आनंदी जीवनात – भेटवस्तू bonding gifts ची जादू

भेटवस्तू bonding gifts ची जादू

भेटवस्तू जादू ही एक अशी गोष्ट आहे की, जी मानवाचे जीवन बदलू शकते,आता तुम्ही विचार करत असाल की ,मी कोणत्या जादु बद्दल बोलत आहे ? तुम्हाला कळेलच पुढे की,मी कोणत्या जादु बद्दल बोलत आहे ते.ही आनंदी राहायची अशी जादू आहे की,ज्याची माणसे फक्त कल्पनाच करू शकतात.जी दुनिया सुख आणि आनंदाने भरलेली आहे ती आत्ताच्या कठोर दुनिया पेक्षा फार वेगळी आहे.

एक असे ठिकाण जे सिंड्रेला च्या कहाणी सारखे आहे,म्हणजे पऱ्यांची कहाणी.आजच्या दुनियेत सर्वांना जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट म्हणजे पैसा .पूर्वी सर्वांना प्रेम महत्वाचे वाटत होते पण आता,खरे निखळ प्रेम जे कुठे गायब झाले ते कोणालाच माहीत नाही?. आताचे प्रेम म्हणजे फक्त आकर्षण.

धावपळीच्या जीवन – bonding gifts च महत्व

आजकाल काम करणाऱ्यांना ऑफिसमध्ये इतकी कामे असतात की; त्यांना घरच्यांबरोबर वेळ घालवायला वेळ भेटत नाही. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी घ्यायची म्हणली तर ऑफिसमधल्या बॉस ची परवानगी घ्यावी लागते.सण उत्सव आपल्या कुटुंबासोबत साजरे करायलाही त्यांच्याकडे वेळ नसतो. कुटुंबासोबत एकत्र जेवायला ही त्यांच्याकडे वेळ नसतो.आपण आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवू शकत नाही,तर मग केलेल्या कामाचा काय फायदा ? आपण जे काही कमवतो,ते आपल्या कुटुंबासाठीच कमावतो ना!

आजकालच्या सगळ्या नात्यांमध्ये,मग ते नाते मुलगा-आईचे असो,मुलगा-वडीलांचे असो किंवा नवरा-बायकोचे असो त्यांच्यात आपुलकीची कमी दिसते. हे फक्त दूरवर असणाऱ्या नोकरीचे परिणाम आहेत. आजकाल लोकांना

पैसा खूप महत्त्वाचा झालाय.पैसा महत्वाचा आहेच,पण पैश्यापेक्षा आपली माणसे महत्वाची आहेत,हे लोकांना समजत नाही.ते पैशाच्या मागे असे धावतात की;या जगात  पैसाच सर्वस्व आहे. हा पैसा मानवांनी निर्माण केलाय;पण आजकाल पैसाच माणसातील माणुसकीचे अस्तित्व नष्ट करत आहे.

अशा सुरू असलेल्या धावपळीच्या युगात लांब राहूनही आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा एक मार्ग आहे,तो म्हणजे भेटवस्तू देणे.कोणी कोणाला जर भेटवस्तू दिले,तर भेटवस्तू घेणाऱ्याला खूपच भारी वाटते.त्यांचा गेलेला आनंद परत येतो. भेटवस्तू अशी एक  जादू आहे की;जी रुसलेल्या व्यक्तीला आनंदी करू शकते.आपण वाढदिवस असो किंवा लग्न समारंभ असो,प्रत्येक वेळी जाताना सोबत भेटवस्तूच नेतो. मग ती भेटवस्तू शंभर रुपयाची असो किंवा हजार रुपयाची,भेटवस्तू देण्याला महत्व आहे.

भेटवस्तू दिल्याने आपण प्रियजनांना खुश करू शकतो.काहींना तर चांगले भेटवस्तू मिळाल्यानंतर आनंदाश्रू येतात. हा असा आनंद आहे जो की शब्दात व्यक्त नाही करू शकत.हा आनंद म्हणजेच प्रेम.

भेटवस्तू च मौल्य –  bonding gifts ची वॅल्यू

ही गोष्ट त्या सुखाला दर्शवते की; जगात अजूनही प्रेमभावना आहे.ह्या स्वार्थी दुनियेत आपल्या प्रियजनांची जागा कोणीच घेऊ नाही शकत.आई वडिलांना जर भेटवस्तू दिले,तर त्यांना किती भारी वाटेल.त्यांचा आनंद गगनात मावणार नाही.ते खूप खुश होतील.त्यांनाही पटेल की,आपला मुलगा आपल्यापासून दूर राहून अजूनही आपल्यावर तितकेच प्रेम करतो जितके तो यापूर्वी करायचा.यावरून हे समजते की आयुष्यात दुरीला काही महत्त्व नाही.आपला माणूस कितीही दूर असो,पण तो मनाने आपल्या जवळच आहे.

आपल्या प्रियजनांना विशेष दिवशी म्हणजे वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस ,व्हॅलेंटाईन डे,अशा विशेष दिवशी दिलेली भेटवस्तू, त्यांना हे सांगते की आपले माणूस दूर राहूनही आपल्याला विसरले नाही.ते आपल्यावर अजूनही खूप प्रेम करते.आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देऊन प्रियजनांना मिळणारा आनंद ही फार मोठी गोष्ट आहे. ही अशी जादू आहे की स्वर्गातील पऱ्यांनी आपल्या जादुई छडीतुन केलेली जादू.असे केल्याने आपल्या प्रियजनांमध्ये प्रेमाचा सुगंध दरवळत राहील.

भेटवस्तू कितीही किमतीची असो,त्यामागे आपली भावना चांगलीच पाहिजे.जर भावना चांगली असेल तर आपण कमी किमतीचे दिलेली भेटवस्तूही समोरच्याला मौल्यवान वाटते. काहींना असे वाटते की; मौल्यवान गिफ्ट दिल्यामुळे,जो मौल्यवान गिफ्ट देतो त्याचे आपल्यावर जास्त प्रेम आहे आणि जो कमी किमतीची भेटवस्तू देतो,त्याचे आपल्यावर प्रेम कमी आहे. हे काडीमात्र खरे नाही,हे निवळ खोटे आहे.दिलेल्या भेटवस्तू मागे आपला हेतू फक्त चांगला पाहिजे.

भेटवस्तू दिल्यावर आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू उमटलेले पाहून आपल्याला ही भारी वाटते. त्याचा आनंद आपण शब्दात व्यक्त करु शकत नाही.जगात दुःख देणे खूप सोपे आहे,पण दुसऱ्याला सुखी ठेवणे हे फार अवघड आहे.

आजच्या दुनियेत दुसऱ्याला आयुष्यभर सुखी ठेवणे ही फार अवघड गोष्ट आहे,जे की खूप कमी लोक करतात.ह्याच खुशीचा एक भाग म्हणजे भेटवस्तू देणे.समजा,दुसरा कोणी जर रडत असेल तर त्याच्या पाशी जाऊन त्याच्या सोबत रडणे हे फार सोपे आहे,पण जर रडणाऱ्या व्यक्तीचे डोळे पुसून त्याला हसवणे किती मोठी गोष्ट आहे बघा ? भेटवस्तू देणे हे एक आशेचे  किरण आहे की;ज्यांना वाटते की हे आपल्यापासून खूप दूर आहेत,त्यांचे आपल्यावर प्रेम नाही त्यांच्यासाठी:

हा आनंद माणसाच्या जीवनात प्रकाश आणतो.

हा आनंद पैशाने विकत घेता येऊ शकत नाही. चेहऱ्यावर खुशी आणि मनात हा विचार की,हा आपल्यापासून दूर आहे परंतु अजूनही त्याचे आपल्यावर प्रेम आहे,ही खूप मोठी गोष्ट आहे.

ही अशी जादू आहे की, जी सर्वांनी वापरली पाहिजे आपल्या प्रियजनांना खुशी ठेवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी.

1 thought on “आनंदी जीवनात – भेटवस्तू bonding gifts ची जादू”

Leave a Comment