ईएमआई (EMI) चा फुल फॉर्म – EMI Information in Marathi

शेअर करा:

ईएमआई (EMI) चा फुल फॉर्म  – EMI Information in Marathi

जर आपण दहा वर्षे मागे गेलो तर ,घरातल्या स्त्रीला दागिने घेण्याची आवड होती,परंतु घरातल्या परिस्थिती मुळे तिला ते घेता येत नव्हते.गावाकडच्या बापाला आपल्या मुलाला मोटार सायकल घ्यायची इच्छा होती,परंतु घरातल्या परिस्थिती मुळे त्या बापाची इच्छा पूर्ण होत नव्हती.पण आज आपली परिस्थिती चांगली नसताना आपण आपल्याला पाहीजेल ती वस्तू घेऊ शकतो.हो तुम्ही बरोबर ओळखले,आपण आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर सहज लोन घेवून  ईमाई च्या माध्यमातून आपल्याला हवी ती वस्तु सहजरित्या घेऊ शकतो.आपण या लेखात (EMI) शब्दविषयी माहिती पाहणार आहोत.

ह्या लेखामध्ये सांगितले जाणारे महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :  EMI Information in Marathi

  • ईएमआई (EMI) चा फुल फॉर्म काय आहे ?
  • ईएमआई (EMI) म्हणजे नक्की काय ?
  • ईएमआई (EMI)चे काही वेगळे फुल फॉर्म्स
  • ईएमआई (EMI) चे फायदे
  • ईएमआई (EMI) चे तोटे
  • ईएमआई (EMI) कसा भरायचा ?

1)     ईएमआई (EMI) चा फुल फॉर्म काय आहे ?

इंग्रजी भाषेमध्ये ईएमआई (EMI) शब्दाचा फुल फॉर्म equated monthly installment असा होतो.तर त्याचा मराठीत अर्थ ‛समान मासिक हफ्ता असा होतो

2)     ईएमआई (EMI) म्हणजे नक्की काय ?

जर तुम्ही कोणत्या फायनान्स कंपनी किंवा बँकेतून कर्ज काढता किंवा तुम्ही कोणती वस्तू ईएमआई (EMI) वरती खरेदी करु इच्छिता,जर तुमच्याकडे ती वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर तुम्ही ती वस्तू फायनान्स मधून खरेदी करता.ज्याचा की तुम्हाला दर महिन्याला हफ्ता म्हणजे ‛ ईएमआई (EMI)’ भरावा लागतो.आणि तो ईएमआई (EMI) 1,3,5,7 महिने किंवा एक वर्ष इतका असू शकतो. ईएमआई (EMI) ही अशी सुविधा आहे की,ज्यात आपण आपल्या आवडीची वस्तू घेऊ शकतो.

3)     ईएमआई (EMI) काही अन्य फुल फॉर्म्स-

वेगवेगळ्या क्षेत्रात ईएमआई (EMI) चे वेगवेगळे फुल फॉर्म्स आहेत.ते वेगळे फुल फॉर्म खालीलप्रमाणे :

  • EMI – Electromagnetic Inference
  • EMI – Electric and Musical Instruments
  • EMI – Electromagnetic Interference
  • EMI – Electronic Money Institutions

वरील सर्व ईएमआई (EMI) चे वेगवेगळे फुल फॉर्म्स आहेत.

4)     प्रत्येक गोष्टींच्या दोन बाजू असतात, एक चांगली बाजू आणि दुसरी वाईट बाजू. ईएमआई (EMI) च्या ही दोन बाजू आहेत.जर तुम्ही चांगला ईएमआई (EMI) घेतला तर तुमचा फायदा होऊ शकतो आणि खराब कंपनीचा ईएमआई (EMI) घेतला तर तुमचे नुकसान ही होऊ शकते. आता आपण ईएमआई (EMI) च्या फायदा आणि तोट्यांबद्दल पाहणार आहोत,ज्यानुसार तुम्ही ईएमआई (EMI) द्वारे वस्तू खरेदी करायची की नाही हे ठरवू शकता.

ईएमआई (EMI) चे काही फायदे :  EMI Information in Marathi

  • ईएमआई (EMI) द्वारे तुम्ही गरजेच्या आणि तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू सहजरित्या घेऊ शकता.
  • जर तुमच्याकडे तुम्हाला हवी ती वस्तू विकत घेण्यासाठी पैसे नाही तर,तुम्ही ईएमआई (EMI) द्वारे ती वस्तू लगेचच खरेदी करू शकता.
  • काही वेळा ईएमआई (EMI) मध्ये विना व्याजाच्या ऑफर्स येतात.ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडीची वस्तू खरेदी करू शकता आणि त्याचे जास्तीचे व्याज ही तुम्हाला द्यावे लागत नाही.
  • योग्य वेळी किंवा वेळेच्या अगोदर तुम्ही ईएमआई (EMI) चा हफ्ता भरला ,तर तुमचा क्रेडिट स्कोर ही वाढू शकतो.
  • जर तुम्ही चांगल्या फायनान्स कंपनीचा ईएमआई (EMI) घेतला तर तुम्हाला तोट्याचे चांसेस फार कमी आहेत.
  • ईएमआई (EMI) चे काही तोटे :
  • ईएमआई (EMI) मुळे काही लोक गरजेपेक्षा जास्त मौल्यवान वस्तू विकत घेतात.त्यामुळे ईएमआई (EMI) चा हफ्ता भरताना त्यांना तोटा होतो.
  • योग्य वेळेवर ईएमआई (EMI) चा हफ्ता भरला नाहीतर तुम्हाला सर्व्हिस टॅक्स ही द्यावे लागतात.
  • जर तुम्ही विश्वास नसलेल्या कंपनीकडून लोन घेतला तर ,ईएमआई (EMI) घेतला तर तुमचा तोटाही होऊ शकतो.
  • लोन घेताना , ईएमआई बद्दल तुम्ही जर त्यांच्या पोलिसी व्यवस्थित वाचल्या नाहीतर नंतर तुम्हाला त्यांचे नुकसान सहन करावे लागतील.

ईएमआई (EMI) कसा भरायचा ?

  • जर तुम्ही कोणती वस्तू ईएमआई (EMI) वर खरेदी करू इच्छिता तर तुम्हाला पहिल्यांदा एखादे दुकान शोधायला हवे,असे की जे दुकान तुम्हाला त्या वस्तूवर ईएमआई (EMI) देणारे असेल.
  • ऑनलाइन ईएमआई (EMI) कुठे भरायचा हा प्रश्न काहींच्या मनात असतो.जर तुम्ही कोणती वस्तू ऑनलाइन ईएमआई (EMI) वरती खरेदी केली तर तिथे तुम्ही तुमच्या आर्थिक आवक ची माहिती भरू शकता आणि बँकेद्वारे दर महिन्याला ईएमआई (EMI) चा हफ्ता भरू शकता.जर तुमच्या बँकेत ईएमआई (EMI) चा हफ्ता भरण्यासाठी पुरेशी रक्कम नसेल तर,जेव्हा त्या बँकेत पैसे येतील तेव्हा ते पैसे कट होतात.तुम्ही जर ईएमआई (EMI) वेळेवर भरत नसाल,तर तुम्ही खरेदी केलेली वस्तू कंपनी परत ही नेवू शकते किंवा जप्ती आणते


Sabse Mushkil Kaam Sabse Pehle- अ‍ॅमेझॉन वर चेक करा

Leave a Comment