एलन मस्क जीवनचरित्र – Elon Musk Biography In Marathi

शेअर करा:

एलन मस्क जीवनचरित्र

एलन मस्क यांना आजच्या युगात कोण ओळखत नसेल ? जगतील नववे आश्चर्य च आहेत इलोन मस्क.ज्याचा कोणीही स्वप्नातही विचार करू शकत नाही,आशा कितीतरी गोष्टी एलन मस्क यांनी खऱ्या केल्या आहेत. एलन मस्क उद्योगपतींचे प्रेरणा स्रोत आहेत.आपण या लेखात त्यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत.

एलन मस्कह्यांचा जीवन परिचय –

  • एलन मस्क ह्यांचा जन्म 28 जून 1971 रोजी दक्षिण आफ्रिकेत झाला.एलन मस्कह्यांचे वडील इरोल मस्क हे इलेक्टरीक इंजिनिअर आणि पायलट होते.
  • एलोन मस्क 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला.परत ते आपल्या वडिलांकडे राहू लागले आणि आफ्रिकेत त्यांनी त्यांचे सुरवातीचे शिक्षण पूर्ण केले.
  • वयाच्या 12व्या वर्षी एलन मस्क ह्यांनी एवढी पुस्तके वाचून काढली की जितकी पुस्तके पदवीधर ही वाचू शकणार नाही.
  • त्यांना कॉम्पुटर विषय खूप आवडायचा.ह्यामुळे त्यांनी पुस्तकाद्वारे कॉम्पुटर प्रोग्रॅम बद्दल माहिती घेतली आणि कमी वयातच स्वतःची एक गेम तयार केली,त्या गेमचे नाव त्यांनी ब्लास्ट (Blast) असे ठेवले.ही गेम त्यांनी अमेरिकेतील एका कंपनीला केवळ 500 डॉलर मध्ये विकली.
  • एलन मस्कह्यांनी कमी वयातच एवढे मोठे यश मिळवले.त्यांच्या काहीतरी वेगळे करण्याची क्षमता होती.त्यांच्या शाळेतील एक किस्सा आहे.त्यांना शाळेत त्यांच्या वर्ग मित्रांपैकी कोणीही जवळ घेत नसे,त्यांची सारखी आपल्या वर्गमित्रांबरोबर भांडणे व्हायची.एका वेळेस तर भांडण करता करता ते शिडीतून खाली पडले आणि बेशुद्ध झाले,त्या घटने नंतर आजही एलन मस्कह्यांना कधीतरी श्वास घ्यायला त्रास होतो.
  • एलन मस्कह्यांना अमेरिकेला जाण्याची इच्छा होती.परंतु काही अडचणी मुळे ते जाऊ शकले नाही.वयाच्या 17 वर्षी त्यांनी आपल्या वडिलांना सोडले.वडिलांना सोडण्याचे प्रमुख कारण होते की,वडिलांनी दुसरे लग्न केले होते,आणि ते एलन मस्कना योग्य वेळ देत नव्हते.नंतर ते आपल्या आईच्या नातेवाईकांकडे म्हणजे कॅनडा मध्ये राहू लागले.त्यांचे कॉलेजचे शिक्षण त्यांनी इथे कॅनडा मध्येच पूर्ण केले.
  • त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिलवेनिया येथे बीए फिज्यिक्स मधून पदवी पूर्ण केली आणि व्हार्टन स्कुल ऑफ बिसनेस मधून इकॉनॉमिक्स ची डिग्री प्राप्त केली.

एलन मस्कयांचे अमेरिकेतील जीवन –- Elon Musk Biography In Marathi

  • एलन मस्क पीएचडी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत गेले.इथे त्यांना इंटरनेट चे पुरेषे ज्ञान प्राप्त झाले आणि कमी वेळातच त्यांनी आपले ऍडमिशन काढले आणि आपल्या भावासोबत मिळून झिप 2 नावाची कंपनी सुरू केली.
  • एलन मस्कच्या पहिल्या कंपनीमध्ये म्हणजे झीप 2 मध्ये त्यांचे शेअर 7%होते.ही कंपनी न्युज पेपरला सिटी गाईड करण्याचे काम करत होती.1999 मध्ये एका कंपनीने झीप 2 ला विकत घेतले.एलन मस्कला आपल्या वाट्याचे 22 मिलियन डॉलर मिळाले.

एलन मस्क ह्यांच्या कंपन्या –

  • एलन मस्क हे सुरवातीपासूनच खूप हुशार होते.ते खूप कंपन्यांचे सीईओ तसेच काहींचे मालकही आहेत.
  • ते स्पेस एक्स चे संस्थापक आणि सीईओ,टेस्ला कंपनीचे सह संस्थापक आणि सीईओ,ओपन इ आई चे सह संस्थापक ,न्यूरालीक चे संस्थापक आणि द बोरिंग कंपनीचे संस्थापक आहेत.
  • ह्याशिवाय ते सोलर सिटी चे संस्थापक आणि अगोदरचे अध्यक्ष आणि एक्स कॉम चे संस्थापक आहेत.परत एक्स कॉम चे नाव बदलून पे-पल असे केले.
  • 2016 सालच्या डिसेंबरमध्ये एलन मस्कह्यांना फोर्ब्स ने जगातील शक्तिशाली व्यक्तींच्या लिस्ट मध्ये 21 वे स्थान दिले .जानेवारी 2018 पर्यंत एलन मस्कह्यांची संपत्ती 20.9 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती.
  • एक्स कॉम ची निर्मिती – 1999 मध्ये त्यांनी त्यांची दुसरी कंपनी एक्स कॉम सुरू केली.ही कंपनी पैश्याची देवाणघेवाण योग्य आणि सुरक्षित रित्या करण्यात मदत करत होती.
  • एक्स कॉम चे नाव बदलून पे-पल ठेवण्यात आले.पे-पल चा वापर लोक अजूनही करतात.ह्यावेळी इबेय कंपनीने पे-पल ला विकत घेतले आणि एलन मस्क  यांना 165 मिलियन डॉलर मिळाले .

स्पेस एक्स ची निर्मिती –– Elon Musk Biography In Marathi

स्पेस एक्स पासून एलन मस्क ह्यांना वेगळी ओळख मिळाली.जगाला कळले की एलन मस्कचे विचार आपल्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आहेत

त्यांना सुरवातीला दोन अपयशाचा सामना करावा लागला.त्यांच्याकडे खूप सारा पैसा होता.त्यांनी तो पैसा स्पेस एक्स मध्ये खर्च करण्याचे ठरवले.

2003 मध्ये ते रशियात गेले.त्यांना 3 ICBM नावाचे रॉकेट खरीदी करायचे होते.परंतु तिथे त्यांना एक रॉकेट 8 मिलियन डॉलर मध्ये मिळत होते.एलन मस्कच्या मनात विचार आला की इथे एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा मी स्वतःच का रॉकेट नाही बनवत ? एलन मस्कपरत आले आणि रॉकेट विज्ञान वाचू लागले आणि एका वर्षानंतर त्यांनी स्वतःचे रॉकेट तयार केले.ह्यावेळी पण त्यांना अपयश मिळाले.

परत त्यांनी त्यावरती खर्च केले.शेवटी त्यांना यश मिळाले.त्यांनी खूप कमी खर्चात रॉकेट तयार केले आणि यशस्वी अंतराळात पाठवले.आता स्पेस एक्स मध्ये बनणारे रॉकेट चा वापर नासा ही करते.

टेस्ला ची निर्मिती –

  • एलन मस्क ह्यांच्या अगोदर टेस्ला इलेक्ट्रिक कार तर तयार करायची परंतु त्या गाड्यांची किंमत खूप होती.त्यामुळे त्या कार इतक्या विकल्या जात नसत
  • .एलन मस्क टेस्ला मध्ये येताच टेस्ला चे नशीब पालटले.एलन मस्कह्यांनी कमी किमतीत इलेक्ट्रिक कार विकण्यास सुरवात केली.आज टेस्ला इतकी मोठी कंपनी झालेय की आज टेस्ला च्या गाड्या संपूर्ण जगात चालतात आणि आता तर टेस्ला ने विथआऊट चालक चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती केली आहे.
  • एलन मस्कने आपल्या भावाच्या सोलर सिटी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून सोलर सिटीला अमेरिकेतील सोलर मधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनवले.
  • 2013 मध्ये एलन मस्कह्यांनी टेस्ला आणि सोलर सिटी या कंपनीना एकत्र केले आणि आज दोन्ही कंपन्या technical क्षेत्रात नवनवीन शोध लावत आहेत.

एलन मस्क ह्यांना खूप अपयशाचा सामना करावा लागला.तरीही ते घाबरले नाहीत आणि स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली.त्यांच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते.

 


Power Play: Elon Musk, Tesla, and the Bet of the Century

लेखक –

Leave a Comment