Reading Time: 3 minutes

वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात – Happy Birthday In Marathi Text

Happy Birthday In Marathi Text
Happy Birthday In Marathi Text

वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात -

प्रत्येक दिवशी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस असतो,हे आपल्याला माहीतच आहे.काही लोकांना वाढदिवस साजरे करणे आवडत नाही,कारण त्यांना वाटते की;आपण एक वर्ष म्हातारे झालो.काही लोक तर धमाल मस्तीमध्ये आपला वाढदिवस साजरा करतात.त्यांना वाटते की,आपण मोठे होईल तसे शहाणे होतोय.ते म्हणतात ना की,आपल्या जन्मावेळी आपली आई आपल्या रडण्यावर हसते.

वाढदिवसाच्या कसा साजरा करतात – Happy Birthday In Marathi

 

शहरी आणि गावी भागात वेगवेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला जातो. गावाकडे सर्वप्रथम सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून त्याला ओवाळले जाते.नंतर ज्याचा वाढदिवस आहे तो घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेतो.संध्याकाळी घरातील सर्वजण मिळून केक कापून वाढदिवस साजरा करतात.शहराकडे दिवसभर मोबाईल वरती शुभेच्छा स्वीकारून रात्री मित्रांसोबत पार्टी करून वाढदिवस साजरा केला जातो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Birthday In Marathi

 

वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांनी आपण ज्याचा वाढदिवस आहे त्याला आनंदी करू शकतो.वाढदिवसाच्या बाबतीत लोक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात. जर वाढदिवस लहान मुलांचा असेल तर, ते खूप खुश असतात.कारण ते मोठे होत असतात.दिवस मावळायच्या आत ते आपल्या लहान मित्रांना वाढदिवसाचे आमंत्रण देतात. जर वाढदिवस प्रौढ व्यक्तीचा असेल,तर ते सहजासहजी वाढदिवस साजरा करत नाहीत;पण काहिजण घरातील लोकांच्या आग्रहामुळे वाढदिवस साजरा करायला तयार होतात.प्रौढ लोकांना वाटते की; आपले एक वर्ष कमी झाले,त्यामुळे ते एवढे आनंदी नसतात.तरीही हे मानले जाते की,जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत वाढदिवस साजरा केला पाहिजे;पण हा निर्णय सर्वस्वी आपला आहे की आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे की नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या विना वाढदिवस काहीच नाही.समजा तुमचा जर वाढदिवस असेल आणि तुम्हाला कोणीही शुभेच्छा नाही दिल्या तर तुम्हाला वाढदिवस साजरा केल्यागत वाटेल का तरी ?वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे खूप प्रकार आहेत.वाढदिवसाच्या शुभेच्छा एका पंक्तीत,किंवा एका सुंदर कवितेत ही असू शकतात.प्रत्येक वयाच्या लोकांना दिल्या जाणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वेगळ्या असू शकतात.सहजासहजी लहान मुलांना वाढदिवसाला शुभेच्छा म्हणून चॉकलेट चा बॉक्स दिला जातो.

वाढदिवसाच्या भेटवस्तू – Gifts  and Happy Birthday In Marathi

काही ठिकाणी वाढदिवसादिवशी शारीरिक स्पर्शाला प्राथमिकता दिली जाते.तर काही ठिकाणी ग्रीटिंग कार्डच्या द्वारे शुभेच्छा दिल्या जातात.असे पण असू शकते की ; काही लोकांना व्यक्तिगत शुभेछा द्यायला आवडत नाही.वाढदिवस हा एक आनंदाचा दिवस असतो.ज्या लोकांना वाढदिवस साजरा करायला आवडत नाही,ते ही दुसऱ्यांच्या आनंदासाठी बळजबरी आनंदी होण्याचे नाटक करतात.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या लोकप्रिय प्रकारात कार्डचा समावेश असतो.

ह्याच ग्रीटिंग कार्डचा बनवण्याचा वेगळा व्यवसाय आहे.म्हणजे बघा शुभेच्छा देताना कितीतरी लोक ग्रीटिंग कार्डचा वापर करतात ते ?

आपल्या इच्छेला ग्रीटिंग कार्डमध्ये वेगळ्या मनोरंजक अंदाजात लिहले जाऊ शकते.काही लोक ग्रीटिंग कार्डमध्ये रोमँटिक शब्द ही लिहतात.

ग्रीटिंग कार्ड पण प्रत्येक नात्याला वेगळे असू शकते.

समजा एका व्यक्तीच्या वाढदिवस आहे,त्याला त्याची पत्नी वेगळ्या भावात ग्रीटिंग कार्ड लिहणार,तसेच त्याचा मित्र वेगळ्या भावात ग्रीटिंग कार्ड लिहणार.पण ग्रीटिंग कार्डचे एकच काम आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे.

आधुनिक मोबाईल च्या दुनियेत,वाढदिवसाच्या शुभेच्छा लगेचच आपण टाइप करून मोबाईल वरती पाठवू शकतो.ग्रीटिंग कार्ड इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले जाऊ शकते.आपण इमेल, व्हाट्स अँप च्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो.मागच्या पाच वर्षांपूर्वी कोणाचा वाढदिवस असल्यास त्याचा फोटो प्रत्येकजण आपल्या प्रोफाइल फोटोला ठेवायचे.

आजकाल तर माणसे वाढदिवस असल्यास त्यांचा विडिओ करून व्हाट्स अँप च्या स्टोरी ला टाकतात.हा ही एक शुभेच्छा देण्याचा चांगला मार्ग आहे.फेसबुक सारख्या अँपवरती तर आपला वाढदिवस कधी आहे ते समजते आणि आपण त्यावर सहजरित्या शुभेच्छाही देऊ शकतो.काही लोक तर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून लोकांवर नाराज होतात.प्रत्येकासाठी आपला वाढदिवस एक विशेष दिवस असतो.वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल तर नवनवीन अँप्स उपलब्ध झाल्या आहेत. ज्याच्यावर आपण ज्याचा वाढदिवस आहे त्याचा फोटो टाकून मस्त विडिओ बनवू शकतो.त्याच अँपवर आपण एखादा वाढदिवसाचा कोट्स टाकूनही विडिओ बनवू शकतो.

आजकाल तर वाढदिवस साजरा करताना मजेशीर प्रथा सुरू झाली आहे.वाढदिवस साजरा करताना,ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या चेहऱ्याला सर्वजण केक लावतात.भविष्यात वाढदिवस साजरे करण्याच्या काय काय पद्धती येतील काय माहीत ?

आपण या विशेष दिवशी चांगल्या शुभेच्छा देऊन वाढदिवस अजून विशेष बनवूया.तर चला तर या सुंदर दिवशी चांगल्या शुभेच्छा देऊन एकमेकांच्या जीवनात आंनद आणूया..

  
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x