CEO चा फुल फॉर्म – CEO full form in Marathi

CEO च फुल फॉर्म

इग्रजी मध्ये सी.इ.ओ.चा फुल फॉर्म ‘चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर’ आहे.मराठीमध्ये सी.इ.ओ. ला ‛मुख्य कार्यकारी अधिकारी’असे म्हणतात.

मित्रानो तुम्ही कुठे ना कुठे सी.इ.ओ. हा शब्द नक्की वाचला ऐकला असणार. सी.इ.ओ. हे कोणत्याही कंपनीतील सर्वोच्च पद आहे.तुम्ही सी.इ.ओ. बद्दल माहिती जाणून घ्यायला उत्सुक झाला असाल, असे मला वाटते,तर आपण या लेखात सी.इ.ओ. बद्दल माहिती पाहणार आहोत. सी.इ.ओ. चे काम काय असते ? सी.इ.ओ. चा फुल फॉर्म काय आहे ? सी.इ.ओ. चा पगार किती असतो ? आपण सी.इ.ओ. कसे होऊ शकतो ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत .तसेच शेवटी आपण मोठ्या कंपणीमधील सी.इ.ओ. यांची नावे सांगणार आहोत,तर चला तर मग सुरूवात करूया.

सी.इ.ओ. चा फुल फॉर्म काय आहे ?- CEO full form in Marathi

इंग्लिश मध्ये सी.इ.ओ.चा फुल फॉर्म ‘चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर’ आहे.मराठीमध्ये सी.इ.ओ. ला ‛मुख्य कार्यकारी अधिकारी’असे म्हणतात.

सी.इ.ओ. कोणती कामे करतात ?

सी.इ.ओ. हा कोणत्याही कंपनीचा सगळ्यात मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती असतो.जेवढ्या मोठ्या पदावर ते असतात, तेवढीच त्यांची जबाबदारी मोठी असते.सी.इ.ओ.चे प्रमुख काम मॅनेजमेंट ची देखरेख करणे हे असते.तसेच सी.इ.ओ. शेवटच्या महिन्यात किती फायदा झाला ?,शेवटच्या महिन्यात आपल्या कंपणीचा सेल्स किती वाढला  ?,कंपनीमध्ये किती नवीन कर्मचारी काम करण्यासाठी आले ? यांसारखी कामे करतात.हयाशिवाय अन्य महत्वाची कामे सी.इ.ओ. करतात.ती महत्वाची कामे खालीलप्रमाणे:

  • फायद्याची योजना बनवणे.तसेच वेळ आल्यानंतर नवीन व्यावसायिक विचार कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांना सांगणे.
  • कंपनीची विक्री वाढवण्यासाठी भविष्याचा विचार करणे,तसेच कंपनीच्या कामामध्ये वेळ आल्यावर बदल करणे.
  • आपल्या प्रॉडक्ट वरती बारकाईने लक्ष देणे आणि त्या प्रॉडक्ट ची विक्री कशी वाढू शकते यावर विचार करणे.
  • कंपनीच्या मुख्य कार्यालयावर लक्षं ठेवणे.

सोप्या शब्दात म्हणायचे झाले तर,सी.इ.ओ. कंपनीचा सर्वात मोठ्या पदावर बसलेला म्हणजेच त्या कंपनीचा सर्वेसर्वा असतो.कंपनीचे कोणतेही मोठे काम सी.इ.ओ.च्या परवानगीशिवाय होत नाही.कंपनीचे कर्मचारी सी.इ.ओ. च्या आदेशाप्रमाणे काम करतात.

सी.इ.ओ. कंपनीच्या कामाचा रिपोर्ट बोर्ड मॅनेजमेंट किवा कंपनीच्या चेअरमेन ह्यांना देण्याचे काम करतो.काही कंपनीचे मालकच त्या कंपनीचे सी.इ.ओ. असतात.

सी.इ.ओ.आपल्या कंपनीचे नियम कधीही बदलू शकतात. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याचे कामही ते करतात.कंपनीचे सगळे कर्मचारी सी.इ.ओ. च्या हाताखाली काम करतात.

सी.इ.ओ. बनण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी- CEO full form in Marathi

  • सी.इ.ओ. बनण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते,तसेच त्या कामातील अनुभव आणि व्यवसायातील ज्ञान सी.इ.ओ. बनण्यासाठी महत्त्वाचे असते.
  • सी.इ.ओ. बनण्यासाठी मेहनतीबरोबर ज्ञान असणे फार गरजेचे आहे.सी.इ.ओ. आपण लगेचच बनू शकत नाही.
  • सी.इ.ओ. बनण्यासाठी तसे म्हणायला गेले तर कोणते क्वालिफिकेशन कंपल्सरी नाही; परंतू  सी.इ.ओ. एम.बी.ए केलेले असतात.
  • हळू हळू एकेक पायरी वर चढत,छोटे छोटे प्रमोशन भेटत एकेदिवशी सी.इ.ओ. चे पद मिळते,ते पण त्यांनाच मिळते ,ज्यांच्यात सी.इ.ओ. बनण्याची क्षमता असते.

सी.इ.ओ. सलरी पॅकेज किती असते ? – CEO full form in Marathi

सी.इ.ओ.चा पगार कंपनीवर निर्धारित आहे की ती कंपनी किती मोठी आहे ?,नंतर त्या कंपनीची वार्षिक कमाई किती आहे ? कंपनीच्या नियमावर ठरवले जाते की, त्या कंपनीच्या सी.इ.ओ. ला किती पगार द्यायचा ते.जर  सी.इ.ओ. चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर,त्याचा पगार वाढवला जातो.अंदाजे सी.इ.ओ. चा पगार दर महिन्याला पाच लाख ते पाच करोडच्या दरम्यान असतो.जर कंपनी छोटी असेल तर, सी.इ.ओ. ला कमी पगार भेटतो आणि जर कंपनी मोठी असेल तर, सी.इ.ओ. ला जास्त पगार भेटतो. गूगल सारख्या मोठ्या कंपनीच्या सी.इ.ओ. ला म्हणजे सुंदर पीचाईचा पगार करोडात आहे.

काही मोठ्या कंपनीतील सी.इ.ओ. ची नावे-

१) सी.इ.ओ. ऑफ गुगल – सुंदर पिचाई

२) सी.इ.ओ. ऑफ ऍमेझॉन – जेफ बेझोस

३) सी.इ.ओ. ऑफ अँपल – टीम कूक

४) सी.इ.ओ. ऑफ मायक्रोसॉफ्ट – सत्यनारायण नडेला

५) सी.इ.ओ. ऑफ इन्फोसिस – सलील पारेख


Sabse Mushkil Kaam Sabse Pehle- अ‍ॅमेझॉन वर चेक करा

Leave a Comment