भाषा आणि शब्द (good communication Marathi )चा वागणुकीवर होणारा परिणाम

भाषा आणि शब्द (good communication Marathi ):

भाषा आणि शब्द यांचा आपल्या आणि आपल्या आसपासच्या लोकांवर प्रभाव पडतो.भाषेने मानवाला जिवंत राहण्यासाठी मजबूत बनवले आहे.आपण शब्दांच्या आधारे एकमेकांशी संवाद साधू शकतो.ह्या तणावाच्या दुनियेत गोड शब्द बोलून प्रेम उत्पन्न करू शकतो.

आपण आपल्या मातृभाषेचा म्हणजे मराठीचा विचार केला तर,मराठी भाषेत असे खूप शब्द आहेत ज्यांचा अर्थ दुहेरी स्वरूपाचा आहे.ही शब्दांची दुहेरी अर्थ असण्याची कला खरंच खूप गमतेशीर आहे.इंग्रजीमध्ये बस (एस.टी) उच्चार असणाऱ्या शब्दाचा अर्थ मराठीत खाली बस असा होतो.मराठीत फळ या उच्चाराच्या शब्दाचा अर्थ फळ (मोबदला) आणि फळ (झाडाचे फळ) असा दुहेरी होतो.

शब्दांना केवळ एकच अर्थ नसतो.प्रत्येक शब्दाचे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मतानुसार वेगवेगळे अर्थ काढले जातात.एका वाक्यात शब्दांचा चार किंवा चारपेक्षा जास्तवेळा वेगळ्या पद्धतीने अर्थ काढला जाऊ शकतो.हे पण निश्चित आहे की;ह्या लेखात माझ्याकडून लिहिल्या जाणाऱ्या शब्दांचा अर्थ तुमच्या साठी असू शकतो. ही गोष्ट तुमच्यावर निर्भर आहे की; तुम्ही माझ्या लेखाला कसे आणि कुठल्या नजरेने बघता ते ? आणि मी माझा लेख कुठल्या नजरेने लिहितो आहे ते ? एका शब्दाला दुसऱ्या शब्दाची साथ देऊन वेगळा नवीन अर्थ निर्माण होऊ शकतो, शेवटी ते एक परिपूर्ण वाक्य बनते.

आजच्या लेखात आपण शब्द आणि भाषा यांच्या बाबतीत माहिती घेणार आहोत.खूप सारे लोक एका शब्दाला ज्या रूपात सांगतात, ते तसेच उल्लेख करतात.उदाहरणार्थ ,‛स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ शब्द मनात म्हणा.नकाशा म्हणजे क्षेत्र होय.नकाशा हे एक प्रतिनिधित्व असू शकते;परंतु ते क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

भाषा आणि शब्द (good communication Marathi)

शब्द वास्तविक असतात.पण आपणच त्यांचा उलट अर्थ काढतो.आपण बोललेल्या शब्दावरून आपली वर्तुणूक कशी आहे हे समजते.काही जाहिरातकार शब्दांचा आणि भाषेचा योग्यरित्या वापर करून स्वतःचा फायदा करून घेतात. राजकिय नेते आपल्यासमोर शब्दांचा अशा पद्धतीने वापर करतात की जेणेकरून त्यांना आपल्याकडून मत मिळेल.कविता लिहिणारे कवी खूप अगोदर पासून आपल्याला भावनात्मक रूपाला जोडणाऱ्या शब्दांचा वापर करतात.असे प्रत्येक भाषेत होते

आपण स्वतःहून बोललेले शब्द आपली मदत ही करू शकतात आणि आपल्या कामांमध्ये अडथळाही आणू शकतात.काय होईल जर ,“मी तुम्हाला काही करण्याचा प्रयत्न कर”असे म्हणले तर ?,तुम्हाला वाईट वाटेल;पण जर मी म्हणालो की,“तुम्ही काय कराल आता ?”,तर ते तुम्हाला अधिक शक्तिशाली वाटेल व आनंदही होईल.तुम्ही अशा शब्दांचा वापर करा की,ज्याने तुमच्या वर्तूणुकीवर प्रभाव पडला पाहिजे.

जर मी तुम्हाला ‛कुत्रा’ हा शब्द वापरला तर तुम्ही याचा काय अर्थ समजाल ? काहीजण कुत्र्याच्या विचारात रमून जातील,तर काहीजणांना वाटेल की,मी तुम्हाला ‛कुत्रा’ शब्द वापरून वाईट बोललो आहे.

जर मी तुम्हाला म्हणालो की,”काय होईल जर कुत्र्याने माणसाला चावले तर!” याचा अर्थ असा होतो की कुत्र्याने माणसाला चावले.जे की काही कुत्रे चावतात.तुम्हाला ह्या गोष्टीचे नवल नाही वाटणार.पण मी असे बोललो की,”माणसाने कुत्र्याला चावले तर”,हे वाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला हसू फुटेल व तुम्हाला ह्या गोष्टीचे नवलही वाटेल. वरील दोन्ही उदाहरणात शब्द तर सारखेच आहेत,पण त्यांचा अर्थ पूर्ण वेगळा आहे.शब्दाचा वापर चुकला की गोष्टी बदलतात.मी वरील दोन्ही वाक्यात समान शब्दांचा वापर केला परंतु मी शब्द वापरताना शब्दांची उलटसुलट केली,त्यामुळे त्याचा पूर्ण अर्थ बदलला.

जसे की तुम्ही सगळे पाहू शकता ,एका शब्दाचा वेगवेगळ्या माणसांप्रमाणे वेगळा अर्थ होऊ शकतो.आपल्याद्वारे आपल्या जीवनात वापरले जाणार्‍या भाषा आणि शब्द (good communication Skill) पहा . तुम्ही त्यांना काय अर्थ देता ? ती तुमची कोणती भावना असते ? तुम्ही ह्या गोष्टींवर थोड्याफार प्रमाणात विचार केला तर तुम्ही शब्दांना ओळखाल.आपण बोललेल्या शब्दांचा नक्की काय अर्थ होतो ?,हे तुम्हाला समजेल.

भाषा आणि शब्द चा (good communication) आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो.

आपण शब्दांची वास्तविकता ओळखली पाहीजेल.

शेवटी एक लाजीरवाणी गोष्ट सांगायची आहे.लाजीरवाणी गोष्ट ही आहे की ,आपलेच मराठी भाषिक आपल्याच मराठी लोकांबरोबर इंग्रजी किंवा हिंदीतून बोलतात.मान्य आहे की आपण बदलत्या जगाबरोबर बदलले पाहिजे,पण आपल्या मराठी लोकांबरोबर तरी आपण मराठीतच बोलायला हवे,असे मला वाटते.इंग्रजी भाषेचा आपल्या भाषेवर इतका प्रभाव झाला आहे की,काहींना काही गोष्टींचा मराठीत उचार माहीत नाही,पण त्याचा अर्थ इंग्रजी भाषेत माहीत आहे.तुम्हाला एक उदाहरण देतो,आपण हल्ली ‛नीट’ शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात करतो.आपल्यातल्या कितीतरी लोकांना अजून हे ही माही नसेल की,‛नीट’ हा इंग्रजी भाषेचा शब्द आहे.आपल्या मराठी भाषेत त्याला ‛व्यवस्थित’ म्हणले जाते.शेवटी एवढेच सांगतो की,आपणच आपली भाषा टिकवू शकतो.

Leave a Comment