मराठी गुड मॉर्निंग सुविचार – Marathi Good morning messages

मराठी गुड मॉर्निंग सुविचार – Marathi Good morning messages

1.नाते मनाचे – मराठी मोटिवेशन संकलन
2. प्रत्येक गोष्टीची काळजी करणे , Tension घेणे , आत्महत्या करणे हे उपाय नाहीत…
3.जगायला शिका.

4. काही गोष्टींना वेळ लागला याचा अर्थ तुम्ही हरला असा होत नाही !!!

5. चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही.

6. प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही.पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे…

7. मी आहे ना तू घाबरु नकोस
या शब्दात एवढी ताकद आहे किGood morning quotes marathi

 

 

8. कमजोर व्यक्तिला कोणतेही आव्हान
ऊचलण्यासाठी एक प्रकारचे शरीरात दिले जाणारे ग्लुकोजच आहे.

9. संकटात नेहमी दिलासा देणारा मित्र हा एक प्रथमोपचार आहे..

10. माणसानेच माणसाला जपल पाहिजे…. माणूस मोबाईल…. टीव्ही….. कॉम्प्युटर…. अश्या व्यसनात व्यस्त होत चाला आहे. . . घरात एकत्र असून एकमेकांशी संवाद होत नाही…. आतल्या आत घुसमट चालय….. हे सगळ कुठे तरी थांबल पाहिजे…. जीवन जगा… दुःख कोणाला नाही सगळ्यांनाच आहे पण जीवन संपवणे हा मार्ग नाही …… प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात त्याला सामोरे कस जायचं हे आपल्याच हातात आहे.. माणूस जपा

11. स्वयंप्रकाशी अस्तित्त्वएकनिष्ठ, ध्येयनिष्ठ, तत्त्वनिष्ठ

12. समाज्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नजरेत समावता आले, तरच समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जातेय , कोणत्या दृष्टीने स्वतःकडे पाहते हे कळते. साहजिकच आहे
13. त्या दुर्गम्य नजरेची कटाक्षता लागते. अशी दृष्टी बोटावर मोजणाऱ्यांनाच मिळते असे नाही तर ती पैदा करावी लागते.

14. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं आपलचं होत गेलं असतं, तर”गमवायची भीती” अन “मिळवायची किंमत” कधीच समजली नसती..

15. कोणीतरी ‘आपलं ‘ असावं..
आपण लाख बोलु आपल्याला कोणाची गरज नाही , आपण कोणावर अवलंबून नसतो परंतु प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक तरी जवळची व्यक्ती हवी असतेच… आपण अनेकदा आनंदी असण्याचा देखावा करत असतो कारण..आपल्या मनातील लहान सहान गोष्टी प्रत्येकाला सांगत नाही आपण.. तो मान मात्र त्याच खास व्यक्तीला देतो… तीच जवळची व्यक्ती वेळेला आपली ताकद आणि आधार बनते..
16. म्हणुन एक तरी अशी ‘जवळची व्यक्ती ‘असावी…

17. ज्याला परिस्थितीची तळमळ आहे ,तो अभ्यासाची चळवळ सुरू करतो आणि
यशस्वी होतो..!

18. आयुष्यात थोडा Ego आणि Attitude असायला पाहिजे, कारण लोकांना जास्त किंमत दिली ना की गंमत करायला बघतात…!_

शुभ सकाळ मराठी संदेश

19. जगुन झालेलं आयुष्य परत जगता येत नाही, काही चुकलं म्हणून कोणाकडे “टाईमप्लीज” मागता येत नाही…_

20. ” पुरुषा पेक्षा मला स्त्री जास्त कणखर वाटते …….” किती तरी असंख्य जीव घेणे प्रसंग पेलून नेण्यची ताकद असते तिच्यात ……” दडपण आलं म्हणून स्त्री व्यसनाधीन कधीच होत नसते ….” सगळं दुःख पचवून चेहरा हसरा ठेवण्याचं सामर्थ्य असतं तिच्यात ..

21. जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो.

22. आपल्याकडे जे आहे, किंवा आपण कोण आहात,किंवा आपण कुठे आहात किंवा आपण जे करत आहात यांवर आपण आनंदी किंवा दुःखी हे अवलंबुन नाही.तुम्ही जो विचार करता
23. त्यावर सर्वकाही अवलंबुन आहे…

24. बुद्ध संदेश——|

एकटा मनुष्य सत्यमार्गाचे अनुसरण करण्याचा निश्चिय केल्यानंतरही दुर्बलतेमुळे घसरू लागतो आणि पूर्ववत जीवन जगू लागतो.म्हणून एकत्र या, एकमेकांस मदत करा आणि एकमेकांच्या प्रयत्नांनना बलवान करा.

25. आणि आई वडीलांन सारखं प्रेम आपल्याला कुठंच मिळत नाही मम्हणून आपण पण त्यांच्या स्वप्नाचं चित करून दाखवावं आणि त्यांच्या कष्टाचे फ़ळ मिळालं पाहिजे आणि त्यांचं राहिलेलं आयुष्य सुखमय आणि समाधानाने जगता यावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे……॥

26. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची सुरुवात असते..

27. वेदनांनी भरलेल्या नयनचक्षूंना कोणी भीक घालत नसले की स्वतःच्या अंतर मनाला शोधून पाहायचं आणि विचारायचं आपले अश्रू कोणी भीक घेण्याच्या तरी लायकीचे आहेत का ?आपल्याच अविर्भावत राहून सर्व वेदनांवर झपाझप पाऊले टाकून जगायचं. कोणी नसले तरी मी मला पुरून उरणारा आहे. ओंजळीत इतरांचेही अश्रू झेलण्या इतपत माझा ओटा मोठा आहे. इतरांची रीती मने भरत गेली की स्वतःच्या मनाला रीतं राहण्याची ग्वाही मिळत नाही एकांताच्या दुनियेत.

28. दिवसाच्या सुरुवातीला वाटत की पैसा खूप महत्त्वाचा आहे, पण दिवस संपायच्या वेळेस वाटत की आयुष्यात शांती खूप गरजेची आहे.

29. आयुष्यात काहीवेळा बराच काळ असंच एकाकी अन् निष्पर्ण अवस्थेत रहावं लागतं.. अशा काळात मातीमध्ये मुळं घट्ट रूजवून मोठ्या ताकदीने उभं रहावं लागतं.. या काळात टिकून राहणारेच काळ बदलला की बहरतात

30. कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा., कारण एक जुनी म्हण आहे.सुप्रभात मराठी संदेश

 

31. जे लोक नेहमी फुले वाटतात, त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो..!

32. कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात. काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा सिध्दांत आहे”.

33. असलं नसलं तुझं कोणी तू पंखात नेहमी भरारी ठेव,बदलतील हे पण दिवस तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव

34. यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते जेव्हा तुम्ही

35. जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या पाठीमागे येतात…

36. आधारआणि प्रेरणा देण्याचे काम आई वडील व इतर मित्रमंडळी करू शकतात पण अभ्यास मात्र आपल्यालाच केला पाहिजे.

37. नियमित नमस्काराने आपल्यातील अहंकार दूर होतो. आणि समोरच्या व्यक्तीमध्ये सकारात्मक चांगुलपणा निर्माण होतो . त्यामुळे रोजच सर्वांना शुभेच्छा देत राहणे, नमस्कार देत राहणे हे चांगल्या परिवार निर्माण आणि समाज निर्माणाचे सूत्र आहे .

38. स्वभाव म्हणजे तरी नक्की काय.? रंगांची पेटी….कधी कुठला रंग सांडेल याचा अंदाज नाही. . .फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घ्यायची. . .

a. मनापासून लिहीलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करुनजातात.
b. त्या नेहमीच काहीतरी,वेगळं बोलुन
c. जातात.काही माणसं भेटून,बदलत असतात.आणि
d. काही माणसांना भेटूनआयुष्यात बदल घडुनयेतात

39. “पुस्तकं ही यशाच्या मार्गातील प्रमुख दिपस्तंभ मार्गदर्शक आहेत. म्हणून पुस्तकाना जीवापाड जपा. त्यांना जपाल,तर हिच पुस्तकं तुम्हाला यशाच्या सर्वोच्च ठिकाणी घेवून जातील..!”

40. स्वतःशी प्रामाणिक राहिले की नशिबाची चिंता राहत नाही…

41. आपण चालतोय त्या वाटेशी एकनिष्ठ असलो की अडथळ्यांची पर्वा राहत नाही..

42. स्वतच्या दुःखाचं ओझ सोबत ठेवून ही दुसऱ्यांना आनंद देणारी माणसं ही परस्थितीशी कायमची जवळीक साधून चालत असतात म्हणूनच ती कायम समाधानी असतात

43. काही गोष्टी ” जमत नसतील ” तर आपलं ” धेय्य छोट कधीच करू नका “तर आपले ” प्रयत्न दुप्पट करा आपोआपच धेय्य भेटेल

44. एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पळायचो..

45. कितीतरी ठेचा लागायच्या , जखमाही व्हायच्या..ती पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारख,पळवायची,आज कळतंय ती पतंग नव्हती ते एक आव्हान होतं..आनंदासाठी पळावं तर लागतच कारण तो दुकानात विकत नाही मिळत.कदाचित हीच आयुष्याची खरी मॅरॅथॉन आहे.

46. जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते..नाही चांगले दिवस, नाही वाईट दिवस…

47. यश हे आकाशात उंच उसळलेल्या चेंडु सारख असतं. वर गेलेला चेंडु कधी न
कधी तरी खाली येणारच.पण वर जाताना तुम्ही असे असंख्य हात जोडून
ठेवायला हवेत जे खाली येताना तुम्हाला झेलण्यासाठी पुढे सारसावतील…

48. तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही.
तर, तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे.

49. ~गौतम बुध्द

कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते.
एक म्हणजे ध्यास आणि दुसरी म्हणजे अभ्याचस.
शक्ती आणि युक्ती यांचा योग्य वापर केल्यास कोणत्याही कामातील
अडचणी दूर होतात .

50. इच्छित ध्येय साध्य झाल्याशिवाय प्रयत्न अर्धवट सोडून देणे म्हणजे माघार घेणे होय,
म्हणून यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी जिद्द ,चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक असतो.

51. जेव्हा आयुष्यातून आळस नावाची चावी हरवून जाते…तेव्हा फक्त प्रयत्न नावाचा हातोडा आपल्याला गावतो,जो वळ तर करतो, पण तुमच्या सक्सेसचे मार्ग देखील मोकळे करतो…
52. माणसाने आयुष्यात पाण्यासारखे जगावे ते वाटेत किती अडथळे आले तरी त्याचा मार्ग निवडते तसेच आयुष्याच्या वाटेवरून चालताना कितीही अडथळे आले तरी आपण त्याचासारखा मार्ग निवडावा..

53. रस्ता चुकणं चुकिचं नसतं. मात्र रस्ता चुकत आहे हे समजून,
पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचं आहे.

54. विश्वास ठेवा की, श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात.
वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा, माणसाला जास्त थकवतात

55. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे.
सुख मिळालं तर उपभोगायचं मिरवायचं नाही आणि दु:ख मिळालं तर पचवायचं, गिरवायचं तर मुळीच ना …

56. कुटुंब घड्याळ्याच्या काट्या सारखं असलं पाहिजे.कोणी लहान, कोणी मोठा,कोणी स्लो, कोणी फास्टपण जेव्हा कुणाचे बारा वाजणार असेल, तेव्हा सगळे एकत्र पाहिजेत.

57. जीवन मोजकेच असते ते
हसत हसत जगायचे असते
जुळलेली नाती कधी तोडायची नसतात,ज्याच्यावर आपन प्रेम करतो त्याच्याशी कधीच खोटे बोलायचे नसते,सुख-दु:खाने
भरलेले हे आयुष्य असते,कुठे काही हरवते तर कुठे काही सापडते ,त्यातुनच सापडलेले जपायचे असते….

58. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे.
नकारात्मक विचार केला तर, प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल…प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी

 

 

59. _आयुष्य जेंव्हा बीजगणित आणि
भूमिती सारखं बनतं तेंव्हा आयुष्याची
गणितं सोडवायला गरज असते ती
खऱ्या शिक्षकाची… कारण खऱ्या
आयुष्यात ना प्रमेय लागू होतात
ना कुठली सूत्र..!!_

60. हो” आणि “नाही” हे दोन
छोटे शब्द आहेत,
पण त्याविषयी खूप
विचार करावा लागतो…
आपण जीवनात
बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!!

61. जीवनात यश मिळेल की अपयश या चिंतेत राहू नका… त्यापेक्षा प्रयत्नशील रहा… कारण तुमचे प्रयत्नच तुम्हाला यशस्वी बनवू शकतात.प्रयत्नशील व्यक्ती हा केव्हाही विजेता होवू शकतो.. त्यामुळे अपयशाची चिंता नको…सकारात्मक प्रयत्न हेच बऱ्याच प्रश्नाचे उत्तर आहे.”

62. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”.. म्हणूनच.. मनसोक्त जगा…आनंदी जगा….

63. ज्या घरात दिवसाची सुरुवातच शिवरायांच्या नामस्मरणाने होते त्या घरातील पोरांच्या मस्तकावर संकटे पेलण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्तच असते

64. हे बोर बाहेरून किती ताजेतवाने दिसत आहे, एकदम तेज आहे..पण जेव्हा याला खाण्यासाठी या बोराचा अर्धा भाग दाताने तोडला,तर हे बोर मधून किडलेलं (नासक) निघालंम्हणून क्षणाचा पण विचार न करता याला तिथंच फेकून दिलं..या बोरासारखे किडके(नासके) लोक आपल्या आयुष्यात असतात, बाहेरून ते आपल्याला दाखवतात. ते किती चांगले आहेत मात्र आतून ते बोरासारख किडलेले असतात..म्हणून आपण एकच करायचं अश्या लोकांना कायमच आपल्या आयुष्यातुन काढून टाकायचं..

65. आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो.कारण अहंकारापासून तो लांब असतो.
66. “हम भी कुछ है” हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरु होते झुंज, स्पर्धा, तर्क आणि संघर्ष., आणि त्यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण..!

67. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…

68. संधी आणि सूर्योदय दोन्हींमध्ये एक साम्य असतं,

69. उशीरा जागे होणार्यांच्या नशीबी दोन्हीही नसतं…

70. “कष्ट” इतक्या शांततेत करा कि तुमच “यश” धिंगाणा घालेल !!

71. सांभाळून चाला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते…!!!

72. निरागस मैत्री जगासमोर अगदी निसंकोच मांडलेल्या नात्यालाच आपण मैत्री म्हणत असतो…

73. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली, तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते…

74. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतरएक बहुमूल्य संपत्ती विकसित होते…
ज्याच नाव आहे….””आत्मबल-” “Will Power”

75. आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण आहे.

76. कालचा दिवस हा अनुभव होता, आजचा दिवस हा प्रयोग असतो, उद्याचा दिवस ही अपेक्षा असते…
77. 4 – 5 वर्ष झालं अभ्यास करून पण एकही Result आला नाही..नाराज होणं हे सहाजिकच
पण एक लक्षात ठेवा ..कितीही मोठा दगड असेल तर एक घाव असा येतो की एका क्षणात तो दगड फुटून जातो आणि आपल्याला समजत ही नाही….Result नक्कीच येणार फक्त सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा …

78. इतरांशी लढणं खूप सोपं असते ….लढायचंच असेल तर स्वतः स्वतः शी लढा आणि स्वतःवर विजय मिळवा….मग जगात कोणताही शत्रूच उरणार नाही जो तुमच्याशी लढेल .

79. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते.

80. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका.

81. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट.

82. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो.हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते….

83. आयुष्यात जर आपल्याला कोणी भगवान श्रीकृष्णा सारखं साथ देणारं भेटलं तर,
84. नक्कीच………..अर्जुनासारखं त्याला मार्गदर्शन मागजा. कारण, अर्जुनाला माहित होतं की जर श्रीकृष्ण आपल्या सोबत राहील तर आपण जग जिंकू शकतो…
85. आणि दुर्योधनासारखं श्रीकृष्णचे संपूर्ण सैन्य (सैनिक) नाही…कारण, दुर्योधनाला वाटतं होते की आपण श्रीकृष्णा शिवाय पांडवाला हरवू शकतो…

86. यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे सुंदर चेहरा किंवा चांगली बॉडी असायलाच हवी असं नाही आहे, तर तुमच्याकडे कौशल्यपूर्ण मानसिकता आणि जगासमोर स्वतःला प्रस्तुत करण्याची हिंमत असायला हवी.

87. ज्यांना समज कमी असते, त्यांना गैरसमज व्हायला वेळ लागत नाही, जे पक्षी मोजत बसतात त्यांना आभाळ कधीच कळत नाही……!

88. जबाबदारी आणि ओझं यातला फरक ज्यांना समजतो ते आयुष्याविषयी फार कमी तक्रारी करतात.
89. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते…..

90. मरण तर जगातील प्रत्येकाला आहे पण जगतय कोण हे महत्त्वाचे आहे…

91. करण्यात अर्थ नाही. मस्त आनंदी राहून जीवन जगायला शिकलं पाहिजे..

92. काही गोष्टी सोडता येत नाहीत पण त्यांना सोडल्या शिवाय पुढेही जाता येत नाही…

93. त्यामुळे रस्ते कितीही अडचणीचे असो ध्येय पक्के आणि विचार खंबीर असतिल तर मेहनत करायची ताकत सुद्धा आपल्या मनगटात आपोआप येऊन जाते..
94. बस फक्त माणूस आपल्या विचारांशी प्रामाणिक असावा ….

95. ❝प्रत्येकाचा प्रवास सारखाच असतो,फक्त वाटा वेगवेगळ्या असतात.इथे प्रत्येकालाच संघर्ष असतो,अनुभव मात्र वेगवेगळे असतात…❞

96. नदीचे पाणी कितीही गोड असले, तरी शेवटी तिला खाऱ्या समुद्राला मिसळूनच राहायला लागतं. तसच मनुष्य कितीही सरळ असला, तरी त्याला काही वाकड्या व्यक्तींबरोबर मिसळूनचजीवन व्यतीत करायला लागतं!

97. सगळेच धडे शालेय पाठ्यपुस्तकातून शिकायला मिळतात असे नाही, तर काही धडे नाती, जिवलग मित्र, आणि समाजाकडूनही शिकायला मिळतात. आयुष्यात तुम्ही कीती आनंदी आहात, याला महत्व नसून तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत. हे बघणे जास्त महत्वाचे असते!

98. विश्वास -विश्वास ठेवा स्वतःवर त्याप्रमाणे कृती करा..सर्व शक्य होईल…विश्वास ठेवा नात्यांवर …जपला समोरच्याने तर एक जिवलग मिळेल…तोडला तर विश्वास असावा..पण तो डोळस ,आंधळा नाही हा धडा मिळेल.
99. प्रयत्नावर विश्वास ठेवून मनापासून केलेले प्रयत्न कधीच निष्फळ जात नाही…थोडा उशीर लागला तरी ही यश हमखास मिळतेच ..शिवाय सोबत अनुभव मिळतो तो वेगळा …शुभ सकाळ Good Morning Marathi

 

100. जेंव्हा हनुमान ने स्वतःवर विश्वास ठेवतो तो समुद्रही एका उडीत पार करतो…आपल्यामध्ये ही सर्व क्षमता आहे …अडथळ्यांचा समुद्र पार करण्याची …मग आपल्या क्षमता कोणीतरी आठवण करून देईल याची वाट कशाला पहायची …स्वतःवर विश्वास ठेऊन तर पाहा…जगात सर्व काही शक्य आहे

101. जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं…
102. काचेला ” पारा ” लावला की,आरसा तयार होतो. पण.. लोकांना “आरसा ” दाखवला की,त्यांचा ” पारा ” चढतो.”आरसा तोच असतो “
103. फक्त त्यात ” हसत ” पाहिले की,आपण ” आनंदी ” दिसतो, आणि ” रडत ” पाहिले की,आपण ” दु:खी ” दिसतो.

104. तसेच ” जीवन ” ही तेच असतं,फक्त त्याच्याकडे आपला
105. पहाण्याचा ” दृष्टीकोन ” त्याला” आनंदी ” किंवा ” दु:खी ” बनवतो.” म्हणुन.. ” ” दृष्टीकोन ” महत्वाचा आहे.

106. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही…. तो थांबतो,
107. वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो….. घेऊन, तीच दहशत…..अन तोच दरारा!!!

108. पराभवाने माणुस संपत नाही.,प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..कठीण काळात सतत स्वतःला सांगा,की “शर्यत अजुन संपली नाही, कारण, मी अजुन जिंकलेलो नाही ..

110. आयुष्य भेटलेच आहे तर काहीतरी करून दाखवा….आज वेळ खराब आहे म्हणून काय झालं एक दिवस वाईट वेळेलाही बदलून दाखवा..

112. निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा पण एकदा निर्णय घेतला की मग शंभर अडचणी आल्या तरी निर्णयावर ठामच….

प्रेरणादायी छोटे विचार – 101 motivation status Marathi

प्रेरणादायी छोटे विचार – 101 motivation status Marathi

Leave a Comment