श्रीमद्‌भगवद्‌गीता- प्रेरणा दायक विचार

भगवत गीतेमधील काही प्रेरणादायक विचार

  • जी व्यक्ती त्याच्या मनावर नियंत्रण ठेवत नसते त्या व्यक्तीसाठी त्याचे मन हेच त्याचा सर्वात मोठा शत्रु ठरत असते.

  • आपल्या मनातील काम,क्रोध आणि लोभ या तिघे भावना आपल्यासाठी नरकाचे दवार उघडत असतात.या तिन्ही भावना आपल्या आत्म्याचा नाश करीत असतात.आणि आपणास अधोगतीच्या मार्गाने नेत असतात म्हणुन आपण या तिन्ही भावनांचा त्याग करायला हवा.

 

  • आपल्या आयुष्यात जे घडायचे आहे ते कधीतरी घडणारच आहे आणि जे घडायचे नाही ते कधी घडणारच नाही मग त्याची चिंता तरी आपण का करावी हे सत्य ज्या व्यक्तीला कळत असते ती व्यक्ती आयुष्यात कधीच चिंतीत आणि दुखी राहत नाही.

 

  • हे मी केले आहे,हे माझे आहे ही मी पणाची भावना जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हाच आपल्या मनात अहंकाराची निर्मिती होत असते.

 

  • जीवण जगण्याचा खरा आनंद ना भविष्याचा विचार करण्यात आहे ना भुतकाळात घडुन गेलेल्या गोष्टींची चिंता दुख करण्यात आहे जीवन जगण्याचा खरा आनंद हा फक्त वर्तमानात म्हणजेच आज आपल्याला जगायला मिळाला आहे अशा त्या प्रत्येक क्षणात आहे.

 

  • ज्या वस्तुची,व्यक्तीची निर्मिती झाली आहे ती प्रत्येक वस्तु,व्यक्ती एक दिवस नष्ट होणार आहे.आपल्या शरीरामध्ये वास करीत असलेला आत्मा हा अमर आहे तो कधीच नष्ट होणार नाही.आणि आपले देह हे नाशवंत आहे जे एक दिवस नष्ट होणार आहे.

 

  • अशी व्यक्ती जिच्यासाठी जीवनात प्राप्त झालेले सुख-दुख,मान-अपमान यश-अपयश ह्या सर्व बाबी समान आहेत तीच व्यक्ती खरी सिदधपुरुष असते.

 

  • माणसाचे मन हे खुप अस्थिर आणि चंचल असते.याच्यावर नियंत्रण प्राप्त करणे सोपे नसते.पण आपण नियमित त्याला नियंत्रित करण्याचा सराव केला तर आपण सहजपणे आपल्या मनावर नियंत्रण प्राप्त करू शकतो.

 

  • ज्या व्यक्तीला आपला मान सम्मान अत्यंत प्रिय असतो अशा व्यक्तीसाठी तिचा झालेला अपमान मृत्युपेक्षा वाईट असतो.

 

  • आज जो जन्माला आला आहे एक दिवस तो प्रत्येक जीव मरणार आहे.कारण ज्याचा जन्म झाला आहे त्याचे मरणे देखील तेव्हाच निश्चिंत केले गेलेले असते.त्यामुळे आपण मरणाची भीती न बाळगता जेवढे आयुष्य आपणास प्राप्त झाले आहे ते आनंदाने जगावे.आणि कधीही मृत्युचा शोक करत बसु नये.

 

  • प्रत्येक मनुष्याने परिणामांचा विचार तसेच चिंता न करता मनामधील चिंता,लोभ,लालसा यांचा त्याग करून निस्वार्थ भावनेने आपले कर्म आणि कर्तव्य यांचे पालन करायला हवे.

 

  • माणसाने आपल्या केलेल्या कुठल्याही कर्माच्या परिणामाने प्राप्त होत असलेला विजय,पराजय,नफा तोटा,सुख दुःख यांचा विचार न करून चिंतेने ग्रस्त होऊ नये.

 

  • प्रत्येक मनुष्याने आपल्या धर्मानुसार आपले कर्म करीत राहावे.विदयार्थीचा धर्म आहे ज्ञान प्राप्त करणे शिक्षण करणे.सैनिकाचा धर्म आहे आपल्या देशाचे संरक्षण करणे.

 

  • आपल्या प्रत्येकाचे जे काही कर्तव्य आहे त्यानुसार आपण आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे.

 

  • वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला कधीच काही प्राप्त होत नसते.

 

  • कुठल्याही श्रेष्ठ पुरूषाने तेच कार्य करायला हवे जे त्याच्या श्रेष्ठत्वाला शोभेल कारण श्रेष्ठ पुरूषाच्या व्यवहाराचेच अनुसरण इतर सामान्य व्यक्ती करत असतात.

 

  • जी व्यक्ती सर्व ईच्छांचा त्याग करते, मीपणा आणि लोभापासुन मुक्त होते अशा व्यक्तीस शांती मिळत असते.

 

  • येताना आपण काय घेऊन आलो होतो जे गेल्याने गमावल्याने आपण रडत आहोत,दुखी आहोत?आपण स्वत पृथ्वीवर काय निर्माण केले होते जे नष्ट झाल्याचे दुख आपण करतो आहे.आपल्याला जे काही प्राप्त झाले ते आपला जन्म झाल्यानंतर इथूनच प्राप्त झाले आहे.

 

आपणास जन्म कोणी दिला -आईवडिलांनी म्हणजेच दुसरयाने म्हणजेच आपल्याला ह्या जगात दुसरयाने आणले.

 

आपण जन्माला आलो होतो तेव्हा आपल्याकडे काय होते -काहीच नाही (अंगात घालायला कपडे दुसरयाने दिले,लहानाचे मोठे पालनपोषण दुसरयानेच केले,खायला अन्न दुसरयाने दिले,राहायला निवारा दुसरयाने दिला.नाव सुदधा दुसरयानेच दिले,नाते संबंध दुसरयानी दिली,शिक्षण देखील दुसरयाने दिले,आपण मांडतो आहे ते विचार देखील दुसरयाचेच आहेत,ज्ञान सुदधा दुसरयाकडुनच प्राप्त केले,उदरनिर्वाहासाठी पैसा कमविण्यासाठी काम देखील दुसरयानेच उपलब्ध करून दिले.

 

आपण सर्व जण ह्या सृष्टीतील एक साधन तसेच माध्यम आहोत जीवन देणारा आणि जीवनातील सर्व काही जीवनावश्यक सुख सुविधा प्राप्त करून देणारा तो परमात्मा आहे.

 

*जेव्हा आपण हे जग सोडुन जाणार तेव्हा आपल्याला खांदा सुदधा दुसरेच देणार आहेत,आपल्या चितेला अग्नी देखील दुसरेच देणार आहेत.

 

*आपण मेहनत करून जेवढा पैसा धन दौलत संपत्ती आजपर्यत कमावली आहे ती देखील आपल्यानंतर दुसरेच आपापसात वाटुन घेणार आहेत.

 

आपण येताना पण रिकाम्या हाती आलो होतो आणि जाताना देखील रिकाम्या हातानेच जाणार आहे हे जीवणाचे शाश्वत सत्य आहे.

 

*जाताना काही घेऊन जाऊ तर फक्त आपण केलेले कर्म,केलेली समाजाची सेवा,इतरांना निस्वार्थ भावनेने केलेली मदत.

 

आपण आपल्या सर्व जबाबदारी कर्तव्यांचे प्रामाणिकपणे अखेरपर्यत पालन केले याचे मनाला प्राप्त झालेले एक समाधान एवढेच घेऊन जाणार आहे.

 

 

मग हा मी पणाचा गर्व कशासाठी आपण करतो आहे?येताना आपण सोबत काहीच घेऊन आलो नाहीये आणि जाताना देखील आपण सर्व इथले प्राप्त केलेले इथेच सोडुन जाणार आहे मग ह्या सर्व गोष्टींचा इतका मोह आपण का करतो आहे?का विषय वस्तुत अडकतो आहे?का प्राप्त झालेले आयुष्य आनंदाने आणि भरभरून जगत नाहीये.

 

आपल्या हातात फक्त एवढेच आहे जे काही आज आपल्याला निसर्गाने दिले आहे त्याचा मनसोक्त उपभोग घ्यायचा,आनंद घ्यायचा,स्वताही आनंदी राहायचे आणि इतरांनाही आनंदी ठेवायचे,जे काही निसर्गाकडुन जन्म झाल्यानंतर प्राप्त झाले आहे त्याचा आपल्या गरजेपुरता वापर करून घ्यायचा,आणि आपली गरज भागल्यावर त्याचा मोह सोडुन तीच सुख वस्तु इतरांना उपभोगण्यासाठी सोडुन जायची.हाच सृष्टीचा नियम आहे.

 

  • पृथ्वीवर जसे एक त्रतु गेल्यावर दुसरा त्रतु येतो तसेच आपल्या जीवनात दुख गेल्यावर सुख देखील येत असते.

 

 

 

Leave a Comment