नेहमी आपला अपेक्षाभंग का होतो?

अपेक्षाभंग

लोक नेहमी माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत,त्याउलटच वागतात.लोक माझ्या शब्दाचा मान ठेवती नाही.लोक माझे सांगितलेले सल्ले ऐकती नाही.लोक मला दिलेल्या शब्दाचे पालन करत नाहीत.लोक मी सांगितलेले काम ऐकती नाही.

अशा आज आपल्या प्रत्येकाच्या तक्रारी आज आपणास पाहायला तसेच ऐकायला मिळतात.म्हणजे आपली प्रत्येकाची एकच तक्रार असते की प्रत्येक वेळेी माझ्याच अपेक्षा का पुर्ण होत नाहीत?.नेहमी माझा अपेक्षा भंगच का होतो?.माझ्या मनासारखे काहीच माझ्या आयुष्यात का घडत नाही?

नेहमी आपला अपेक्षाभंग का होतो?हे समजावून सांगण्यासाठी आधी अपेक्षाभंग म्हणजे काय अणि तो कसा होतो हे आधी आपण समजून घेऊयात.

अपेक्षा म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच घडावी अशी भावना मनात ठेवणे म्हणजे अपेक्षा होय.अणि अपेक्षा भंग म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडावी असे आपल्याला वाटते पण ते तसे होत नाही यामुळे आपला जो हिरमोड होतो निराशा होते त्यालाच अपेक्षाभंग असे म्हणतात.

आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही ह्या वरील संकल्पणेतच दडलेली आहेत.फक्त ती आपल्याला शोधता आली पाहिजे.मित्रांनो आपला अपेक्षा भंग कधी होतो?जेव्हा आपण कोणाकडुन कशाबाबद तरी काहीतरी अपेक्षा बाळगुन असतो.अणि त्याप्रमाणे घडत नाही.तेव्हा आपला अपेक्षाभंग होत असतो.म्हणजे आपल्या अवाजवी अमाप अवाढव्य अपेक्षा हेच आपले अपेक्षाभंगाचे मुख्य कारण असते.

आपण आपल्या आयुष्यात किती अवाजवी, अमाप तसेच अवाढव्य अपेक्षा बाळगुन असतो की हे असेच झाले पाहिजे ते तसेच झाले पाहिजे.त्याने मला अशीच वागणुक दिली पाहिजे तिने मला तशीच वागणुक दिली पाहिजे.तो माझ्याशी असाच वागला पाहिजे ती माझ्याशी तशीच वागली पाहिजे.मला हेच मिळाले पाहिजे किंवा तेच मिळाले पाहिजे.अणि मनाप्रमाणे काहीच घडले नाही तर मग आपण निराश होऊन बसत असतो.

एकेदिवशी काय झाले मी लहान असताना माझ्या आईला सांगितले की आई तु बाजारात चालली आहेस ना मग येताना माझ्यासाठी पेन्सिल घेऊन ये.पण आईने येताना पेन्सिल आणली नाही.मला खुप राग आला.त्यादिवशी मी घरात खुप चिडचिड सुदधा केली.अणि माझ्या आईशी मी बोललो सुदधा नाही.का तर तिने मी सांगितलेले एक काम ऐकले नव्हते.मग नंतर माझ्या मनात सहज एक विचार आला की खरच ही गोष्ट इतकी मोठी अणि गंभीर आहे का जेवढया गंभीरपणे मी ह्याकडे बघतो आहे.

माणुस आहे पडला असेल विसर आणेल ना उद्या त्यात काय एवढे विशेष आहे.एका पेन्सिलीसाठी मी इतका कठोर का बनलो?मग नंतर माझ्या लक्षात आले की राग हा मला आईने पेन्सिल न आणण्याचा आलेला नव्हता तर मला राग हा माझी जी अपेक्षा होती की आईने बाजारातुन येताना पेन्सिल घेऊन यावी ती पुर्ण न झाल्याचा आला होता.मग माझ्या मनात सहज एक विचार आला की मी आईला एक पेन्सिल आणायला सांगितली पण तिने ती आणली नाही म्हणुन मी दुखी होऊन बसलो मग माझ्या दुखाचे मुळ कारण तरी नेमके काय आहे आईने पेन्सिल न आणने का काही दुसरे वेगळेच.

मग हळुहळु मी मला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे शोधत गेलो तेव्हा मला लक्षात आले की माझ्या दुखाचे कारण आईने माझ्यासाठी पेन्सिल न आणने नाहीये तर माझ्या दुखाचे मुख्य कारण हे माझ्या अपेक्षा आहेत ज्या मी इतरांपासून कोणतीही मर्यादा न बाळगता अमर्यादपणे बाळगत असतो.जसे की मला हेच मिळाले पाहिजे तेच मिळाले पाहिजे,मला ती गोष्ट आत्ताच पाहिजे

असेच झाले पाहिजे तसेच झाले पाहिजे.मला हीच वस्तु पाहिजे अणि ती नाही भेटली तर मी दुखी होऊन बसतो का तर माझ्या अपेक्षा पुर्ण होत नाही म्हणुन.मग मी एक प्रयोग केला की मला जी वस्तु हवी ती मी स्वता दुकानात जाऊन घेऊन येत जाणार मग मी तसेच केले मग काही दिवसांनी माझ्या हे लक्षात आले की जेव्हा आपण स्वतापासून अपेक्षा ठेवतो तेव्हा आपला हिरमोड तसेच निराशा कधीच होत नाही कारण त्यावेळी आपण स्वता ती गोष्ट करण्याची जबाबदारी तसेच हमी घेत असतो.

पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी इतरांवर अवलंबुन राहतो जसे की मला आई पेन आणुन दे पेन्सिल आणुन दे इत्यादी तेव्हा आपला अपेक्षाभंग होण्याची दाट शक्यता असते.कारण तेव्हा आपण स्वता ते काम करण्याची जबाबदारी तसेच हमी न घेता इतरांवर ती जबाबदारी सोपवत असतो.

अणि एका मर्यादित काळापर्यत आपण जर इतरांपासुन अपेक्षा ठेवल्या तर त्या पुर्णही होत असतात पण जेव्हा आपण अवाजवी अमर्याद, अमाप अणि नेहमी इतरांपासुन अपेक्षा बाळगायला लागतो.तेव्हा आपल्या त्याच अपेक्षा इतरांसाठी एक ओझे बनत जातात.अणि तेव्हा आपला अपेक्षाभंग होण्याची दाट शक्यता असते.

अपेक्षाभंग

आपला अपेक्षाभंग का होतो हे मी तुम्हाला अजुन एक छोटेसे उदाहरण देऊन सांगतो.मित्रांनो एक माणुस असतो तो दहा किलो गहु घेण्यासाठी एका दुकानात जातो.पण त्याच्याजवळ जी पिशवी असते ती फार छोटी असते.म्हणुन दुकानदार त्याला सांगतो ह्या छोटयाशा पिशवीत दहा किलो गहु मावणार नाहीत थोडी मोठी पिशवी आणा पण तो माणुस दुकानदाराचे अजिबात ऐकतच नाही.त्याला सांगतो ह्याच पिशवीत दहा किलो गहु द्या कसे मावती नही मी पण बघतो.मग दूकानदार दहा किलो गहु त्या पिशवीत टाकायला सुरुवात करतो.पण पिशवी जुनी असल्यामुळे तिला एवढे वजन सहन होत नाही अणि ती फाटते अणि त्या माणसाचे सर्व गहु जमीनीवर वाया जातात.

एकदम त्याच प्रमाणे आपल्या अपेक्षांचे असते मित्रांनो अपेक्षा ह्या एका मर्यादित गोष्टीपर्यतच करणे किंवा कोणावर लादणे योग्य असते त्या मर्यादेपलीकडे जाऊन आपण कोणाकडुन जास्त अपेक्षा बाळगल्या किंवा त्या कोणावर लादल्या का मग आपला अपेक्षाभंग होणे हे ठरलेलेच असते.

अपेक्षा आपण  कराव्यात पण एका मर्यादेपर्यतच कराव्यात कारण एका मर्यादेच्या बाहेर जाऊन समोरच्या व्यक्तीपासुन जेव्हा आपण अपेक्षा बाळगणे सुरू करतो.तेव्हा मग आपण त्या व्यक्तीवर ओझे व्हायला लागतो आपल्या अपेक्षा समोरच्या व्यक्तीसाठी एक प्रकारच्या ओझे होऊन जातात.अणि मग अशाठिकाणी आपला अपेक्षाभंग होण्याची शक्यता ही वाढत जाते.

जसे की पालकांच्या अपेक्षा असतात की माझा मुलगा मुलगी नेहमी वर्गात पहिला आला,आली पाहिजे अणि तो वर्गात ,तसेच ती पहिली येते सुदधा.मग यातुनच पालक आपल्या मुलांवर अजून जास्त अपेक्षा लादणे सुरू करतात.की तुला शंभरपैकी 99 टक्केच पडले पाहिजे यातुन एक टक्काही कमी आला तर अजिबात चालणार नाही.

मग अशावेळी तो मुलगा तसेच ती मुलगी आपल्या पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यात पुर्ण दाबले जातात अणि घरच्यांच्या प्रेशरमध्ये जो मुलगी मुलगी नेहमी पहिले यायचे ते नापास होतात का तर याला कारण त्यांच्यावर लादल्या जाणारया पालकांच्या अवाजवी,अमाप,अवाढव्य अपेक्षा असतात.पालकांच्या अवाजवी अपेक्षांमुळे तो मुलगा तसेच मुलगी आपल्या अभ्यासात नीट एकाग्र होऊन लक्ष देऊ शकत नसतात अणि ह्या मुळेच त्यांची आधीची केलेली प्रगतीही पालकांच्या दबावात कमी कमी होत जात असते.

अपेक्षा ह्या एका मर्यादित सीमेपर्यत असणे कधीही योग्य असते.पण त्या अमर्यादपणे वाढत गेल्या का मग आपला अपेक्षाभंग होत असतो.म्हणुणच आपल्या अपेक्षांना एका मर्यादेतच ठेवा नाहीतर अपेक्षाभंगाचे दुख पचवायची वेळ येऊ शकते.

आशा बाळगतो की माझा हा लेख आपणास आवडला असेल माझा हा लेख आवडला की नाही आपल्या यावरच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा अणि सदर लेख आपल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रीणींपर्यत नातलगांपर्यत पोहचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.


check at amazon

Leave a Comment