DP चा फुल फॉर्म मराठी
इंग्लिश मध्ये डीपी चा फुल फॉर्म आहे की ‛डिस्प्ले पिचर’ ,सोशल मीडिया चे प्रोफाइल फोटो असतात त्यांना शॉर्ट फॉर्ममध्ये डीपी म्हणतात.डीपी शब्दाचा मराठीत अर्थ ‛प्रदर्शित चित्र’ असा होतो.
आज इंटरनेटचा वापर सर्व स्थ्ररात वाढला असून असे कुठल क्षेत्र नाहीत आणि बऱ्यापैकी सर्व लोकांकडे स्मार्टफोन आहेत ,आता वापर कॉमन झाला आहे सर्वजण मोबाईल असल्यावर त्यावर सोशल मिडीयाचा वापर करतातच.
जास्त वापरले जाणारे सोशिएल मीडिया,जसे की फेसबुक,इंस्टाग्राम,व्हाट्स अँप,ट्विटर आणि लिंकडेन .सोशल मीडियामध्ये काहीजण फेसबुकचा वापर करत नाही,तर काहीजण इन्स्टाग्रामचा वापर करत नाहीत पण माझ्यामते सर्वजण व्हाट्स अँपचा वापर करतातच. काही लोकांचे तर सर्वात आवडते अँप व्हाट्स अँप आहे.
तुम्ही सर्वांनी व्हाट्सअप वापरताना डीपी हा शब्द नक्की ऐकला असेल. व्हाट्स अँप वापरणारे डीपी या शब्दाचा खूप वेळा वापर करतात,जसे की ते म्हणतात,“तुझा डीपी खूप मस्त आहे रे”.तुम्हाला डीपी शब्द माहीत आहे पण तुमच्यापैकी खूप लोकांना डीपी शब्दाचा अर्थ अजून माहित नसेल
आपण या लेखामध्ये डीपी शब्दाचा फुल फॉर्म जाणून घेणार आहोत, तसेच त्याबद्दल माहितीही पाहणार आहोत.ज्यांना कुणाला डीपी या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल त्यांनी हा लेख पूर्ण वाचा.
आपण ह्या लेखात डीपी शब्दाचा फुल्ल फॉर्म काय आहे ? डीपी ची माहिती, वेगवेगळ्या सोशल मिडियावर असणारे डीपी चे प्रकार,तुमचा व्हाट्स अँप चा डीपी कोण कोण पाहू शकते ? आणि तुमच्या संपर्कातील एखाद्या व्यक्तीचा डीपी दिसत नसेल तर त्याचा अर्थ काय समजावा ?यांसारख्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.
डीपी शब्दाचा फुल फॉर्म आणि त्याची माहिती-DP full form in Marathi
जेव्हा आपण सोशल मीडिया वरती आपले अकाऊंट बनवतो,तेव्हा त्या सोशल मीडियावर आपले प्रोफाईल बनवतो, त्या प्रोफाइल मध्ये आपण आपली महत्त्वाची माहिती भरतो,जसे की आपले नाव,आपला ईमेल एड्रेस,आपला कॉन्टॅक्ट नंबर,आपले लोकेशन,त्याच्याबरोबरच त्या प्रोफाईलमध्ये बहुतेकदा आपल्या नावाच्या वरती फोटो जोडण्यासाठी एक पर्याय असतो.त्या फोटो जोडण्याला ‛प्रोफाइल फोटो’ किंवा ‛डीपी’ म्हणतात.
आता तुम्ही म्हणाल की फोटो जोडण्याच्या पर्यायाला तर प्रोफाइल फोटो म्हणतात मग हा डीपी शब्द कोठून आला ? आणि त्याचा अर्थ जर डीपी असेल तर प्रोफाईल फोटोला डीपीच का म्हणतात ?
इंग्लिश मध्ये डीपी चा फुल फॉर्म आहे की ‛डिस्प्ले पिचर’ ,जर प्रोफाइल फोटो आणि डिस्प्ले पिचर म्हणजे डीपी मध्ये काहीच अंतर नसते. जेव्हा सोशल मीडियाचा वापर लोक खूप प्रमाणात करायला लागले तेव्हा डीपी हा शब्द प्रचलित झाला. तेव्हापासून सोशल मीडिया चे नवीन नवीन मार्ग उपलब्ध झाले,त्यामुळे सर्वजण प्रोफाइल फोटो न बोलता शॉर्ट फॉर्ममध्ये डीपी म्हणतात.डीपी शब्दाचा मराठीत अर्थ ‛प्रदर्शित चित्र’ असा होतो.
- डीपी या शब्दाचा अर्थ फक्त ‛डिस्प्ले पिक्चरच’ नाही होत तर डीपी शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत.ते आपण पाहूयात. कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना डीपी या शब्दाचा अर्थ ‛डेटा प्रोसेसिंग’ असा आहे
- आणि जर तुम्ही गणित विषय शिकत आहात तर तुमच्यासाठी डीपी या शब्दाचा अर्थ ‛डिरीचलेट प्रोसेस’ असा आहे.
- परंतु ते विद्यार्थी कम्प्युटर सायन्सचे असो किंवा गणित विषयाचे असो,किंवा त्यांचे शिक्षक असो, ते जास्त करून डीपी या शब्दाचा वापर डिस्प्ले पिक्चर बोलण्यासाठीच करतात.
- आजकाल आपला वेळ वाचविण्यासाठी माणसे फुल्ल फॉर्म चे शॉर्ट फॉर्म मध्ये रूपांतर करून शॉर्ट फॉर्म जास्त वापरायला लागलेत.
प्रोफाइल फोटोला डीपी म्हणजे डिस्प्ले पिचर का म्हणले जाते तर, डिस्प्ले या शब्दाचा मराठीत अर्थ होतो दाखवणे.आपले चित्र सोशल मीडियावर बाकीच्या वापर्कत्यांना दाखवणे, म्हणून त्याला डिस्प्ले पिचर अर्थात डीपी म्हंटले जाते.
डीपी हा एकच शब्द आहे,परंतु वेगवेगळे सोशल मीडिया वापरणारी माणसे त्याला वेगवेगळे बोलतात,जसे की
१)ट्विटर वापरणारी लोक प्रोफाइल फोटोला ‛ट्विटर डीपी’ असे म्हणतात
२)इन्स्टाग्राम वापरणारी लोक प्रोफाइल फोटोला ‛इन्स्टाग्राम डीपी’ किंवा ‛इंस्टा डीपी’ असे म्हणतात.
३)फेकबुक वापरणारी मंडळी प्रोफाइल फोटोला ‛फेसबुक डीपी’ असे म्हणतात.
तुमचा व्हाट्स अँप चा डीपी कोण कोण पाहू शकते ?
तुम्ही तुमच्या प्रोफाइलला एक सेटिंग करून तुमचा डीपी सुरक्षित ठेऊ शकता.आपल्या डीपीला आपल्याला हव्या तेवढ्या लोकांना दाखवण्यासाठीही सेटिंग मध्ये एक पर्याय असतो.त्या पर्यायाला जर आपण अनुमती दिली तर आपला डीपी फक्त आपल्याला हवे तेवढेच लोक पाहू शकतात.तुम्हाला जर तुमचा डीपी सर्वांना दाखवायचा असेल तर सेटिंग मध्ये एक पर्याय असतो,त्या पर्यायाला जर तुम्ही अनुमती दिली तर तुमचा डीपी कोणीही पाहू शकते.
तुमच्या संपर्कातील कोणाचा डीपी दिसत नसेल तर त्याचा काय अर्थ समजावा ?
कधी-कधी आपल्याला आपल्या संपर्कातील काहींचा डीपी दिसत नाही,तर त्या व्यक्तीच्या नंबरला डिलिट करून त्याचा नंबर परत सेव करावा.नंबर परत सेव करून,तरीपण त्या व्यक्तीचा डीपी दिसत नसल्यास ह्याचा दोनच अर्थ होतो,एकतर त्या व्यक्तीने तुम्हाला त्या सोशल मीडियावर ब्लॉग तरी केले असावे किंवा दुसरे त्या व्यक्तीने कोणालाही डीपी न दिसण्याचे सेटिंग सेट केले असावे.