हे आधी शिकवतात मग आपली परीक्षा घेत असतात.

12) शब्दांचा वापर आपण कधीही जपुन करायला हवा कारण शब्द हे तलवारीपेक्षा धारदार असतात जे एखाद्याचे हदय चिरून टाकत असतात.

13) कधीही कोणाकडुन सहानुभुतीची अपेक्षा ठेवू नका कारण याने सहानुभुती देत असलेल्याची ताकद अहंकार वाढत असतो.आणि ती घेत असलेल्याच्या दुर्बलतेत अधिक वाढ होते.

14) योग्य वेळ येण्याची वाट बघण्याकरीता स्वतावर संयम ठेवणे फार गरजेचे असते.आणि हीच आपली आयुष्यातील सगळयात मोठी आणि अवघड अशी परीक्षा देखील असते.

15) आपल्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा उपाय आपल्याकडेच असतो फक्त आपल्याला शोधावा लागत असतो.

16) आयुष्य बदलायला वेळ ही सर्वानाच प्राप्त होत असते.पण वेळ बदलायला आपणास आयुष्य पुन्हा प्राप्त होत असते.

17) आयुष्यात आपली घेतली जाणारी परीक्षा आपल्यावर आलेली संकटे म्हणजे आपली संघर्ष करण्याची क्षमता जाणुन घेण्याची अणि तिला अजुन विकसित करण्याची आपणास प्राप्त झालेली एक सुवर्णसंधी असते.

18)आपण किती जगलो हे आपण मेल्यावर कोणीही विचारत नाही पण आपण कसे जगलो हे सर्व जग बघत असते.

19)कुठलाही चांगला विचार जोपर्यत आपण स्वता आचरणात आणत नाही तो पर्यत परिवर्तन घडुच शकत नाही.

20) शांतता ही कधीही बाहेरील जगात शोधुन प्राप्त होत नसते.ती आपल्याला आपल्या आत डोकावूनच शोधावी लागते.

21)आयुष्यात सर्वात जास्त विश्वास आपण स्वतावर आणि परमेश्वरावर ठेवायला हवा.

22) रागावर मात करायची असेल तर मौन पाळणे हाच एक उत्तम उपाय आहे.

23) आपल्यावर आलेली संकटे आपली कुठलेही कार्य करण्याची शक्ती आणि क्षमता यादोघांमध्ये वाढ घडवून आणत असतात.

24) जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हातात नसेल तर तिचा जास्त विचार करून स्वताला त्रास करून न घेता अशावेळी जे आपल्या हातात आहे ते करण्याकडे आपण अधिक लक्ष द्यायला हवे.

25) कुठलेही काम करताना मनात आनंद असला की कोणतेही काम आपणास ओझे वाटत नसते.

26) जेव्हा आपणास हे कळते की जीवणात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसते आपले आयुष्य देखील नाही तेव्हा बाह्य सुख वस्तुंवरचा आपला मोह आपोआप कमी कमी होत जातो.

27) यश न मिळणे याचा अर्थ कधीही पराभव होणे हा नसतो तर आपण आपल्या ध्येयाच्या अजुन एक पाऊल जवळ आलो आहोत असा होत असतो.कारण पराभवच आपणास सांगत असतो आपण लवकरात लवकर यश प्राप्त करण्यासाठी काय करायला हवे आणि काय नाही.

28) कितीही वाईट परिस्थिती असो स्वतावर थोडा संयम ठेवला आणि आपण निरंतर प्रयत्न करत राहीलो तर नक्कीच काही ना काही मार्ग हा निघतच असतो.

29) भीती हा आपल्या यशप्राप्तीच्या मार्गातील सगळयात मोठा अडथळा असतो.

30) आयुष्यातील प्रत्येक क्षण आपणास काहीतरी नवीन शिकवण देऊन जात असतो.

31)आपल्यावर आलेली वाईट वेळ हीच आपल्याला सांगत असते खर कोण आपले आहे आणि कोण आपले असल्याचा नुसता देखावा करत आहे.

32) आयुष्यात येणार असलेल्या संकटांना अडी अडचणींना आपण टाळु शकत नसतो पण त्यांचा जिददीने सामना करून त्यावर मात नक्कीच करू शकतो.

33) जेव्हा आपल्या खांद्यावर जबाबदारी पडत असते.तेव्हा आपल्या शरीरातील आळस आणि कंटाळा आपोआप नाहीसा होतो आणि आपल्या शरीरातील शक्तीत आणि क्षमतेत देखील दुप्पट पटीने वाढ होत असते.

34) तुम्ही प्राप्त केलेले मोठे यश आणि जीवणात गाठलेले उच्च शिखर हे तुम्हाला त्रास देणारयांना तुम्हाला मागे खेचणारयांना तुम्ही दिलेले सगळयात मोठे प्रत्युत्तर ठरत असते.

35) प्रत्येक समस्या काहीतरी मोठे आणि नवीन कार्य करण्याची आपणासाठी संधी घेऊन येत असते.

36) सुखाची खरी किंमत त्यालाच कळते ज्याने दुखाचा मोठा डोंगर पार करून ते सुख प्राप्त केलेले असते.

37) जेव्हा चहुबाजुने आपल्यावर अडीअडचणी संकटांचे वार होऊ लागतात तेव्हा समजुन जावे की आपण यशाच्या खुपच जवळ पोहचलेलो आहोत.

38) जेव्हा सर्व जग,आपले कुटुंब,नातेवाईक तसेच मित्र देखील आपल्या विरोधात उभे असतात आपली साथ सोडुन देतात तेव्हा समजुन जावे आपण एकदम योग्य आणि उत्तम मार्गाने चाललो आहोत.

39) काल केलेल्या प्रगतीपेक्षा आज अजुन थोडी प्रगती करणे हाच खरा जीवणात मोठे यश प्राप्त करण्याचा मार्ग आहे.

40) जेव्हा मरण डोळयासमोर उभे असते तेव्हा आयुष्याचा एक एक क्षण किती मोलाचा आणि महत्वाचा आहे हे आपल्याला कळत असते.तोपर्यत नाही.

41) जेव्हा एखादी गोष्ट आपल्यापासुन हिरावली जाते तेव्हाच तिचे खर मूल्य,किंमत आपल्याला कळत असते.

42) जेव्हा आपल्याला वाटेल की आयुष्यात खुपच दुख अडचणी आणि संकटे आहेत तेव्हा स्वताला एकच शब्द बोला ही वाईट दिवसांची काळोखी रात्र पण लवकर निघून जाईल.आणि चांगल्या दिवसांची पहाट लवकरच उगवेन.कारण जीवणात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसते मग ते सुख असो किंवा दुख,यश असो किंवा अपयश,चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस.

Leave a Comment